शून्य ज्योत
शून्य ज्योत


ढगाळ वातावरण झालं होतं. हवेत गारवा निर्माण झाला होता. सतीशला आज उदास वाटत होतं. घरात सतीश व त्याची पत्नी मयुरी होती., त्याला तीन मुलगे होते.मोठा कंपनीत नोकरीला होता.मधला बँक खात्यात होता.तिसरा इंजिनिअर होता.तिघांना आई वडिल नको होते.आज मयुरी आजारी आहे.मुलांची आठवण येत होती. निरोप देऊन झाले. मुलं येत नाही.
आईचा जीव मुलाच्या भेटीसाठी तुटत होता.आला काहो दिपक, पंकज, संदिप. एकसारखे नाव घेत होती.
सतीशचे डोळे पाणावले. मयुरी "शांत बस. येतील मुलं. काही काम निघाले असेल कदाचित".तिची समजुत काढत होता. मुले येणार नाहीत हे माहित होते. दिवस कसेबसे सरकत होते. शेजारच्या बकुळामावशी आल्या."बर वाटत का ताईला? "
"नाही तिच्या मधे काहीच बदल नाही.तिचा जीव मुलांमध्ये अडकलाय. मुलं आली पाहिजे.आई आहे तिने मुलांसाठी कमी का त्रास घेतले." बकुळाबाई म्हणाली. "सगळं खरं मुलांना कळायला हवं. शिक्षणासाठी खूपच मेहनत घेतली. सकाळी उठे होलसेल मार्केट ला जाई. भाजीपाला आणि दुपारी एक पर्यंत भाजी विक्री करणे. सकाळी लवकर उठे स्वयंपाक करे डबे भरत असे. पुन्हा दुपारी जेवण बनवणे चार ते आठ पर्यंत भाजी विकणं. एक दिवस सुट्टी घेत नसे. अग मयुरी बरं नाही आज नको जाऊ. अहो आज गेले नाही तर कसे होईल मुलांचे सर्व फी कसे भरता येतील. तिचं हे रोजच होत. तिला तिचा एकच ध्यास होता. मुलांचे शिक्षण पूर्ण करणे. त्यांना साहेब होताना पाहायचंय होत. आज सगळे साहेब झाले होते. भाजी विकणाऱ्या बाईला कोन विचारेल. भाजीवाली रस्त्यावर बसणारी. भाजीवाली मात्र आई होती ही मुलं विसरली होती. आईला मुलं विसरु शकतो . चालायला शिकवले. बोलायला शिकवलं. जीवनात उभा राहायला शिकवलं. सगळं काही शून्य होते. सतीश विचार करून वेडा होण्याची पाळी आली. आहे का कोणी घरी कोण आहे." अरे मी वैभव."
"ये बाबा आत. कसा आहेस. हे हे बघ सगळं असं आहे. जीवनात खूप कष्ट केलं खूप मेहनत घेतली. मुले खूप शिकली. गर्वाने मान ताठ झाली. सगळे म्हणत तुझे मुलांनी पांग फेडले. आता नोकरीला लागले पैसाच पैसा. बघितला वैभव किती पैसा घरात आहे. आज औषधालाही पैसे नाही. मुलं ढुंकूनही पाहत नाहीत. प्रत्येकाला वाटतंय दुसरा बघेल. दुसरा म्हणतो तिसरा बघेल. आम्ही असं केलं का , मुलांमध्ये सर्वांना सारखे शिक्षण दिलं. मग आमच्याच वाट्याला असं का. आता खूप विचार केलाय मी. मी केस करणार आहे. त्यांना चांगलाच धडा शिकवणार आहे. आपली मुलं म्हणून खूप गप्प बसलो. पण आता गप्प बसणार नाही. औषधाचा खर्च मागणार आहे मी." वैभव शांतपणे ऐकत होता. "तू शांत हो सतीश."
"कसा होऊ शांत
ती मरण यातना भोगत आहे. आणि त्या यातनेतून सोडवण्यासाठी माझ्याकडे पैसा नाही. किती दुर्भाग्य आहे आमचं. काय पाप केलं होतं मी. जी शिक्षा मिळाली. माझे जीवन शून्य आहे मागे व पुढे सगळच कसं शून्य झाले". वैभव ने खूप समजावले. तो निघून गेला. रात्रीची वेळ होती. कुत्रे भुंकत होती. रातकिड्यांनी आवाज चढवला होता. तिचा श्वास वर खाली होत होता. जणू यम तिला घेण्यासाठी येत होता. परी म्हणत होती. "चल मयुरी या त्रासातून मुक्त हो तुला नेण्यासाठी मी आले आहे. मुलं-बाळं सगळी मोहमाया आहे. यातून तू मुक्त हो. चल. टाकसगळं विसरून. नाही माझे ते एकटे राहतील. तू सगळं सोडून निवांत चल. तुला वेदना होणार नाहीत आरामात झोप येईल. चल मी घ्यायला आले." मयुरी पुटपुटताना दिसत होती. पंकज दीपक असे म्हणत होती. तितक्यात वारा सुटला. जणू वादळ सुटले आहे असे वाटत होते. लाईट गेली. सगळीकडे अंधार झाला होता. सतीश अरे ज्योत तरी लाव. वैभव म्हणाला अरे जीवन सगळं शून्य झाले. ज्योतही शून्य . शून्य ज्योत.