शोध आनंदाचा
शोध आनंदाचा
कालच मला मिळालेल्या किंमती भेटवस्तूंमुळे मी खूप खुश होते. दहा बारावेळातरी त्यावरून हात फिरवून बघत होती! हिरे मढवलेला सोन्याचा नेकलेस, कानातले व अंगठी, एकदम भारी, समोरचापण खूश किंमती दिसणार्या भेटवस्तू दिल्या म्हणून!
माझ काम फक्त कुठे जातांना मालकिणीला सोबत करायची, सिक्युरीटी टाईप! कोणी तीला त्रास देऊ नये म्हणून, तीचा नवरा सिनेमात हिरो म्हणून काम करतो, अन ही बया किटी पार्टी, किंमती वस्तू घालुन फिरण्यात!
मी जास्त शिकली नाही पण इंग्रजी बोलता येत, सिग्नलवर भिक मागत असतांना, मलि आईवडील कोणी नाही, लहानाची मोठी अशीच फुटपाथावर भिकारांच्या वस्तीत गेलेल...
मला ते आवडत नव्हत पण दुसरे काही समोर करायला नव्हतं म्हणून करत राहिले, नाही म्हणायला माझ्याचसारखे अनाथ भिग मागणारे सोबतच मोठे लहानाचे मोठे झालेलो.. सोबतच मिळेल ते वाटून खाणारो.. एकमेकांना मदत करणारो, लहान लहान गोष्टीत आनंद शोधणारो..
सिग्नलच आमच जग, शाळा जाणार्या येणार्यांचे बोलने एकून इंग्रजी बोलन शिकले, बघता बघता चांगल इंग्रजी बोलता येत गेले, राहणीमान पण व्यवस्थित, कोणी मी भीक मागणारी मुलगी आहे हे हात पसरे पर्यंत समजायच नाही!
सिग्नलवर काही तृतीयपंथीपण असायचे, मला त्यांची भिती वाटायची, मग बाजूला ऊभे राहायचे!
त्यातल्या एका ने हे हेरले, नविनच तो आला होता त्यांच्यात! तो ह्या कामा बरोबर हिरो कडे सिक्यूरीटी म्हणून काम करायचा!
मला म्हणाला, भिक मागण्यापेक्षा सिक्युरीटीच काम करणार का? तसे ही मी काही नविन काम करता येईल का पाहतच होती.. पण पटकन नविन माणसावर विश्वास कसा ठेवणार? तसे भिक मागतांना माणस वाचायला ही शिकले.. तसे ह्याच बोलण व वागणे ठिक वाटत होते..
मी हो म्हटले सिक्युरीटीचे काम करायला, मग त्याच्या हिरोच्या घरी मालकिणीला बाहेर जातांना सोबत कराच काम मिळाले! मी खूश झाले, वेगळ काम करण्याच मी शोधतच होते. ते आज शोधले व मिळवले!
त्याची सोबत कामावर असतांना होतीच..
तोपण काळजी घेत होता माझी! मला ही त्याची सोबत आवडायची, आनंदी असायची मी तो आजूबाजूला असतांना! त्याला ही आवडत असेल अस वाटतं
दिवाळी सण आला, तेंव्हा ह्याने मला भेट वस्तू दिली, कोणीतरी आपल्याला भेटवस्तू दिली ह्यातच मी खूश होते, आपल कोणी असाव अस वाटत होतं. शोध आनंदाचा अश्या कुठेतरी मनात करत होती व तो मला मिळाला!
