Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Sangieta Devkar

Tragedy


5.0  

Sangieta Devkar

Tragedy


शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरी

शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरी

5 mins 661 5 mins 661

स्थळ --- आमदार दादासाहेब यांचे घर

  

आज दादासाहेबांच्या घरी सकाळपासूनच लगबग सुरू होती, त्यांचा एकुलता एक मुलगा हरीश अमेरिकेहुन एम एस करून भारतात परत येणार होता. त्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू होती. आईसाहेब मुलाच्या येण्याने खूप खुश होत्या. थोड्या वेळात हरीश आला. त्याचे जंगी स्वागत झाले. आमदार साहेबांचे मित्र, मोठमोठे उद्योगपती, हरीशचे मित्र सगळेच आले होते. गप्पा मारत मजेत सगळे मेजवानीचा आनंद घेत होते. दादासाहेब प्रत्येकाला आपला मुलगा किती हुशार आहे आणि आज तो इतका मोठा सर्जन झाला. आता मोठे हॉस्पिटल त्याला काढून देणार असेच सांगत होते, मुलाचे कौतुक करत होते. मुलगा कायम आपल्या आज्ञेत असल्यामुळे आज तो या उंचीवर आहे हेच ज्याला त्याला सांगत होते.


हरीशने ही गोष्ट नोटीस केली. त्याने मनातच ठरवले एकदा बाबांशी बोलायला हवे. रात्र फार झाली होती. दादासाहेब हरीशला म्हणाले हरीश आता तू आराम कर जा. दमला असशील. नाही बाबा पण मला थोडे बोलायचे होते. अरे आता खूप उशीर झाला आहे, उद्या बोलू म्हणत, त्यांनी हरीशला गुड नाईट केले.


सकाळी नाष्ट्याच्या वेळी हरीशने विषय काढला

म्हणाला, आई बाबा मला माझ्या करियरविषयी बोलायचे आहे.


दादासाहेब म्हणाले, बोल कुठे आणि किती मोठे हॉस्पिटल काढायचे आहे तुला?


बाबा हॉस्पिटल तर मला काढायचे आहे पण ते पूर्ण चॅरिटेबल हॉस्पिटल असेल. मी नाममात्र शुल्क घेऊन गोरगरिबांना माझी सेवा देणार आहे. ज्यांची परिस्थिती नसेल अशा लोकांना मी अगदी मोफत सेवा देणार आहे.


तसे दादा साहेब म्हणाले, तुला समजते का हरीश तू काय बोलतोस? अरे तुझ्या शिक्षणासाठी इतका खर्च केला, फॉरेनला तुला एम एस साठी पाठवले ते काय असे फुकटात लोकांना सेवा देण्यासाठी नाही. 


बाबा पण मला पैशाचा सोस नाही. मला माझ्या कामाचे चीज करायचे आहे. आज कितीतरी गरीब असहाय्य लोक पैशाअभावी वैद्यकीय सेवा मिळवू शकत नाहीत, खेडोपाड्यातील लोक, गरोदर स्त्रिया या योग्य ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडत आहेत. चॅरिटेबल हॉस्पिटल काढणे हे माझे स्वप्न आहे बाबा.


नाही हरीश तू चुकतो आहेस. अशा तुझ्या वागण्याने तू कंगाल होशील. मी तुला यासाठी शिक्षण दिले नाही.


पण बाबा तुम्ही पण राजकारणात आहात, तुम्ही गरजूंना आपल्या फ़ंडातून मदत करता ना? गरिबांचे प्रश्न, समस्या सोडवता तसेच माझेही काम मला विनामोबदला करायचे आहे.


हरीश आम्ही लोकांना मदत करतो पण सरकारच्या पैशातून, स्वतःचा खिसा रिकामा करून नाही. फक्त खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात हे ज्याला जमलं तोच आयुष्यात पुढे निघून जातो. तुझ्यासारखा विचार मी केला असता ना तर तू इतका शिकला नसतास, तेव्हा हा विचार डोक्यातून काढून टाक आणि भरपूर पैसा कमव.


हरीश म्हणाला, बाबा मला तुमचे म्हणणे पटत नाही. माझी तत्वं खूप वेगळी आहेत.


तसे मध्येच आई म्हणाल्या, हरीश अरे बाबा बरोबर बोलत आहेत. तू म्हणतोस तसे चॅरिटेबल हॉस्पिटल आहेत आपल्या शहरात, तिथे जातील लोक, तू का असा हट्ट करतो आहेस?


आई मी खूप वेगळा विचार करतो आहे. मी स्वार्थी नाही आहे आणि माझ्या कलेच्या जोरावर मला पैसा कमवायचा नाही.


दादासाहेब रागात म्हणाले, ठीक आहे हरीश. तुला जर भिकेचेच डोहाळे लागले असतील तर आमचा नाईलाज आहे. तेव्हा तुझा मार्ग वेगळा आणि आमचा वेगळा. तुझ्या शिक्षणचा खर्च वाया गेला असे समजेन मी.


हरीश आई वडील आणि त्याचे ध्येय यांच्या कात्रीत सापडला!!

...............................


स्थळ -- प्रतिष्ठित समाजसेविका शमाताई यांचे घर


आई तुझा इंटरव्ह्यू कसा झाला? अमेय ने विचारले.

अरे छानच झाला, माझ्या कामाचं कौतुक करत होते सगळे.

गरजू आणि असहाय महिलांना मदत करणाऱ्या समाजात नावलौकिक मिळवणाऱ्या शमाताई यांचा आज इंटरव्ह्यू होता. समाजकार्यात स्वतःला त्यांनी अगदी झोकून दिले होते.


आई एक गोष्ट बोलायची होती, अमेय म्हणाला.


बोल काय काम आहे का?


तसा अमेय म्हणाला, हा आई माझे एका मुलीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचे आहे.


कोण आहे ती, काय करते?


आई तिचे नाव शर्मिला आहे. आई वडील आहेत तिला. माझ्याच ऑफिसमध्ये काम करते.


बरं मग तिला घरी घेऊन ये. मी भेटेन, शमाताई म्हणाल्या.


तसा अमेय म्हणाला,पण आई तिचा डिव्होर्स झाला आहे आणि एक मुलगा आहे तिला 3 वर्षांचा.


काय म्हणालास अमेय, शमाताई जोरात ओरडल्या. अरे जगातल्या सगळ्या मुली संपल्यात का? तुला काय म्हणून ही घटस्फोट झालेली मुलगी आवडली? वेड लागलंय का तुला?


आई अगं प्रेम आहे माझं तिच्यावर मग ती डिव्होर्सी आहे का विधवा आहे याचा मला फरक पडत नाही. प्रेमात जात पात धर्म, डिव्होर्सी, असे काही बघितले जात नाही कारण प्रेम प्रेम असतं नाहीतर तो स्वार्थ झाला असता.


अमेय बुद्धी भ्रष्ट झालीय का तुझी? अरे तू अजून सिंगल आहेस. तुला मुलगी ही तशीच हवी समजते का? 


पण आई मी तिला शब्द दिला आहे गेली 2 वर्षं आम्ही एकत्र आहोत आणि तू पण एक सोशल वर्कर आहेस ना तू तुझ्या भाषणात सांगतेस की विधवांचा पुनर्विवाह, घटस्फोटीत महिलेचा स्वीकार आजच्या तरुण मुलांनीही करायला हवा, तर समाज परिवर्तन होईल. यात त्या महिलांचा दोष काय... त्यांची चूक काय? मग आता कुठे गेले तुझे तत्वज्ञान?


अमेय समाजसेवा मी करते म्हणून बाहेरची घाण मी माझ्या घरात नाही आणणार. समाजसेवा बाहेरच्या बाहेर करायची ती घरापर्यंत आणायची नसते. आपण जे बोलतो तसेच वागले पाहिजे, असा काही नियम नाही समजले.


आई तू हे बोलतेस... मग समाजसेविका म्हणून समाजात मिरवतेस, मानसन्मान घेतेस त्याचं काय? अमेय काहीही झाले तरी मी हे लग्न नाही होऊ देणार... तुला आई हवी असेल तर त्या शर्मिलेला कायमचं विसर नाहीतर आईला विसरून जा.


अमेयला हे समजेना की समाजसेविका म्हणून सन्मानाने जगणारी आपली आई, तिचे खरे रूप कोणते? 

..................


स्थळ --- एक मध्यमवर्गीय कुटुंब

विराज कॉलेजमधून घरी आला.


आईने विचारले काय रे विराज ती मुलगी कशी आहे आता.


आई ठीक आहे ती पण खूप घाबरली आहे. पण त्या गुंड मवाली मुलांना शिक्षा व्हायलाच हवी.


काही सांगता येत नाही कोणावर काय प्रसंग येईल आई म्हणाली.


हुं... पण आई आम्ही सगळे उद्या पोलीस चौकीत जाणार आहोत आणि त्या मुलांविरुद्ध साक्ष देणार आहोत.


विराज असे काहीही करू नकोस. बाकीच्या मुलांना जाऊ दे पण तू मात्र नको या फ़ंदात पडू. तो पोलीसांचा ससेमिरा.


आई अगं भर कॉलेजमध्ये एका मुलीचा विनयभंग होतो आणि आम्ही सगळं बघून पण काहीच करायचं नाही का? त्या मुलीची चूक काय त्यात? कोणीतरी गुंड येतो आणि मुलीची छेड काढतो तिला लज्जास्पद वागणूक देतो आणि आपण फक्त बघ्याची भूमिका घ्यायची का?


पण विराज तू काही पाहिलेच नाही असे सांग मग झालं तर!


आई असे कसे बोलतेस त्या मुलीच्या जागी आपली वैशू पण असू शकते ना?


ती नाही ना आपली मुलगी मग नको इतका विचार करुस...


बाबा आले तेव्हा घरात म्हणाले, काय वाद चाललाय इतका?


विराजने सगळं बाबांना सांगितलं.


बाबा आता तुम्हीच सांगा आईला... ती मला साक्ष द्यायला जाऊ नको म्हणते.


बाबा म्हणाले, सुचित्रा जाऊ दे विराजला, असं गप्प बसून राहिलो तर अजून किती मुली या अत्याचाराला बळी पडतील.


ते काही नाही विराज तुला माझी शपथ आहे. जायचे ना तुला पोलिस चौकीत... खुशाल जा पण आई ची शपथ मोडून जा....


विराज असहाय हताशपणे गप्प बसला !!! 


Rate this content
Log in

More marathi story from Sangieta Devkar

Similar marathi story from Tragedy