Madhuri Sharma

Drama

4.0  

Madhuri Sharma

Drama

शेवटची भेट

शेवटची भेट

5 mins
247


हँलो, प्राजु आत्या बोलतेय गं

हा, आत्या बोल गं काय म्हणतेस?

अगं आदित्य आलाय आज सकाळी पुण्याहुन

अच्छा बरं त्याला सांग संध्याकाळी घरीच राहायला मी येईन त्याला भेटायला. बरं तो येतोय हे स्टेटस सुध्दा टाकलं नाही व्हॉटस्पला त्याने यावेळी.

प्राजु अगं तो आला ना तेव्हापासुन खुप उदास आहे. मी काय म्हणते तू आत्ताच ये ना घरी, मला नाही पण तुला सांगेल तो काय झालं ते?

बरं, तु मस्तपैकी चहा टाक मी येतेच...

आई...

मी जया आत्याकडे जातेय.. यायला उशीर होईल

        आदित्य माझा मित्र सध्या पुण्यात नोकरी करतोय. गेल्या वर्षी सी.ए झाला तोपर्यंत त्याचं वागणं, बोलणं,राहणं व्यवस्थित होतं पण नोकरी लागल्यापासुन त्याच्या स्वभावात मला प्रचंड बदल जाणवत होता. मी खुप वेळा त्याच्याशी अप्रत्यक्षपणे बोलण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी तो मला टाळून द्यायचा. आज मात्र काय ते मला जाणुन घ्याचंच होतं. असं कोणाला न सांगितल्याने स्वताःच्या मनाला खाऊन त्रास वाढवुन घेण्यात काय अर्थ आहे?

              आत्या... कुठे आहेत राजे?

अगं प्राजु बरं झालं बाई तु आलीस. एकतर आज तुझे काका पण नाही घरी.. त्यात मला ही महत्वाच्या मिटींगला जायचं आहे आणि हा तुझा मित्र काय माहित कसल्या टेन्शन मध्ये आहे? विचारलं तर एकच - काही नाही गं आई जरा कामाचं टेन्शन आहे. आम्ही पण केल्या नोकऱ्या आम्हाला कळत नाही का काय ते?

आत्या अगं तु नको टेन्शन घेऊ मी बोलते त्याच्याशी. मला ही जरा त्याचा बेत बघायचाच आहे. बरं झालं तु मला बोलवुन घेतलं ते, तु जा अगं तुझ्या मिंटींगला मी बघते काय ते...

आदी...

काय रे कसा आहेस तु?

आदी अरे तुझ्याशी बोलतेय ना मी कसल्या विचारात आहेस एवढा?

(अगदी ओरडुनच म्हणाला )

तुम्ही मुली स्वतःला काय समजता गं? का म्हणुन कुणाच्याही भावनांशी खेळता, कोणी दिला तुम्हाला हा हक्क?

अअरेरेरे.... हो हो काय झालंय एवढं, कोण खेळतंय तुझ्या भावनांशी? न ओरडता शांततेत व्यवस्थित बोलशील का काय झालं ते?

प्राजु, आय एम सॉरी, मी ओरडलो तुझ्यावर....

ते जाऊ दे, कोण आहे ती? खुप प्रेम करतो ना तिच्यावर, कोण आहे कोण ती?

प्राजु तु रागवणार नाहीस ना?

म्हणजे आदि? तु नीट सांगशील मी रागवेल असं काय आहे त्यात,

प्राजु, माझ्या टेन्शनचं कारण गेल्या वर्षभरापासुन तु आहेस.

मी? आदि तु काय बोलतोय कळतंय ना तुला?            

गेल्या वर्षभरापासुन आपण आज भेटतोय आणि मी फोन केल्यावर तु काहीतरी कारण देऊन माझ्याशी नीट बोलायचा सुध्दा नाहीस आणि मी स्वतःला काय समजते? मी तुझ्या भावनांशी खेळले? काहीही मनात आलं ते बोलु नकोस प्लीज.

प्राजु, खरं ऐकायची ताकद आहे तुझ्यात?

आदि तु बोल आज माझी तयारी आहे ऐकायची. काय ते कळू दे मला

प्राजु, तुला आठवतं गेल्या वर्षी तुझ्यासाठी एक स्थळ आलं होतं आणि काय म्हणुन नकार दिला होतास तु? आठवतंय का तुला?

आदि,अरे तुला कसं माहित ते?

ते जाऊ दे गं तु मी विचारलं त्या प्रश्नाचं खरं काय ते उत्तर दे.

खरं म्हणजे मी खोटं बोलेल का तुझ्याशी?

मला आई-बाबांचा फोन आला होता ते स्थळ कोणाचं होतं ते मला माहित नाही, आई एवढच म्हणाली होती की मुलगा माझ्यासाठी परफेक्ट आहे, पण त्याच्या काही अटी आहेत-

मुलीला सासु-सासऱ्यांबरोबर रहावं लागेल वेगळं रहायचं शक्य होणार नाही.

घरातील वातावरण खराब होईल असं वागायचं नाही.

लग्नानंतर नोकरी करायची पण त्याचा परिणाम घरातील जबाबदाऱ्यांवर होणार नाही याची काळजी घ्यायची.

खोटं बोलायचं नाही. एवढ्या अटी आहेत मुलाच्या जर तुला या अटी मान्य असतील तर पुढे तो मुलगा विचार करेल. खरं म्हणजे त्या मुलाच्या अटी ऐकल्यावर मी आई ला म्हटलं- हा मुलगा कुठल्याही अर्थाने माझ्यासाठी परफेक्ट नाही.

एकत्र कुंटुंबात रहायचं म्हणजे स्वतःच मन मारून जगायचं ते मला जमणार नाही. स्वतःच करिअर सोडुन घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळायला मला जमणार नाही. वाद, भांडणं, कुठल्या घरात होत नाही ते होणारच नाही, ही शाश्वती मी लग्नाच्या आधीच कशी देऊ शकते?

तु त्या मुलाच्या आईवडीलांना सांग या जन्मात तरी त्यांच्या मुलाचं लग्न होणार नाही. कुठल्या काळात जगतोय तो मुलगा काय माहित, आई मी त्या मुलासोबत लग्न तर फार लांब साधी ओळख सुध्दा ठेवणार नाही. नंतर या विषयावर आमचं काही बोलनं झालं नाही. हो पण मी जेव्हा ही घरी यायचे तेव्हा बाबा मात्र म्हणायचे त्या मुलाला एकदा भेट तरी, भेटल्यावर व्यवस्थित बोलल्यावर कळेल तुला त्या मुलाबद्दल, न भेटता मत बनवु नकोस पण मी दुर्लक्ष केलं त्याचं बोलनं. पण या सगळ्यांचा तुझ्याशी काय संबंध आहे?

प्राजु तुला अजुन नाही कळंल का? अगं वेडाबाई माझं स्थळ होतं ते. मी च आहे तो मुलगा.

माझ्या पायाखालुन जमीनच सरकली. विश्वासच बसत नव्हता स्वतःवर. मी आदित्यला लग्नासाठी नाही म्हणाले होते.

प्राजु, मला कधी वाटलंच नव्हतं तुझे विचार असे आहेत. आई-बाबांनी नाही हं मला हे सांगितलं तुझ्या आईने फोन करून सांगितलं मला, हे सर्व ऐकल्यालर बधिर झालो होतो मी.

ऐरवी मी नसतांना माझ्या आई-बाबांची मनापासुन काळजी घेणारी प्राजु खरी की ही प्राजु?

मन म्हणत होतं अर्थात आई- बाबांना जीव लावणारी प्राजु खरी आहे पण मेंदू म्हणत होतं तिच्या आईने सांगितलं ती प्राजु खरी आहे. मी तुझ्या आईला म्हणालो काहीही झालं तरी प्राजूला सांगु नका माझं स्थळ आलं होतं, तिच्यासाठी मी योग्यवेळी सांगेन तिला.

आदि, तू आज का सांगतोय मला हे सगळं? प्राजु, माझं प्रेम आहे तुझ्यावर. पण माझा गोंधळ होतो तुझ्या बाबतीत मला भीती वाटते तुझी, पण आता मला खुपच त्रास होत होता या सर्वांचा. मी एवढे दिवस वाट बघितली तूझी आज ना उद्या तु मला तुझ्या प्रेमाची कबुली देशील, पण नाही. तु नेहमी एका चांगल्या मैत्रीणी सारखीच माझ्यासोबत वागत होती. ज्याचा मला आणखीणच त्रास होत होता. पर्वा जेव्हा आई म्हणाली की तुझ्या लग्नाचं विचार चालु आहे तेव्हा मला रहावलं नाही मी लगेच इथे निघुन आलो. आईला सांगितलं तुला बोलवायला आणि तु आली.

आदि, माझं तुझ्यावर प्रेम आहे का नाही ते मला माहीत नाही हो पण एक गोष्ट नक्की मी आत्या आणि काकांची काळजी मात्र मनापासुन घेतली. आणि हो मी "त्या" मुलाला नकार दिला, तुला नाही हं. मला माहीतचं नव्हतं तो मुलगा तुच आहेस, तुझ्यासाठी फक्त चार अटी काय तु म्हणाला असता ते सर्व काही मी मान्य केलं असतं. पण.....

पण काय प्राजु?

आदि, मी तुझ्याशी लग्न करू शकणार नाही.

अगं का पण? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये.

एवढीशी गोष्ट सांगायला तुला वर्ष लागलं... तेही आपण चांगले मित्र असतांना, तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि हो प्लीज आपल्या माणसांजवळ व्यक्त व्हायला शिकुन घे..

ही तुझी माझी शेवटची भेट इथुन पुढे आपला काही संबंध नाही आणि हो माझं फक्त तुझ्यावरच प्रेम होतं म्हणुन मी त्या मुलाचं स्थळ नाकारलं होतं मला तु हवा होतास.. तो नाही. म्हणुन मी त्या स्थळाला नकार दिला होता तुला नाही हं त्या मुलाला........

प्राजु, आय एम सॉरी...

आदि, आता खुप उशिर झाला आहे....


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama