Madhuri Sharma

Romance Inspirational

3  

Madhuri Sharma

Romance Inspirational

प्रेम हे बावरे....

प्रेम हे बावरे....

2 mins
409


विशाल एक चांगला समजुतदार मुलगा होता. त्यांचं आता लग्नाचं वय होतं. त्याला त्याच्याच शेजारी राहणारी सुधा फार आवडायची. ती दिसायला फार सुंदर होती.

सुधाला ही विशाल फार आवडला होता. त्यांनी भेटून लग्न करण्याचा निर्णय घेतला.

विशालने आपल्या आवडत्या सुंदर मुलीशी म्हणजेच सुधा सोबत च लग्न केले. त्याचे तिच्यावर खूप प्रेम होते. एके दिवशी सुधा घरी परत येत असताना तिला एका सापाने चावले, ते साप विषारी नव्हते पण त्या नंतर तिला त्वचेचा आजार झाला. हळूहळू तिचे सौंदर्य कमी होऊ लागले.


त्याच दिवशी तिच्या नवऱ्याला कामानिमित्त परदेशी जावे लागले तो तिला एकटीला सोडून गेला. परत येत असताना त्याचा अपघात झाला आणि त्याची दृष्टी गेली. मात्र त्यांचे वैवाहिक जीवन आधी प्रमाणेच सुरळीत सुरू होते.


पण जसजसे दिवस जात होते तसतसे सुधा ने तिचे सौंदर्य हळूहळू गमावले. आंधळ्या विशालला हे माहित नव्हते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात काही फरक पडला नाही. तो तिच्यावर सतत प्रेम करत होता आणि तिचेही त्याच्यावर प्रेम होते.


एके दिवशी तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने त्याला मोठा त्रास झाला.

त्याने तिचे सर्व शेवटचे हक्क संपवले आणि त्याला ते गाव सोडायचे होते.

मागून एका माणसाने हाक मारली आणि म्हणाला, आता तुला एकटा कसा चालणार? इतके दिवस तुझी बायको तुला मदत करायची....

विशालने त्या माणसाला उत्तर दिले, तो म्हणाला-

मी आंधळा नाही. मी इतके दिवस अभिनय करत होतो, कारण जर सुधा ला कळलं असतं की तिला त्वचेचा आजार आहे हे मला माहीत आहे, तर तिला तिच्या आजारापेक्षा जास्त त्रास या गोष्टीचा झाला असता. म्हणून मी फक्त आंधळा आहे असं म्हणून वागलो. ती खूप चांगली पत्नी होती. मला फक्त तिला खुश ठेवायचे होते.


तात्पर्य -


कधी कधी आपल्या माणसांच्या आनंदासाठी आंधळेपणाने वागणे किंवा त्यांच्या उणीवाकडे दुर्लक्ष करणे गरजेचे असते....



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance