Madhuri Sharma

Inspirational Others

3  

Madhuri Sharma

Inspirational Others

जिवंत

जिवंत

3 mins
217


शाळेतील चार जिवलग मित्रांची डोळ्यात पाणी आणणारी कथा आहे. ज्यांनी त्याच शाळेत एसएससी पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यावेळी त्या शहरात एकमेव आलिशान हॉटेल होते.

दहावीच्या परीक्षेनंतर त्यांनी ठरवलं की आपण त्या हॉटेलमध्ये जाऊन चहा-नाष्टा करू. चौघांनी जेमतेम चाळीस रुपये जमा केले, रविवार होता, साडेदहा वाजता सायकलने हॉटेल गाठले. चहा-नाश्ता करता करता दिनेश, संतोष, मनीष आणि प्रवीण बोलू लागले. चौघांनीही एकमताने ठरवले की पन्नास वर्षांनी आपण पुन्हा या हॉटेलमध्ये १ एप्रिलला भेटू.

तोपर्यंत आपण सर्वांनी कठोर परिश्रम घेतले पाहिजे, यात कोणाची किती प्रगती होते हे पाहणे मनोरंजक ठरेल.

त्या दिवशी जो नंतर हॉटेलमध्ये येईल त्या आलेल्या मित्राला त्या वेळेचे हॉटेलचे बिल भरावे लागेल. कालू हा वेटर ज्याने त्यांना चहा-नाश्ता दिला होता, तो हे सर्व ऐकत होता, तो म्हणाला की मी इथे राहिलो तर तुमची या हॉटेलमध्ये वाट पाहीन. चौघेही पुढील शिक्षणासाठी वेगळे झाले.

  दिनेशच्या वडीलांची बदली झाली तेव्हा तो शहर सोडून गेला होता, संतोष पुढील शिक्षणासाठी त्याच्या मामाकडे गेला होता, मनीष आणि प्रवीणला ही शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. दिवस, महिने, वर्षे सरली....  

पन्नास वर्षांत त्या शहरात आमूलाग्र बदल झाला, शहराची लोकसंख्या वाढली, रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो यांनी शहराचे स्वरूपच बदलून टाकले. आता ते हॉटेल पंचतारांकित हॉटेल झाले होते, वेटर कालू आता कालू सेठ बनला आणि या हॉटेलचा मालक झाला.. पन्नास वर्षांनंतर, ठरलेल्या तारखेला, ०१ एप्रिलला दुपारी एक आलिशान कार हॉटेलच्या दारात आली. दिनेश गाडीतून उतरला आणि पोर्चच्या दिशेने चालू लागला, दिनेशचे आता तीन ज्वेलरी शोरूम आहेत.. दिनेश हॉटेल मालक कालू सेठ यांच्याकडे पोहोचला, दोघेही एकमेकांकडे बघतच राहिले. कालू सेठ म्हणाले की प्रवीण सरांनी तुमच्यासाठी महिनाभर आधी टेबल बुक केले आहे.. दिनेशला खूप आनंद झाला की तो चौघांपैकी पहिला आहे, त्यामुळे त्याला आजचे बिल भरावे लागणार नाही, आणि यासाठी तो त्याच्या मित्रांची चेष्टा करणार.

तासाभरात संतोष आला, संतोष शहराचा मोठा बिल्डर झाला. त्याच्या वयानुसार तो आता म्हातारा ज्येष्ठ नागरिक दिसत होता. आता दोघे बोलत होते आणि इतर मित्रांची वाट पाहत होते, तिसरा मित्र मनीष अर्ध्या तासात आला.. त्याच्याशी बोलल्यावर दोघांना कळलं की मनीष बिझनेसमन झालाय..

तिन्ही मित्रांची नजर पुन्हा पुन्हा दाराकडे जात होती, प्रवीण कधी येणार..? एवढ्यात कालू सेठ म्हणाले की प्रवीण सरांचा मेसेज आला आहे, तुम्ही चहा नाश्ता करा, मी येतोय..

पन्नास वर्षांनी एकमेकांना भेटून तिघेही खूश होते. तासनतास विनोद चालला, पण प्रवीण आला नाही.. क हजर झाला नाही, बिल विचारताच तिघांना ही उत्तर मिळाले की ऑनलाइन बिल भरले आहे..

     संध्याकाळी आठ वाजता एक तरुण गाडीतून उतरून जड अंत:करणाने त्या निघण्याच्या तयारीत असलेल्या तिघं मित्रांजवळ आला, तिघेही त्या युवकाकडे बघतच राहिले. तरुण म्हणू लागला, मी तुमच्या मित्राचा मुलगा रवी आहे, माझ्या वडिलांचे नाव प्रवीण भाई आहे. वडिलांनी मला आज तुमच्या येण्याबद्दल सांगितले, ते या दिवसाची वाट पाहत होते, पण गेल्या महिन्यात एका गंभीर आजाराने त्यांचे निधन झाले..त्यांनी मला तुम्हाला उशिरा भेटायला सांगितले, मी लवकर आलो तर ते तुम्ही दु:खी होणार, कारण मी या जगात नाही हे कळल्यावर माझे मित्र हसणार नाहीत, आणि एकमेकांना भेटल्याचा आनंद गमावून बसतील. म्हणून त्यांनी मला उशिरा येण्याचा आदेश दिला..

त्यांनी मला त्यांच्या वतीने तुम्हाला मिठी मारण्यास सांगितले होते, रवीने त्याचे दोन्ही हात पसरवले......रवी म्हणाला, माझे वडील शिक्षक होते, त्यांनी मला कलेक्टर बनवले, आज मी या शहराचा कलेक्टर आहे. सर्वजण आश्चर्यचकित झाले, कालू सेठ म्हणाले की आता पन्नास वर्षांनी नाही तर दर पन्नास दिवसांनी आपण आपल्या हॉटेलमध्ये पुन्हा पुन्हा भेटू, आणि प्रत्येक वेळी माझ्याकडून एक भव्य पार्टी होईल.. नातलगांना भेटत राहा, मित्रांना भेटण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहू नका, विभक्त होण्याची पाळी कोणाची येते हे कळतही नाही. कुटुंबासोबत रहा, जिवंत असल्याचा आनंद अनुभवा



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational