Madhuri Sharma

Inspirational

3  

Madhuri Sharma

Inspirational

भीतीची शाखा नष्ट करु या...

भीतीची शाखा नष्ट करु या...

2 mins
180


एकदा एक राजा होता ज्याला दोन भव्य ससाणे भेट म्हणून मिळाले होते. राजाने आजपर्यंत पाहिलेले सर्वात सुंदर पक्षी होते ते. त्याने ते मौल्यवान पक्षी त्यांच्या योग्य प्रशिक्षकाकडे प्रशिक्षित करण्यासाठी दिले.


     महिने लोटले, आणि एके दिवशी प्रमुख प्रशिक्षकाने राजाला कळवले की एक ससाणा आकाशात उंच उडत आहे पण तो दुसरा ससाणा आल्याच्या दिवसापासून त्याच्या फांदीवरून हलला नाही.


राजाने सर्व देशातून त्या ससाण्याला बरे करणारे तज्ञ त्याची काळजी घेण्यासाठी बोलावले, परंतु कोणीही त्या पक्ष्याला उडवू शकले नाही.....

 

 त्याने हे काम आपल्या दरबारातील सदस्यासमोर मांडले, परंतु दुसऱ्या दिवशी राजाने राजवाड्याच्या खिडकीतून पाहिले की तो पक्षी अद्याप त्याच्या झाडाच्या फांदीवरून हलला नाही.


  बाकी सर्व काही करून पाहिल्यावर राजाने स्वतःशीच विचार केला, "या समस्येचे स्वरूप समजून घेण्यासाठी मला कदाचित ग्रामीण भागातील अधिक परिचित व्यक्तीची आवश्यकता असेल." म्हणून तो आपल्या दरबारात ओरडला, “जा आणि एक शेतकरी घेऊन या.”


सकाळी, राजवाड्याच्या बागेतून उंच उंचावर उडत असलेल्या ससाण्याला पाहून राजा रोमांचित झाला. 

तो त्याच्या दरबारात म्हणाला, "हा चमत्कार करणार्‍याला माझ्याकडे आणा."


दरबाराने पटकन त्या शेतकऱ्याला शोधून काढले, तो राजासमोर येऊन उभा राहिला. राजाने त्याला विचारले, "तुम्ही त्या पक्ष्याला कसे उडवले?"


मस्तक नतमस्तक करून शेतकरी राजाला म्हणाला, “महाराज, हे खूप सोपे होते. मी फक्त ती फांदी कापली जिथे तो पक्षी बसला होता."


आपण सर्वजण उंच उड्डण्यासाठी बनलेले आहोत. माणूस म्हणून आपल्यात अविश्वसनीय क्षमता आहे गरज आहे त्याची जाणीव करून घेण्याची. परंतु कधीकधी आपण आपल्या फांद्यावर बसतो, आपल्याला परिचित असलेल्या गोष्टींना चिकटून बसतो. आपण नेहमी परिचित, आरामदायक आणि सांसारिक गोष्टींचाच विचार करतो. त्यामुळे बहुतांश भागांसाठी, आपले जीवन रोमांचकारी होण्याऐवजी आणि परिपूर्ण होण्याऐवजी सामान्य बनून राहून जाते . 


आपण भितीची फांदी नष्ट करायला शिकूया आणि स्वतःला उडण्याच्या मर्यादेतुन मुक्त करूया!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational