sairam sonawane

Abstract Inspirational Others

4.0  

sairam sonawane

Abstract Inspirational Others

शेतकरी जगाचा पोशिंदा

शेतकरी जगाचा पोशिंदा

2 mins
263


" शेतकरी जगाचा पोशिंदा आहे" कोणी सहमत असो वा नसो...तो शेतकरी कधी कोणाच्या सहमतीची आवश्यकता देखील ठेवत नाही.

तो फक्त ,स्वतः चा विचार न करता रात्री बेरात्री शेतात पाणी भरतो तसेच ऊन्हापावसा चा विचार न करता फक्त

 "माझे भारतातील प्रत्येक भाऊ - बहीण पोट भरून जेवले पाहिजे" ह्या विचारा त मग्न होऊन बेधुंद पणे काम करत असतो.

  पूर्वीच्या काळी म्हणजे ज्या वेळी इंग्रज भारत सोडून गेले तेव्हा सर्व लोक शेतीच करायचे ...एकंदरीत स्वतंत्र भारताची संपूर्ण जनता ही शेतीवरच अवलंबून होती पुढे थोडा विकास झाल्यामुळे काही लोक नोकरी , व्यापार ह्या क्षेत्राकडे वळत होते....तरी देखील त्याकाळी सर्वोच्च दर्जा हा शेती , मध्यम दर्जा हा व्यापाऱ्यांना कनिष्ठ दर्जा हा नोकरी ला होता यावरून असे लक्षात येते की त्याकाळी "शेती हा प्रमुख व्यवसाय "आत्महत्या हा प्रकारच कोणाला माहित नव्हता.

मग थोड्या कालावधीनंतर काळ बदलत चालला होता

कामाच्या मोबदल्यात धान्याऐवजी पैसे द्यायचे सुरू झाले.

व्यापारी लोकांची ही चाल यशस्वी झाली आणि

पुढे "मालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांची आत्महत्या" यामुळे जगाचा पोशिंदा खचून गेला दुसऱ्या बाजूने विचार केला तर आपण सहज मोठया मॉल मध्ये गेलो आणि तेथील एखादी वस्तू आपणास आवडली तर आपण त्याचा भाव न बघता लगेच विकत घेतो.

आणि आठवडे बाजारात शेतकऱ्याकडून 10 रुपयाची भाजी 5 रुपयात मागतो....यावरून आपली विचारसरणी कितपत बरोबर आहे हे लक्षात येते.बळीराजाचं एकच म्हणणं आहे. मी खूप कष्ट करून मेहनत घेऊन सर्वांना आनंद देत आहे.तर माझ्या मालाला योग्य भाव का देत नाहीत

आज शेतकरी आपल्या शेतात धान्य पिकवतो, ध्यान काढतो त्यामुळे आज देशातील जनता 2 वेळच पोटभर जेवण करू शकते.शेतकरी जरी नेहमी नेहमी तीच काम करत असला तरी अन्न धान्य पिकवण्यामागची अनेक परिस्थितीला सामोरे जावे लागत असते.

कधी अतिवृष्टीने तर कधी अनेक समस्यांमुळे शेतकऱ्यांचे भरपूर असे नुकसान होतं असते.तरी तो न खचता शेतात राब-राबतो.

आपल्या देशाची अर्थव्यवस्था देखील त्यावरच टिकून आहे 

तरी,बळीराजा हा आत्महत्या करू नये व त्याच्या मालमत्तेला बाजारपेठेमध्ये योग्य दर मिळावा जेणेकरून आपल्या देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल.

 

"बळीराजा जगाचा पोशिंदा होता

आणि नेहमी राहणार"



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract