Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here
Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here

Jyoti gosavi

Inspirational Others


5.0  

Jyoti gosavi

Inspirational Others


शौर्य

शौर्य

2 mins 1.1K 2 mins 1.1K

"हा राकट देश मराठी नररत्नांची खाण

 इथे झुंजले शिवराय तळहाती घेऊनी प्राण"


हा सह्याद्री शुरांची, वीरांची ,खाण आहे "इथे गवताला देखील भाले फुटतात"

इथला प्रत्येक दगड या पराक्रमांना साक्षी आहे आणि अशीच याच मातीत जन्माला आलेली एक स्री म्हणजे झाशीची राणीलक्ष्मीबाई . त्यांच्या लढाईचं वर्णनच एका कवीने असं केलंय


राष्ट्राच्या कल्याणार्थ

कल्याणी करी कल्लोळ

ती प्रिय भारत भाग्यार्थ 

भागीरथी झाली लोल

आर्यांचे बघुनी हाल हालवी महि दिग्गोल

मर्दानी झाशीवाली परवशता पायाखाली

चिरडून निघे जयशाली

स्वातंत्र्याचा मनी ओढा

फेकीला तटातून घोडा

सबला तून अबला गेली


अशीही झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणजे मूर्तिमंत शौर्य ! जिचा उल्लेख ब्रिटिशांनी देखील "जोन ऑफ द आर्क "असा केला आहे

ज्या काळात राण्या पडद्याआड बसून दरबारी काम पहात होत्या .त्याकाळात राणी लक्ष्मीबाईने फक्त स्त्रियांची एक फौज तयार केली एका राणीने सर्वसामान्य महिलांमध्ये मिसळून त्यांना तलवारबाजी शिकवली, दांडपट्टा शिकवला, तोफ चालवायला शिकवली ,इतकंच काय पण दारुगोळ्याची ने-आण देखील त्यांच्या फौजेतील स्त्रिया करत होत्या आणि या गोष्टींचा उपयोग अठराशे सत्तावन च्या युद्धात झाला.

जनतेने विधवा राणीला दुर्लक्षित करू नये तिच्यावर भरोसा ठेवावा म्हणून त्या मर्दानी पोशाखात वावरत होत्या त्याने स्वतःची उर्दूमध्ये मोहोर तयार करून घेतली होती उर्दूत मोहर तयार करणे म्हणजे त्या राज्यावर चा कब्जा असा अर्थ होता.

 कंपनी सरकारला आव्हान देणाऱ्या काही मोजक्या मंडळींमध्ये राणी लक्ष्मीबाई होती. "सर ह्यूज रोज "ने देखील राणीचे कौतुक केलेले आहे. राणी अतिशय हिंमतवान धैर्यवान व शौर्यवान होती. स्वराष्ट्भिमान, देशाभिमान तिच्या ठासून भरलेला होता. परंतु फंद फितुरीने राणीचा घात केला 17 जून अठराशे अठ्ठावन ला ही शौर्याची मुर्तीमंत पुतळी इंग्रजा बरोबरच्या हातघाईच्या लढाईत धारातीर्थी पडली तेव्हा काळ सुद्धा क्षणभर थांबला स्तिमित झाला या गोष्टींचे वर्णन कविवर्य भा रा तांबे यांनी खालील शब्दात केले आहे


रे हिंदबांधवा थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली

मिळतील इथे शाहीर लववितील माना वीर ह्या दगडा फुटतील जिभा कथाया कथा सकळ काळी


Rate this content
Log in

More marathi story from Jyoti gosavi

Similar marathi story from Inspirational