शापित
शापित


उष्णता खूप वाढली होती. रस्त्यात लिंबूपाण्याचे गाड्या वाढल्या होत्या. विनोदला चक्कर आल्यासारखे झाले. तो पटकन घरी आला. त्याला एक भाऊ होता. आई-वडिलांना दोघेच. एकदम सुखात वाढलेले होते. मागायचा अवकाश की हातात मिळे. त्यामुळे त्यांना नाही ऐकण्याची सवय नव्हती. विनोदने घराची बेल दाबली. रामूने दार उघडले." रामू कितीवेळ दार उघडायला तुला. मला इथे चक्कर आल्यासारखे होते. जा लवकर लिंबू पाणी आण". तसा रामू धावतच स्वयंपाक घरात गेला. आणि लिंबू पाणी घेऊन आला. "आई आहेस कुठे ?"तो रडला. "आईसाहेब मंदिरात गेल्यात" रामू म्हणाला. विनोद ला आणखीनच राग आला. तेवढ्यात आई दारात उभी होती." आई मला चक्कर आली. तू एसी कार का नाही पाठवली. गर्मीने जीव जायचा वेळ आलाय माझा."
" अरे हो तू तसा फोन करायचा मला. किंवा गाडीवाल्याला केला असता तरी तो आला असता." आई म्हणाली. तो मात्र ऐकत नव्हता. त्याचं टोमणे सतत चालू होते. आई आत निघून गेली. "अरे आज दरवाजा उघडा आहे". करण म्हणाला
." मला चक्कर आली होती. म्हणून मी लवकर आलो." विनोद म्हणाला. "दादा तू आता बरा आहेस ना?" "असणार तुला काय त्याचं. तू एसी कार मधून आला असेल". "नाहिरे आम्ही मित्र मित्र रिक्षात बसून आलो". करण म्हणाला. विनोद आणखीनच भडकला. "मला चिडवतो का?". "अरे दादा खरच आम्ही रिक्षातून आलो."तो ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. एवढा सुंदर राजवाडा सारखा बंगला. नोकरचाकर घरात होते. घर तर फार सुंदर होतं. बंगल्यात जागोजागी अनेक स्टॅच्यू उभे केलेले होते. सुखाला मात्र गालबोट लागलेलं होतं. घरात कोणी सुखी नव्हते. दोघे मुले काहीच काम करत नव्हते. आई-वडिलांच्या पैशावर ऐश करत होते. मित्रांसोबत पार्ट्या करत
फिरत होते. आई वडील चिंतेत होते. आपल्यानंतर या मुलांचं होणार काय. आहे तोपर्यंत पैसा ठीक आहे त्यानंतर काय. मुले ऐकण्याच्या पलीकडे गेली होती. त्यांना आता कोणी सुधारू शकत नव्हते. व्यसनाधीन झाले होते. रामू काय करावं काही सुचत नाही रे "मालक देवाजवळ प्रार्थना करा एवढंच मी सांगेन. तुमच्या कुलदेवता ला जाऊन या.पडला तर पडला फरक." रामू म्हणाला.
" अरे असा काय चमत्कार घडणार आहे. पूर्ण वाया गेले ते मुलं. आमचा जीवही जात नाही. जिवंतपणे यांची चिंता जाळते आम्हाला". मालक म्हणाले.
"आवाज ऐकू आला.अरे सोड सोड मला." तसे मालक पळाले. मागोमाग रामू धावला.विनोद हातात चाकू घेऊन पळत होता. "अरे विनोद चाकू कशाला घेतला हातात. चाकू फेकून दे."
मालक म्हणाले.."मी चाकू फेकणार नाही. आज मी करण ला संपवणार. त्याच्या पोटातून घुसवणार. करण थांब. लपू नको. मी तुला शोधून मारणार." करण एका स्त्री स्टॅच्यू च्या मागे लपला. विनोदने करणला चाकूने वार केला. करनने त्याच्या हातातून चाकू हिसकावून घेतला. आणि त्याच्या छातीत खुपसला. दोघे रक्तबंबाळ झाले होते. वडिलांनी अंबुलन्स बोलवली. दोघांना दवाखान्यात नेले. दोघांनी प्राण सोडला. आई-वडील खूप रडू लागले. "आम्हाला त्यांनी खांद्यावरून यायला हवे होते. आज उलटे झाले आहे. आम्हीच त्यांना खांद्यावरून स्मशानभूमीत येणार आहोत. "आई हंबरडा फोडून रडत होती. "चुकले कुठे देवा माझ्या नशिबी हा भोग. सगळे ऐश्वर्या पण सुख नाही. मी चुकले कुठे मी चुकले कुठे. जणू मला शापच आहे. मला मुक्त कर."