शापित सौंदर्य
शापित सौंदर्य
अंगणातील ओकाबोका प्राजक्त आणि जमिनीवर पडलेली फुले पाहून तिच्या मनात विचार आला. स्वर्गातून पृथ्वीवर आणलेले हे झाड. पण काय त्याचे प्राक्तन. केशरी देठाची, सुगंधी पांढरीशुभ्र फुले. पण जन्मदात्रीचे सुख क्षणिकच.
पहाट होताच सुगंधी फुले टपटप गळणार. सुकुमार नाजूक, सुगंधाने सर्वांना वेड लावणारी फुले थोड्या वेळातच कोमेजणार. तिने हलक्या हाताने एकेक फूल उचलून ओंजळीत घेतले आणि म्हणाली - "हे स्वर्गामधले शापित सौंदर्य तर नव्हे.
