सात जन्माच्या गाठी
सात जन्माच्या गाठी
💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
मला लग्न करायचं आहे तुझ्यासोबत,पण माझ्या काही शर्ती आहेत. नांदायाच आहे तुझ्यासोबत पण माझा करार आहे. घेईल मीही सात फेरे तुझ्यासोबत, तूही दे सात वचने पाळण्याचा विश्वास मला. नाही सोडणार माझी सोबत राहशील एकनिष्ठ नेहमी, माझ्या ठेवलेल्या विश्वासासोबत कधीही खेळणार नाहीस न तु. राहुं दोघेही सुखा समाधानाने फक्त प्रेमाचा आधार आणि प्रामाणिक साथ तुझी हवी आहे.
करशील का वैवाहिक करार माझ्यासोबत तुझ्या घरच्यांना माझ्या घरी आणून मागणी घालण्याचा.मला मंडपात नवरी
बनवून नेण्याचा, तुझ्या नावाचे काळे मणी तुझ्या हाताने घालण्याचा आणि हो तुझ्या हाताने मला सिंदुर भरवशिल का. आपल्या मुलांची नावे आपल्या नावाचा अर्थ सांगणारे शोधण्यास मला तू मदत करावी आणि आपल्या या स्वप्नांना पूर्ण करताना आपल्या घरच्यांची साथ नी आशीर्वाद नेहमी मिळावा बस एवढाच करार असणार आहे माझा तू प्रेमाने तो स्वीकारशील न. देशील का हातात हात माझ्या कारण मला तुझ्या सोबत लग्न करून नांदायाच आहे.
तुझीच वाट पाहणारी तुझी सहचरणी
💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞