STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational Others

3  

Vasudha Naik

Inspirational Others

साक्षात्कार दिव्यत्वाचा

साक्षात्कार दिव्यत्वाचा

2 mins
264

    मी व माझे कुटुंब २०१६ मधे शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलो. रात्री पुण्यातून ११ वाजता बसलो सकाळी तिथे ८ वाजता पोहोचलो. तिथे आधीच रूम पाहून ठेवली होती. बुक केली होती. रूमवर गेलो फ्रेश झालो व नाष्ट्यासाठी बाहेर पडलो. एका गाडीवर भजी व वडापाव घेत असताना एका बाईने मला हात लावला. तिचे ओंगळ रूप पाहून जरा घाबरले .पण सावरलेही. तिने माझ्या बांगड्या, साडी, डोक्यावरून अती प्रेमाने हात फिरवला. सुखी राहा असे बोलली व वडापाव मागितला. मी पण तिला वडापाव दिला. मी माझा वडापाव घेतला व मागे वळून पाहिले तर ती वृद्ध बाई कुठेच दिसेना. खूप लांबवर नजर फेकली पण नाही. मनात आले आपण ज्याच्या दर्शनासाठी इथे आलो ते झाले!

   

नंतर आम्ही गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले भली मोठी रांग होती. पण दर्शन झाले. नंतर अन्नकोटमध्ये प्रसाद घेण्यासाठी गेलो, पण तिथे आमचा नंबर येईपर्यंत सर्व प्रसाद संपला होता. त्या दिवशी माझे पती बोलले प्रसाद घेतल्याशिवाय इथून जायचे नाही. मग आम्ही दुसर्‍या दिवशी पहाटे उठलो. महाराजांचे शांत वातावरणात बिना गर्दीचे मस्त दर्शन घेतले व आनंदसागर बाग पाहायला गेलो. तिथून जरा लवकरच परत देवळात आलो व प्रसादासाठी रांगेत उभे राहिलो. आता आमचा दहावा नंबर होता.


प्रसादाचा, अन्नकोटाचा दरवाजा उघडला गेला व कसे कोण जाणे तेथील एका माणसाने मला हाक मारली. मी थोडी चपापलेच. मला वाटले माझे काही चुकले की काय? मी जवळ गेले तर त्या गृहस्थाने माझे पाय पाण्याने स्वच्छ केले. हळदी, कुंकू वाहिले व मला अन्नकोटमध्ये प्रसादासाठी पहिला प्रवेश दिला व सांगितले की "ताई करा सुरूवात जेवायला मग बाकीच्यांना सुरुवात करायला सांगतो."

  

असा हा शेगावच्या गजानन महाराजांचा दैवी साक्षात्कार मी आणि माझे पती आजही विसरलो नाही, कधीच विसरणार नाही. मला हा सवाष्णाचा मान माळणार होता म्हणून आदल्या दिवशी प्रसाद मिळाला नाही. किती मोठा मान मला मिळाला होता. माझे पती बर्‍याच मोठ्या आजारातून सहा वेळा वाचले आहेत. साईबाबा, गजानन महाराज यांच्या साक्षात्काराची प्रचिती नेहमीच येते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational