Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

नासा येवतीकर

Inspirational


3.4  

नासा येवतीकर

Inspirational


साहस

साहस

3 mins 1.2K 3 mins 1.2K

साहस


सातव्‍या वर्गात शिकत असतानाच सुधाचे लग्‍न मोठ्या थाटामाटात झालं. अजून तिला खूप काही शिकायच होत, तसं आईला तिने बोलूनही दाखवलं, परंतु बाबांच्‍या रागासमोर दोघांचेही चालले नाही पाच सात एकर जमीन, मोठा वाडा, गोठ्यात दहा-पंधरा जनावरं, एकुलता एक मुलगा अश्‍या पोरासोबत सुधानं नशीबचं काढलं प्रत्‍येक जण बोलत होते. परंतु सुधाला शाळा सोडावी असं वाटत नव्‍हती. शाळेत ती एक हुशार, चुणचुणीत व गोड मुलगी होती परंतु तिच्‍या मनाने काही करायला तिला संधी कोठे होती?

सुधाचे सासरीचे दिवस नवीन लुगडी नेसण्‍यात व गोडधोड खाण्‍यात मजेत होते. काही दिवस आनंदात उलटले एके दिवशी सायंकाळी स्‍वयंपाक आटोपून ती आपल्‍या यजमानाची वाट पाहत बसली. वाट बघता बघता ती तशीच झोपी गेली. मध्‍यरात्री केव्‍हातरी दारावरच्‍या टकटक आवाजाने ती उठली दार काढले तर तिचे पतीदेव दारू पिवून तर्रर्र होवून आला होता. जेवायचे तर होशच नव्‍हते. तसेच ते दोघे झोपी गेले. सुधाच्‍या नशिबात आता हे रोजचे होते. नव-याच्‍या विक्षीप्‍त वागण्‍याने सुधा पुरती कंटाळली. अशातच तिला दिवस गेले. सासरी-माहेरी सर्वांना खूपच आनंद वाटले. सासू सुधाला नेहमी म्‍हणायची, बाई, वंशाचा दिव्‍याला जन्‍म दे.

वयाच्‍या सोळाव्‍या वर्षी सुधा माता बनली. तिला मुलगी जन्‍मल्‍यामुळे सासरचे मंडळी तर पहायला सुद्धा आले नाही. मुलगी जन्‍माला दिल्‍यामुळे सासू, सासरे, नवरा सर्वच मंडळी तिला खूप हिणवू लागले. मानसिक व शारीरिक त्रासामुळे सुधा मनातून खूपच खंगू लागली. लहान वयात माता बनल्‍यामुळे प्रसूती वेळी खूप रक्‍तस्‍त्राव झाला होता आणि बाळाची वाढ ही चांगली झाली नव्‍हती. त्‍यामुळे सुधा व तिची मुलगी दोघेही कृश आणि सदा आजारी पडत होते. त्‍यातच दीड एक वर्षाने सुधाला परत दिवस गेले. सासूबाईंनी तिला चेकअप साठी दवाखान्‍यात घेऊन गेली. तिच्‍या उदरात परत मुलगी आहे म्‍हणून तिचे गर्भ मोकळे करून घरी निघाले. असे तिच्‍यासोबत दोन तीन वेळा घडलं. वंशाचा दिवा पाहिजे या हट्टापायी तिचं गर्भपात करण्‍यात आलं. त्‍यामुळे दिवसेंदिवस तिची शक्‍ती कमी कमी होत गेली. ती आत्‍ता निरशक्‍त व बेढव दिसू लागली. तसं सासू व नव-याच्‍या मनात दुसरं लग्‍नाचा विचार घोळू लागलं.

एके दिवशी अचानक सासूबाईंनी सुधाच्‍या सवतीला घरात आणलं. ही बातमी सुधाच्‍या आई वडीलांना कळाली तसे ते धावत पळत आले. भांड भांड भांडले तेव्‍हा सासूबाईने घेऊन जा, आपल्‍या मुलीला घरी, असा निर्वाणीचा इशारा दिला. परंतु ते गरीब घराचे, एकदा बाहेर पडलं तर तिला परत त्‍या घरात प्रवेश मिळणार नाही, या धास्‍तीने ते आपला काळजाचा तुकडा तिथेच संकटात सोडून निघून गेले. सुधाचा अतोनात छळ सुरूच होता. जीवन जगण्‍याच्‍या सर्व आशा-आकांक्षा संपुष्‍टात आले होते. सुधाची आई शेजारी पाजा-यांना तिची करूण कहानी सांगत रोज रडत होती. काय करावं तिला कळेना सुधाची एकप्रकारे ती परीक्षाच होती.

ती रात्र तिच्‍यासाठी सुवर्ण रात्र होती. स्वप्नात तिला परीने संसारच्या अनेक गोष्टीविषयी चर्चा केली आणि अन्‍यायाला वाचा फोडण्‍यासाठी मार्ग सुचविले होते. स्वप्नातील त्‍या मार्गाचा अवलंब करण्‍यासाठी तिला आई वडील आणि शेजारी पाजा-यांनी धीर दिलं. त्‍या दिवशी ती सासरच्‍या सर्व मंडळीसोबत वाद घालून, मी परत येईन परंतु तुम्‍हाला सजा देण्‍यासाठी, म्‍हणून ती अर्ध जग जिंकल्‍याच्‍या अविर्भावात माहेरी निघाली. आज ती मनात ठाम निर्धार केली होती की, मी थांबवलेल शिक्षण पुढे चालू करणार आणि यांना धडा शिकविणार.

दहावीची परीक्षा खासगी विद्यार्थी म्‍हणून बसली आणि पास झाली. त्‍यानंतर तालुक्‍याच्‍या गटविकास अधिका-यांना भेटून बचत गटाची स्‍थापना केली. त्‍या गटाअंतर्गत भेटून बचत गटाची स्‍थापना केली. त्‍या गटाअंतर्गत चार पाच शिलाई मशीन घेऊन ती माहेरी शिवणकाम करू लागली आणि इतर मुलींना शिकवू लागली. बघता-बघता तिच्‍याकडे संपत्‍तीचा ओघ सुरू झाला. आई-वडिलांना सुधा ही ओझं न वाटता आधारवड वाटत होतं. कोर्टात सुधाने बायको जिवंत असताना दुसरी बायको केली, म्‍हणून कोर्टात केस दाखल केली. तेव्‍हा सासरच्‍या मंडळीच्‍या कोर्ट कचे-या वाढतच होता. सून म्‍हणून नातलगातली आणलेली पोरगी काही दिवसातच निघून गेली. पोराच्‍या रोजच्‍या दारूनं पाच सात एकर जमीन काही गुंठ्यावर आलं तर गोठ्यात दहा-पंधरा जनावराच्‍या जागी कुत्र्याची दहा-पंधरा पिलं राहत होती. सासरची मंडळी आज रस्‍त्‍यावर आली होती. त्‍यांचे दिवस फिरले होते.

सुधाला सासरी परत बोलावून नेण्‍यासाठी ती सर्व मंडळी खूप मनधरणी केले परंतु सुधाचा विचार पक्‍का होता. मी माझ्या मुलीवर तुमची सावली पडू देणार नाही. मी परत एक सुधा निर्माण होऊ देणार नाही. असे म्‍हणून ती सर्वांना हाकलून दिलं आणि कोर्टातून आपल्‍या नव-यापासून फारकत मिळवलं. आज सुधा आणि तिची मुलगी सुखाने नांदत आहेत. कायद्याच्‍या आधारासोबत सुधाने केलेल्‍या साहसामुळे तिला पुनर्जन्‍म मिळाला होता. स्वप्नात परीने सांगितलेला मार्ग स्वीकारून सुधाने एक साहस केले आणि त्यात तिला यश मिळाले. समाजामध्‍ये अशा अनेक सुधा आजही सासू, सासरे, नवरा यांचा हकनाक बळी पडतात. जीवनात आपली मुलगी सुधा बनू नये असे वाटत असल्‍यास तिला भविष्यात खूप शिकवा. शिक्षणामुळे मनुष्‍याला ज्ञान प्राप्‍ती होते आणि संकटाला तोंड देण्‍याचे साहस निर्माण होते.Rate this content
Log in

More marathi story from नासा येवतीकर

Similar marathi story from Inspirational