रंग सौभाग्याचा
रंग सौभाग्याचा
बांगडी वाला आला की, ती पळतच सुटायची आणि सर्व लाल बांगड्या हातभर भरुन घ्यायची आणि मग नाचत फिरायची बांगड्या वाल्यालाही आता सवय झाली होती याची.
सर्व तिला वेडी म्हणून हसायचे वेडीच होती ती त्याला तिच्या हातभर बांगड्या लाल खुप आवडायच्या.
गेल्या वर्षी मात्र बॉर्डर वर गेला तो तिरंग्यात लपेटून आला.
तिच्या आयुष्यात ला लाल रंग कायमचाच घेऊन गेला.
बाकी, सारं काही विसरली पण त्याला तिच्या वर आवडणार लाल रंग तेवढा तिला लक्षात आहे.
जेव्हा बांगडी वाला येतो हातभर बांगड्या भरून हातात तिरंगा घेऊन ती वेडी त्याची रेल्वे स्टेशन वर वाट पहात बसते हाच तिचा दिनक्रम आहे.
