Smita Bhoskar Chidrawar

Inspirational

2  

Smita Bhoskar Chidrawar

Inspirational

रंग माझा वेगळा...

रंग माझा वेगळा...

1 min
107


रंग माझा वेगळा..

जगण्याचा ढंगही माझा आगळा वेगळा...

स्वभावही जगावेगळा...

नाही कसला मोह मला...

पैशाचा, सौंदर्यांचा...

नटण्याचा ना जास्त मुरडण्याचा...

आवड मला प्रेमाची...

पाठीवर मिळणा-या शाबासकीची...!

सतत मनाला गुंतवून ठेवायची...

मदतीचा हात पुढे करायची...

नाते जपण्याची... 

आवड मला निःस्वार्थतेची...

 मनाने मी श्रीमंत...

राहते नेहेमी आनंदात...

ठेवते सगळ्यांना माझ्यात प्रेमळ बंधात...

सुंदर शब्दात रमणारी...

नेहेमी प्रेम बरसवणारी...

साधी भोळी पण नव्हे अबला...

अडथळे सगळे पार मी करते...

 मऊ नेहेमी पण कणखर ही होते...

सगळ्यांचे आयुष्य आनंदी करण्यासाठी धडपडत नेहेमी असते....

अशी मी चारचौघी सारखी पण तरीही माझे वेगळे अस्तित्व जपलेली...

जीवन हे खरंच अनेकविध रंगाने नटलेले आहे ...ते सदा रंगीत असावे. 

प्रत्येक रंगाची वेगळी महती आहे.पण हे सगळे रंग आपली वेगळी अनुभूती देतात..

बालपणी आपला रंग वेगळाच असतो.त्यात अगदी सुंदर , उत्साहाचे आणि स्वच्छंदी निरागस रंग असतात...

हळुहळु मोठे होतो तसे हे रंग वेगळे होत जातात. कर्तव्याने आणि कतृत्वाने हे रंग अधिकच झळकत जातात.

आयुष्यातल्या सगळ्या नात्यांमध्ये रंगताना आपला स्वतःचा वेगळा रंग मात्र मी जपलाय... माझ्या वागण्यात एक रंग आहे , प्रेमळपणा आणि कधीकधी कठोरपणे वागताना तो रंग बदलतो.

दुःखात आणि आनंदात सुद्धा रंग झळकतात...लेखणीतून माझा वेगळा रंग नेहेमी बरसतो.सगळ्यांच्या रंगात मी अगदी मिसळून जाते पण प्रत्येक वळणावर आपल्या अस्तित्वाचा एक सुंदर रंग मात्र नक्कीच उधळत जाते..!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational