Vasudev Patil

Classics

2.9  

Vasudev Patil

Classics

रिती घागर

रिती घागर

3 mins
1.7K


रिती घागर

धरमपुराहून आपला मित्र अजित नेमाडेला साथीला घेत बीडहून आलेल्या चंदन पोवारानं दुर्जनगड पंचायत समितीला रिपोर्टींग करत सोनवाई गावाकडं हजर होण्यासाठी निघाला. आज एक जून शाळांना सुट्या असल्यानं हेडमास्टर सोनवाईला मिळेल की नाही ? ही साशंकता होती. शाळेवर हजर झाल्याशिवाय जिल्ह्याला अहवाल तर टाकता येणार नाही. म्हणून कारकुनाकडं चौकशी केली असता, 'सोनवाईला दिनकर मास्तर हेडमास्टर असुन ते सोनवाईतच राहत असल्यानं आपणास तेथेच मिळतील' असं कळल्यानंतर शाळेच्या गावाकडं ते दोघं निघाले.अजित हा मुळचा बीडचाच. मागच्या वर्षीच धरमपूर जिल्ह्यात शिक्षक म्हणून रुजु झालेला व त्याला तोच तालुका मिळालेला. त्यामुळं त्याला या जिल्ह्याची बरीच माहिती जरी होती तरी दुर्जनगड तालुका हा पूर्ण सातपुड्याच्या जंगलातला दुर्गम भाग त्यामुळं तो या तालुक्याबाबत फक्त ऐकून होता. पण हा भाग त्यानंही पाहिला नव्हता. म्हणुन तो ही लवकरात लवकर सोनवाईला पोहोचून चंदनला रुजू करून तेथेच आजच्या मुक्कामाची सोय करावी वा सोय झालीच नाही तर अंधार पडण्याच्या आत पुन्हा दुर्जनगडला वा नाथबाबाचा अवघड घाट उतरून तिकडनंच परस्पर सज्जनगड कसं गाठायचं याच विचारात होता व घाई करत होता. चंदन पोवाराला मात्र या भागाची काहीच ओळख नसल्याने व नोकरी मिळाल्याचा आनंद यामुळं तो खुशीत होता. अजितनं कारकुनाला सोनवाईला रस्ता विचारुन गाडीला किक मारली. नदी, नाले, उंच डोंगर, घाट पार करत फटफट आवाज करत, धुरळा उडवत, खाच खडग्यातून गाडी सोनवाई कडं धावु लागली. जिकडे जिकडे दाट जंगल तर काही भागात आंब्याची झाडं होती. आंब्याच्या झाडाखाली आदीवासी लोक आपल्या चिल्या- पिल्याच्या मदतीनं कैऱ्याच्या साली काढण्यात गुंतलेले.आमसुर बनवण्याचा मोसम सुरू होता. आंब्याचा नुसता घमघमाट सुटत होता. मध्येच सपाटी लागली की काही पोरं डालीत आंबे घेऊन रस्त्याच्या कडेला विक्रीला बसलेली दिसत. गावठी वाणाचा वास चंदनला वेड लावत होता. अडिच वाजताच त्यानं अजितला गाडी थांबवायला लावली. विसची नोट देत पोराकडनं आंबे घेतले व जवळच आंब्याच्या झाडाखाली नदीकाठी फतकल मांडत आंबे खाल्ले. अजितनंही घाईगर्दीत दोन तीन आंबे खात त्याला चपळाई करायला लावली. नदीतलं थंडगार पहाडी पाणी पित ते सोनवाई जवळ करू लागले. दुर्जनगड व सज्जनगडाच्या सिमेवर वसलेला हा पाडा खुपच मोठा होता. दुर्जनगड पासुन पंचवीस तीस कि. मी. लांब दाट जंगलात. त्यामानाने सज्जनगड जवळ पण मध्ये नाथबाबाचा उंच डोंगर व अवघड घाट. तीन वाजता विचारत विचारत व डोंगर, टेकड्या चढत उतरत त्यांनी सोनवाईत प्रवेश करत दिनकर मास्तराला हुडकलं. मास्तरनं त्यांना आंब्याच्या झाडाखाली बाजल्यावर बसवत कैरीचं सरबत पाजलं व विचारपूस केली. तिथंच प्रशासकीय बाबी पूर्ण करून हजर केलं. पोरसवदा मास्तरला पाहताच दिनकर मास्तराला चित्रा डोळ्यासमोर दिसू लागली. ती पण चार पाच वर्षापूर्वी अशीच आली होती. तिलाही असंच हजर केलं होतं व आज तिची काय दयनीय अवस्था..... देव करो व या पोरसवदा पोरांची सेवा सुखरुप पार पडुन बदली होवो! डोळ्यात पाणी डबडबून आलं ते त्यांनी कुणाला दिसू न देता धोतराचा सोंगा तोंडावर फिरवत पुसलं. त्यांचंही आता एक दिड वर्षच बाकी होतं. अजितनं चंदनाच्या राहण्याची काय सोय होईल?! याबाबत विचारणा करताच, तुम्ही इतक्या लांब बीडचे म्हणुन एकतर दुर्जनगड वा इथंच गावात राहणं हे दोन पर्याय उपलब्ध असल्याचे सांगत दिनकर मास्तरनं उसासा टाकला. आज एक जून. पंधरा जूनला शाळा उघडेल. तोपावेतो पावसाळा लागलेला असेल मग दुर्जनगडचा चार महिने संपर्क तुटतो.नद्या नाले उतरू देत नाही. सज्जनगडाकडं जाता येतं प्रसंगी. पण घाट म्हणजे मरणाला आमंत्रण. म्हणून पाड्यात राहिलं तर उत्तम. जिवाचे हाल होणार नाही. "बरं भाड्यानं पक्कं घर मिळेल ना गावात?" चंदननं चौकशी करताच दिनकर मास्तर अजितकडं पाहत मिश्कील हसले. एव्हाना बोलण्यातून अजित याच जिल्ह्यात नोकरीला आहे हे दिनकर मास्तरांना समजलंच होतं. "पोरा इथं सारीच कुडाची व कौलारू घरं आहेत बाबा. हातावर पोट असणारी गरीब आदिवासी वस्ती आहे ही. रोजच्या जगण्याची भ्रांत असल्यावर कुठनं आली पक्की घरी?, पण आपली शाळा मात्र इंग्रज काळातली पक्की वास्तू आहे. बघ तु राहत असशील तर तेथे" . मास्तरांनी त्यांना डोंगर उतरत शाळा दाखवली. शाळा प्रशस्त, हवेशीर, नदीच्या काठावर वसलेली. आंब्याच्या, मव्हाच्या झाडांनी व बांबूच्या बेटांनी वेढलेली. मोठं आवार कंपाऊंडनं बंदिस्त . आवारात पहाडात सहसा न आढळणार भलं मोठ वडाचं झाडं. तिथंनं आजुबाजुच्या उंचच उंच डोंगरावर चहुबाजुंनी पाड्या - पाड्यांनी वसलेलं 'सोनवाईपाडा' गाव रम्य दिसत होतं. चंदन दृश्य पाहुन हरखूनच गेला. त्यानं दिनकर मास्तरांना "इथं रहायला गावकऱ्यांची वा तुमची हरकत नसेल तर राहीन मी इथं, शाळा छान आहे" सांगितलं. अजितही इतक्या दुर्


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics