The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Swapnil Kamble

Tragedy

5.0  

Swapnil Kamble

Tragedy

रॅट कॅचर

रॅट कॅचर

4 mins
1.4K


पहाटे पाच वाजता भर पावसात दरवाजाची कोणीतरी कडी वाजवली. दरवाजा उघडला तो राघव होता. डोळे चोळतच नवऱ्याचा अवतार पाहून बायकोचे अवसानच गळाले.

पहाटे पाच वाजले होते. पाण्याची वेळ झाली होती. पाऊस ओतप्रोत पडत होता. पावसाचा जोर वाढत होता. त्याचा ओस काही ओसवत नव्हता. सकाळची पाण्याची रेलचेल चालू झाली होती. धो धो पडणारी बारिश व त्यात पिण्याच्या पाण्याची वेळ दोन्ही एकसाथ... दोघांची तारांबळ उडाली होती.


राघव नाईट ड्युटी करुन आला होता. तो जरासा लंगडतच घरात शिरला. अंगावर पिवळ्या रंगाचा रेनकोट लोंबकळत होता. पायातल्या बाटाच्या चपलेचा एक अंगठा तुटला होता. पायाची बोटे बाहेर आली होती. हातात एक काठी होती. एक टॉर्च होता व एक पिशवी होती. पायाची बोटे पावसाच्या पाण्याने गारठली होती. अंग पावसाच्या पाण्याने ओलेचिंब झाले होते. बायकोने त्याच्या हातातील टॉर्च घेतला. काठी दरवाजालाकडेला उभी केली. तो लंगडतच आत येतो. पाय रात्रभर भिजून गारठले होते. पावसाच्या व घाणीच्या पाण्याने पाय बिलबिलीत झाले होते. पाय सुजले होते. काही ठिकाणी खरचटले होते. तो न्हाणीघरात जाऊन अंघोळ करतो. बायको सर्व काम आटपून घेते.


पिण्याच्या पाण्यावरुन भांडणे चालू होती. पाण्याच्या प्रेशरचा आवाजच येत होता. अजून स्वच्छ पाणी आले नव्हते. गढूळ पाण्यावरुनही गल्लीत आरडाओरड चालू होती.

बायको त्याच्या पायाला पाहते तर जखम होती. पायावर हळदमीठ चोळते. पायाची आग मस्तकाला भिडते. तो ओरडू लागतो. पाय फारच चिघळला होता. बायको त्याला चायनास्ता करुन आराम करायला सांगते. पायाला लावलेली हळद आता खूपच झोंबत होती. तो ओरडत होता.


"काय ही अवस्था करुन घेतलीत पायाची"

"तरी तुम्हाला सांगितले त्या, उंदरांना पकडण्याचे काम सोडून द्या म्हणून"

"आज रात्री तुम्ही कामाला जावू नका"

त्याचे अंग तापाने फणफणत होते.

"उद्या साहेब प्रमोशनची वार्ता करनार आहेत"

"मलेरिया डिपार्टमेन्टमध्ये परमनंट जॉब "

"आज रात्री शंभर उंदिर मारावे लागतील"

"आज रात्री गेलेच पाहिजे"

"पाऊस जोरात आहे, शिकार आता बाहेर आली असणार, उंदिर पाण्याने गारठलेले असतात..."


राघव बिछान्यावर विव्हळत होता. एकटाच बडबडत होता. थंडीने कुडकुडत होता. त्याच्यासमोर फक्त न् फक्त एकच लक्ष्य होते. पाऊस खूपच जोरात चालू होता. पाऊस काही केल्या ओसरत नव्हता. त्याचे अंग तापाने फणफणत होते. बायकोने मिठाची घडी डोक्यावर ठेवली होती. राघव बिछान्यावर आता निपचित पडून होता. त्याचे अंग तापाने जर्जर झाले होते.


संध्याकाळपर्यंत त्याला बरं वाटलं होते. पुन्हा तो उठतो. पुन्हा आपल्या कामाला जायच्या तयारीला लागतो. पाऊस धो-धो कोसळत होता. अंगावर रेनकोट घातला. हातात काठी घेतली. बायकोने खूप गयावया केली पण तो ऐकला नाही. त्याला फक्त साहेबांनी सांगितलेले प्रमोशन व बिदागी दिसत होती.


पावसाच्या वेळी उंदिर एकत्र येतात. अंधाऱ्या कोपऱ्यात खोंगा करुन बसलेले असतात.


तो ऑफिसमध्ये हजेरी रजिस्टवर आपल्या नावासमोर सही करतो. आपल्या नावासमोर उंदिरमामा. ही पोस्ट त्याला लाजीरवाणी वाटते. पुन्हा हातात काठी घेतो. यावेळी अतिघाणीच्या हद्दीत घोघारिया भागात जातो. तिथल्या कचऱ्याच्या ढिगाजवळ उभा राहतो. मच्छर व किन्नट घोंघावत होती. कुत्री निमूटपणे कोपऱ्यात पोटात मान घालून झोपली होती. गटारे ओतप्रोत वाहत होती. पावसाचे पाणी ढोपरभर लागत होते. घाणीचे नाले ओसंडून वाहात होते. पाऊसतर आधाशासारखा पडत होता. ढोपरापर्यंत पाण्यातून तो शिकारीला गेला होता. त्याची शिकार त्याला कसरत केल्याबिगर सापडणार होती. शिकार भिजून अगदी गारठली होती. त्याच्यामध्ये प्रतिसामना करण्याची जिद्द उरली नव्हती. कचऱ्याच्या ढिगाखाली दावत पाहून तर तो जाम खुश झाला. आज नक्की प्रमोशन मिळणार म्हणून मनोमनी हसत होता. उंदरांची डब्याखाली रांग पाहून त्याने काठीने हळुच ठोकरले तेवढ्यात ते तितरबितर झाले. तेवढ्यात राघवने टॉर्चचा फ्लॅष त्यांच्या डोळ्यांवर फिरकवला. त्या क्षणी जमावळ तिथेच थांबली. त्यासरशी हातातल्या काठीने सपासप आघात केला. एकाच घावात दहाएक उंदिर जागीच ठार झाले होते. त्यांचे पाय पाण्यात बुचकळत होते. मेलेले उंदिर पाण्यावर तरंगत होते. पुन्हा एक अघात केला. पुन्हा उंदरांची चिवचिव चालू झाली. डोळ्यांवर फ्लॅश पडल्याने ते बिचकले, तिथेच थांबले. एका फटक्यात चार-पाच उंदिर जागीच ठार केले. असं करीत करीत त्याने ऐंशी उंदिर काही तासात पकडले. पुन्हा शंभरी गाठण्यासाठी त्याने जिवाचा कस पणाला लावला. पुन्हा एक फटका व जागीच दहा उंदिर ठार केले. शेवटच्या फटक्यामध्ये त्याच्या पायाला पाण्यात कोणीतरी डसले.पण त्याची सल त्याचा मस्तकात गेली. आयुष्यात अशा छोट्या-मोठ्या खरचटल्याच्या जखमा त्याच्या जिवलग बनल्या होत्या. त्याचे लक्ष्य होते ते शंभरी गाठण्याचे. त्याच्या पायाला चिचुंदरीने चावले होते. त्यातून रक्त वाहात होते. पायाचा टवका काढला होता. पण तरीसुद्धा त्याने आपली शिकार सोडली नव्हती. पुन्हा एक फटका... एका फटक्यात दहा उंदिर व अखेर त्याने शंभरी गाठली. पायातून घळघळा रक्त ओसंडत होते. हात कापत होते. अंगावरचे कपडेही कर्दमलेले होते. हातातील टॉर्च डोळ्यांवर चमकत होते. उंदिर एकाच जागेवर तडफडत होते. पाण्यातून वाहणारे रक्त घाणीच्या पाण्यात विरघळत होते, एकजीव होत होते. त्या पाण्याला काही फरक पडत नव्हता की हे रक्त आहे की, माणसाची विष्ठा ते सर्व आपल्या रंगात घुसडवत होते.


रात्रीचा रिपोर्ट दिल्यावर तो सकाळी घरी परतला. त्याची अवस्था तर अगदी त्या उंदरांपेक्षाही भयाण होती. पण त्याची महत्वाकांक्षा त्याला जिद्द देत होती. त्या दिवशी जो तो घरी परतला तो अगदी बिछान्याला बिलगला होता. त्याचे प्रमोशन झाले होते. पण त्याच पायाचे दुखणे... तो आयुष्यभरासाठी घेऊन बसला होता. ती जखम त्याला महागात पडली. वेळेवर ईलाज केला असता तर कदाचित पाय शाबूत राहिला असता. त्या सकाळी तो दवाखान्यात गेला. सरकारी दवाखान्यात अगोदरच भल्यामोठ्या रांगा होत्या. तो सरकारी कर्मचारी म्हणून त्याला थेट डॉक्टरकडे चेकअप करायला पाठवले. तिथे दूषित पाण्यामुळे आजारी पडलेले रुग्ण आले होते. लेप्टो, कावीळ, गॅस्ट्रो, टायफाईड तसेच अनेक पेशंट होते. त्याने निदान केल्यावर त्याला "लेप्टोस्पायरोसिस" नावाचा रोग झाला होता. शरीरात काहीतरी सळसळत होते, असे त्याला वाटू लागले. त्याने डॉक्टरला सांगितले की, त्याच्या पायात किडा घुसला आहे. तो आत वळवळतो आहे. डॉक्टरला ही केस मेन्टल वाटली होती. म्हणून त्याला विश्रांतीची गरज आहे, असे त्याने लिहून दिले.


कित्येक दिवस तो बिछान्याला खिळून होता. त्याच्या डोळ्यासमोर फक्त न फक्त ते उंदिर मरताना दिसायचे व तो सांगायचा की, माझ्या पायात किडा घुसला आहे तो वळवळतो सारखा... मी पाप केले त्याची शिक्षा मला मिळते आहे. त्याला कित्येक भास व्हायचे... तो किडा आता त्याच्या अंगात शिरला होता. अखेर तो दिवस त्याची शेवट ठरला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy