Kshitija Bapat

Thriller

4.0  

Kshitija Bapat

Thriller

पुढाकार

पुढाकार

2 mins
178


हल्लीच घडलेली घटना आहे. ही गोष्ट आहे एका विधवेची. नाव तिचे उज्वला. उज्वलाही साधीसुधी कमी शिकलेली साधारण कुटुंबातली मुलगी पंचवीस वर्षांपूर्वी उज्वलाचे लग्न संजयशी झाले संजय मोठ्या कुटुंबात वाढलेला सामान्य परिस्थितीत असलेला मुलगा तीन भाऊ चार बहिणी अशी त्याला भावंड होती. सर्वसामान्यप्रमाणे सर्व मोठी झाली लग्न करून आपापल्या संसारात व्यस्त होती मुले बाळे असा त्यांचा संसार सुरळीत चालला होता नाईक कुटुंब तसे मोठे भावा भावा भावा भावा मध्ये आपले प्रेम होते वेगवेगळे जरी झाले असले तरी सणसमारंभाला भेटायचे मिळून मिसळून कार्यक्रम पार पडायची.

पण अचानक नाइक कुटुंबावर दुःखाचा पहाड कोसळला. संजय हा तसा सर्वात लहान मुलगा.आळशी व्यस्नी होता त्याला इतके दारूचे व्यसन होते त्या दारू पिण्याने त्याचा जीव गेला. उज्वला शी संजय च लग्न होऊन आठ दहा वर्षे झाली होती. पण अचानक संजयचा मृत्यू झाला.

उज्वला आता विधवा झाली होती त्यातल्या त्यात दोन मुली तिच्या पदरी होत्या. ती भावाकडे माहेरी राहीली. दोन ठिकाणी पोळ्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होती. कसेबसे मुलींना शिकवून तिने त्यांचे लग्न करून दिले मुली आपल्या घरी नांदू लागल्या. संजयचा मोठा भाऊ अरुण चांगला होता घरदार एक मुलगी पण इथेही काळाने घात केला.

अरुण ची बायको अचानक हृदय विकाराच्या झटक्याने अरुण ची बायको तरुणला सोडून देवा घरी निघून गेली. अरुण आता एकटा होता. वयाची 50 शी उलटली होती. आता त्याच्याशी कोण लग्न करणार त्याला कोण मुलगी देणार त्याच्याही मुलीचे लग्न झाले होते ती ही सासरी सुखी होती. तेव्हा तिला तिच्या बाबाची काळजी घेणार त्याच्या सुखदुःखात साथ देणारा कुणी नव्हतं तिला तिच्या बाबाचे दुःख बघवत नव्हते इकडे उज्वला बरीच वर्ष एकाकी आयुष्य जगत होती तेव्हा तिने निर्णय घेतला. तिच्या काकूला आई करण्याचे ठरविले सर्वांनाच तिचा हा निर्णय मान्य होईल असे नव्हते सुरुवातीला सर्वांनी विरोधच केला कारण एक विधवा स्त्री दोन मुलीची आई पन्नाशीला आलेली या वयात कशाला लग्न करायचे देव देव करून उर्वरित आयुष्य घालवायचे.

      इतकी वर्ष नाही का ती एकटी राहिली मग आताच कशाला तिला सोबत हवी? एक ना अनेक लोक बोलायला लागली पण रमा तरुण मुलगी तीने समोपचाराने सर्व प्रश्न सोडवले आणि अरुण उज्वलाचे लग्न लावून दिले. समाजापुढे हा काहीतरी नवा करण्याचा तिने प्रयत्न केला दोघांचाही एकटेपणा दूर झाला एकमेकांना साथ मिळाली. उर्वरित आयुष्य ते एकमेकांच्या सुखदुःखात वाटेकरी होतील. एकमेकांना सांभाळतील घराला घरपण आले दोघांचाही एकटेपणा दूर झाला. तेव्हा नव्याने काहीतरी नवीन साध्य झाले. ही घटना सत्य घटने वर आधारित आहे फक्त यातील नाव काल्पनिक आहे


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller