श्रीमंत भिकारी
श्रीमंत भिकारी


नारू हा भिकारी मुळतः रजेगावातला भीक मागून स्वतःचा उदरनिर्वाह करणारा कधी मंदिरासमोर तर कधी बस स्थानकावर भीक मागायचा. अगदी मळलेले फाटके असे जीर्ण अवस्थेतले कपडे अंगावर एका हातात काठी व एका हातात कटोरा दाढी वाढलेली शरीर कृश झालेले डोक्यावर छप्पर नाही. त्याला मित्र नाही. एके दिवशी गावात भिडे मास्तर आले. अत्यंत दयाळू असा हा त्यांचा स्वभाव ते कधी मला कपडे देत तर कधी चादर ब्लांकेट देत. ते नेहमी मला मेहनत करुन पैसे कमवायला सांगत. मी त्यांच्या प्रौढ शिक्षण अभियानात जाऊ लागलो. आधी माझ्याशी सगळे विचित्र वागले परंतु नंतर मग मास्तर व त्यांच्या शिकवणीमुळे सगळे एक झाले. ही नारूसाठी आनंदाची बाब होती.
मास्तरांचे ऐकून नारू गावातल्या बँकेत पैसे जमा करू लागला. भिडे मास्तर गावातून चालले गेले. असे पैसे जमा करत करत अनेक वर्ष निघून गेले. आळशी नारुने शिक्षणाचे महत्त्व समजूनच घेतले नाही. भीक मागूनच स्वतःचा उदरनिर्वाह केला. काही वर्षांनंतर नारूचा मृत्यू झाला, दयाळू गावकऱ्यांनी त्याचा दाहसंस्कार केला. त्याच्या घाणेरड्या पिशव्यांमधून गावकऱ्यांना एक पासबुक मिळाले. ते बँकेत जमा केल्यावर कळाले की त्याच्या बँकेत त्याच्या अकाउंटमध्ये दीड लाख रुपये होते. असा हा श्रीमंत भिकारी नारू सरकारला दीड लाख रुपये देऊन गेला.