प्रतिक्षा
प्रतिक्षा


आई होणे हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. आईला आपले बाळ प्राणापेक्षाही प्रिय असते. मातृत्व ही देन सर्वत स्त्रियांना लाभली आहे. पण काही याला अपवाद असतात.
निशा ही सुंदर, मध्यम बांध्याची स्त्री होती.
एक सर्वसाधारण, कट्टर ,परंपरावादी धार्मिक कुटुंब होते.
तिच्या वडिलांनी एक छान मास्तर पाहून तिचे उत्तम घराण्यात लग्न करून दिले तिचे सासर सुद्धा अत्यंत रूढी-परंपरा वादी धार्मिक कुटुंब होते.
निशा हळूहळू आपल्या संसारात खेळू लागली नवीन संसारात तिरमली दिवसामागून दिवस पाहू लागले घरातील नातेवाईक इतर बहिण भावंडाची लग्न झाले त्यांच्या घरी पाळणे हलू लागले ती सर्व आपला मुलांमध्ये आनंदी होते. तिकडे निशा मात्र दिवस जाण्याची वाट पाहू लागली अनेक उपवास व्रत केली डॉक्टरांचे उपाय सुरू झाले. अहवाल सगळे नॉर्मल होते.
तरी तिला दिवस जात नव्हते. घरचे खूप नाराज होते पण निशाचा मनात अजुनी आस होती ती देवावर विश्वास ठेवून आपले सर्व कर्तव्य पार पाडीत होती.
असे करता करता निशा चाळीस वर्षाची झाली. आता मात्र निषा हरली होती. सर्व उपचार थांबले नवस सर्व खोटे ठरले होते.
देवाची लीला न्यारी!! देवाच्या घरी देर आहे पण अंधेर नाही. निशाचा पतीने तिला खूप सहाय्य केले. दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. घरचे जरी जुन्या विचाराचे असले तरी घरच्यांनी तिला सांभाळून घेतले तिचे सासू-सासरे धीर धरून होते अखेर एका वैद्याचे औषध लागू पडले 40 व्या वर्षी दिवस गेले लग्न होऊन वीस वर्ष झाली होती.
वीस वर्षांनी निशाचा घरी पाळणा हल्ला भिडलेले पावली तिच्या घरी येणार होते तिचे कौतुक सर्व करू लागले तिला खूप सर्वांनी जपले तिचे डोहाळे जेवण तिचे सर्व डोहाळे पुरवले होते.
आता ती वेळ आली नऊ महिने पूर्ण झाले होते पण निशाचे वय जास्त असल्यामुळे ऑपरेशन झाले तिला एक गुटगुटीत सुंदर गोरेपान बाळ झाले.
सर्वांना इतका आनंद झाला तिचा सासऱ्याचा डोळ्यातून तर आनंद अश्रू वाहिले जिकडेतिकडे आनंद झाला होता. निशा या क्षणाची वाट वीस वर्षापासून पहात होती ते पावले आता घरात आले होते.
वीस वर्षांनी बाळ झालेत आणि तेव्हा 20 साल बाद सिनेमा रिलीज झाला होता त्यामुळे त्याला सर्व बीस साल बाद म्हणून बोलू लागले गोंडस बाळाची बार्शी खूप धुमधडाक्यात केले.