Vasudha Naik

Inspirational

3  

Vasudha Naik

Inspirational

पत्रलेखन

पत्रलेखन

1 min
243


कोविड सेंटर,ससून रूग्णालय

शिवाजीनगर, पुणे

      

   समाजसेवक डाॅक्टरांना

   माझा सस्नेह नमस्कार,


   पत्रास कारण की डाॅक्टर गेली सात महिने जगात कोरोना नावाच्या विषाणूने नुसता उच्छाद मांडला आहे आणि सर्व मानवजात हादरूनच गेली आहे. ना हा विषाणू डोळ्याला दिसत ना स्पर्शाने समजत काय भयाण अवस्था केली आहे सर्वत्र याने. लाखो जीव यामुळे गेले. पण आपणासारख्या डॉक्टरांच्या मानव सेवेमुळे आज खूप निरपराध मानवांचे जीवही वाचले आहेत.


   डाॅक्टर... आपण स्वतःचा जीव, स्वतःचे कुटुंब धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवले. प्रसंगी आपणालाही या विषाणूने घेरले. पण आपण त्यावरही मात केली. काही जणांचे बळीही गेले यात. स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून स्वरक्षण करीत मानवसेवा ही ईश्वरसेवाच एक प्रकारे आपण केलीत.

   

कोविडच्या या रणांगणात आपण खूप धीराने तोंड दिलेत यासाठी आपले हृदयस्थ आभार मानते. अभिनंदन करते. माझ्या सर्व कुटुंबातील व्यक्तींमार्फत आपले खूप खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन!


        आपलीच एक विश्वासू

        वसुधा


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational