पसंतीचा कार्यक्रम...
पसंतीचा कार्यक्रम...


सोनम आणि समीर यांच्या लग्नाला १० वर्ष होऊन गेलेली असतात.. पण दरवर्षी जुलै महिना आला की तें मात्र या आठवणींच्या पावसात भिजून जातात.... जुलै मध्ये ठरले लग्न आणि डिसेंबर मध्ये झाले... तर आज त्यांच्या या पसंतीच्या कार्यक्रमाची आठवण बघू या....
समीर इंजिनीरिंग करून अगदी well-settled म्हणतात ना तसेच, स्वतःचा फ्लॅट, गाडी...अगदी सर्व व्यवस्थित....
सोनम पण इंजिनीरिंग करून नुकतीच एका चांगल्या कंपनी मध्ये जॉब करत होती....
तसे समीरचे खूप प्रोग्रॅम झाले होते....२९ वय त्याचे... आणि सोनम चे म्हणाल तर हा दुसरा प्रोग्रॅम...वय २३.. .
त्यात दोघांच्या घरचे जुने संबंध.... या आधी एक वर्षा अगोदरच सोनम तिचे आई बाबा समीरचा फ्लॅट बघायला आले होते... अगदी सहज...कोणाच्या मनात लग्न असा विषय देखील नव्हता.... नवीन फ्लॅट घेतला म्हणून बघायला गेले होते... तेव्हा एकमेकांना बघितलं होते पण तसे काही डोक्यात नसल्यामुळे अगदी सोनम मात्र घाबरून गेली होती..
घरचे संबंध असले तरी दोघे एकमेकांना कधी भेटले सुद्धा नव्हते....
सोनम नुकतीच पावसात घरी येऊन गेली, तेव्हा तिचे सासरे पण तेव्हा मात्र तें बाबांचे स्नेही म्हणून काही कामासाठी आले होते... ते येऊन गेले आणि बाबांच्या मनात एकदम हे स्थळ आले.... सोनम ला बाबांनी सुचवले... एकदा तुमचे काय फेसबुक का काय म्हणता ना त्यावर फोटो बघून घे... सोनम मात्र तेव्हा त्या मूड मध्ये नव्हती... तिने थोडी टाळाटाळ केली... बघते नंतर... पण खरे कारण की समीर थोडा सावळा होता आणि वयात असलेले अंतर थोडे जास्त आहे असे वाट्त होते तिला.... पण बाबा खूप कडक त्यामुळे ती म्हणाली बघते मी नंतर...
आधी एका ठिकाणी तिची पत्रिका दिलीच होती अन तो मुलगा सुद्धा सगळ्यांना आवडला होता...त्यामुळे बाबांनी सुद्धा जास्त फोर्स केला नाही...पण नशीब म्हणतात ना तसेच काहीसं पत्रिका जुळत नव्हती... झाले बाबा परत समीरच्या विषयावर आले.... सोनम ने सुद्धा थोडासा विचार केला आणि म्हणाली फोटो मध्ये तरी चांगला वाटत आहे...
बाबांनी एका मध्यस्थीला घेतले आणि समीर च्या घरी पत्रिका घेऊन गेले... त्यांच्या समाजात तशीच पद्धत होती.... आणि समीर ची पत्रिका घेऊन आले.... पत्रिका जुळत होती... आता मात्र सोनम ची अवस्था वेगळीच होती कारण ते दोघेही जॉब निमित्ताने शहरात रहात होते आणि तें ही एकाच गल्लीत.... या आधी सुद्धा तिला तें माहिती होतेच...पण तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात फरक होता....
दोघांच्या सुट्टीचा वार म्हणजे रविवार बघायला हवा....असे घरच्या लोकांनी ठरवले... झाले इकडे सोनम खूप अस्वस्थ होती...जवळच रहात असल्यामुळे तिला ऑफिस ला जाता येता पण तो समोर आला तर?? या विचाराने टेन्शन येत होते... खर तर वर्षभर तें दोघे तिथेच रहात होते आणि कधी दिसले पण नव्हते... तरी हिची उगीच घालमेल....
बर साडी घालु का ड्रेस?? पार्लर ला जावे तर तें पण त्याच्या घराच्या बाजूला.... आता तो काही खाणार होता का?? पण तरीही.... शेवटी धावत धावत पार्लर ला जाऊन आली... बाबा कडक होते त्यामुळे अगदी साडी वगैरे तयारी केली होती तिने....
अखेर तो दिवस आला... शहरातच कार्यक्रम करायचा असे ठरले होते आई बाबा आले आणि काका काकू शहरातच रहात होते त्यामुळे तें सुद्धा आले... सर्व जण समीर कडे जायला निघाले... काकांनी गाडी आणतो बोलल्यावर एकच हशा पिकला... बाबांनी सांगितलं हे काय हा समोरचा फ्लॅट...
काकू हळूच विचारत होती...तुमचे तुम्हीच जमवलेत काय?? पण सोनम मात्र टेन्शन मध्ये होती...काय बोलू..?? कसे बोलू??
सगळे समीर च्या घरी आले...चहाचा कार्यक्रम झाला... सोनमला समीर एवढा आवडला नव्हता... आणि मग् त्यांना बोलण्यासाठी वेळ देण्यात आला... सोनम द्विधा मनस्थिती मध्ये होती... तरीपण फॉर्मलिटी म्हणून तिने समीर शी गप्पा मारायला तयार झाली....पण म्हणतात ना "काय भुललासी वरलीया रंगा" तसेच झाले... दोघेही गप्पा मध्ये एवढे हरवले की एक तास तें गप्पा मारत बसले... आणि सोनमला तो खूप आवडला... शेवटी काकू आली काय झाल्या का गप्पा?? तेव्हा तें भानावर आले...
अर्थात होकार आहे हे दिसतच होते, तरी पण कळवतो, असे बोलुन निरोप घेण्यात आला....
अगदी दोन तासातच समीर ने होकार कळवला, आणि सोनम ला काकांचा तसा फोन आला....आता काय करावे? तिला कळत नव्हतं.. वय आणि रूप थोडे तिला पटले नव्हते.... आणि आई बाबा लगेच गावाला निघून गेल्यामुळे त्यांना फोन लागत नव्हता म्हणून समीरच्या वडीलांनी काकांजवळ निरोप दिला.... पण हे काका म्हणजे अगदी त्यांच्या पोटात काय राहील तर शप्पथ...!!!
सगळीकडून सोनम ला अभिनंदनाचे फोन येऊ लागले...आईशी बोलणे झाले नव्हते... रात्रभर ती अगदी कावरीबावरी झाली होती काय करू?? ह्या दोन गोष्टी सोडल्यातर तिलासुद्धा समीर आवडला होता....
सकाळच आईशी बोलली,आईने तिला समजावले तिला सुद्धा पटले आणि तिने होकार दिला.....
आज या गोष्टीला १० वर्षे झाली....खूप सुखी संसार सुरू आहे... पण दरवर्षी सोनम आणि समीर हा दिवस साजरा करतात...
यापुढे बघू या सोनम आणि समीर यांच्या जीवनात आलेली पुढची छटा......