STORYMIRROR

Manisha Awekar

Tragedy

3  

Manisha Awekar

Tragedy

पश्चात्ताप

पश्चात्ताप

1 min
228

    सुनीता नेहमीप्रमाणे पटवर्धनांकडे कामाला गेली. गेल्यावर हात पाय धुवून काम करण्याची नेहमीची सवय, म्हणून बाथरुमकडे जाणार तोच " अगं आम्ही आता घरीच पोळ्या करणार आहोत " घुश्श्यातले वहिनींचे शब्द ऐकून ती चपापलीच. आजच तिच्या मुलीची फॉर्म फी भरायची होती." का हो वहिनी?" सुनीताने चपापून विचारले." अगं माझा नेकलेस आणि दहा हजार घरातून गेलेत"

ते शब्द तिच्या काळजाला भेदून आरपार गेले. नेहमी आले की आपण बरे, आपले काम बरे ,अशा वृत्तीची साधीभोळी सुनीता. नव-याला अपघातात अपंगत्व आल्याने व हातात शिक्षणही नसल्याने चार घरी पोळ्या करुन आपले व मुलीचे शिक्षण कसेबसे भागवायची. आज आपण घरी पोचेपर्यंत अस्मिता आपली वाट पहात असेल. आता काय सांगू तिला? ह्या विचारांनीच तिला रडू आले.

  वहिनी मख्खच!! त्यांनी काही विचारायचे किंवा पाणी द्यायचेही सौजन्य दाखवले नाही.

   मूकपणे सुनीता बाहेर पडली तिच्या समोर आधार होता. आज मदत करणाऱ्या घरीच ठोकर बसली होती. दाराशीच कीर्तनाहूनआलेल्या आजी भेटल्या तिचे रडलेले डोळे बघून त्या म्हणाल्या " काय झालं गं सुनीता?"

 सुनीताने थोडक्यात घडलेले सारे सांगितले. आजी म्हणाल्या

" अगं अस्मिताच्या शिक्षणाची तू काही काळजी करु नकोस मी तुझ्या घरी पैसे पाठवते."

सुनीताला वाटले "जगात माणूसकी शिल्लक आहे अजून !!देव देव तरी मंदिरात असतो का? नाही , तो आजींच्या रुपाने आपल्याला सहाय्य करत असतो. तिने मनोमन पाठमो-या आजींना हात जोडले.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Tragedy