प्रवास
प्रवास
ट्रिंग ....ट्रिंग ट्रिंग. .. ... फोन ची रिंग वाजत होती मी फोन घेतला .समोरून आवाज आला,मित्राचा आवाज होता,"हा..बोल! मी म्हणलो.तो म्हणाला मित्राला घरी सोडायचे आहे गाडी घेऊन जाऊ ,पाऊस खूप आहे आणि वेळ ही झाला आहे. तू आणि मी जाऊया ,
दोघे गाडी घेऊन निघालो पाऊस खूप होता रात्रीचे जवळ जवळ साडे नऊ वाजले असतील ,पाऊस खूप असल्यामुळे रस्तावर वर्दळ नव्हती .वरून पडणारा पाऊस आणि आमच्या गाडीचा आवाज येवढाच काय तो आवाज येत होता.दुकान सगळी बंद होती ,गाडी शेडगेवाडी जवळ आली तोच समोर एक बाई उभी होती तिने आम्हाला थांबण्यासाठी हात केला ,एकटीच बाई होती त्यामुळे तिला जायला गाडी नाही म्हणून आम्ही गाडी थांबवली.सुंदर अशी साडी नेसलेली बाई दिसायला पण खुप सुंदर होती ,कुठे जाणार आहे? असा आम्ही प्रश्न केला ,त्यावर ती म्हणाली. गाडी चुकली माझी ,चांदोली ला चाललोय, आम्ही तिला गाडीत घेतली ती ड्रायव्हर शेजारी बसली.
मी आणि मित्र मागच्या शीट वर बसलो एव्हाना चेष्टा चाललेली होती ती आत्ता बंद झाली कारण ती बाई बसली होती.जसजसा प्रवास सुरू झाला तसे ती बोलू लागली केव्हा कराड वरून आलो म्हणाली,कधी कोकरूड वरून आलो म्हणाली ,पाऊसाचा जोर वाढला होता आणि रात्रीचे साडे दहा वाजून गेले होते.
आत्ता पर्यंत बाईचा आवाजात बोलणाऱ्या बाईचा आवाज जरा बदलत जात आहे आणि तो पुरुषी आवाजात परिवर्तन होताना आमच्या लक्ष्यात येत होते. आम्ही एक मेका कडे पाहत होतो.नेमके आहे कोण ही बाई? असा आम्हा तिघांना पडलेला प्रश्न. चांदोली आजुन दूर होती रस्त्याच्या कडेला बेडक खुप मोठ्याने ओरडत होती .
आत्ता पर्यंत बाईचा आवाज बदलून पूर्ण
पुरुष आवाजात बोलत होती ,तिच्या शेजारी बसलेला ड्रायव्हर घामाने भिजला होता. तो आम्हाला सूचना देत होता पण आमच्या लक्षत येत न्हवते,त्याने तिच्या हाताकडे कडे बघण्यास सांगितले ,आम्ही त्या बाईच्या हाताकडे पाहिले.तिच्या अंगावर आत्ता पूर्ण केस आलेले होते ,काहीच कळेना, काय करावे ?असा आम्हाला पडलेला प्रश्न ,ती बाई म्हणाली भिऊ नका चांदोली मध्ये सोडा मला आणि मग तुम्ही जावा.आत्ता त्या बाईला मिश्या, दाडी येत होती ,सुंदर स्त्री ची आत्ता पर्यंत पूर्ण पुरुष झाली होती. आम्ही तिघेही पूर्ण घामाने चिंब भिजलो होतो.
ड्रायव्हर मित्र तसा पूर्ण भिजलेला असला तरी त्याने धीराने घेतले त्याने गाडी चां वेग कमी केला आणि आम्हाला म्हणाला तुम्ही गाडीतून उतारा मी हिला पोचवून येतो,आम्ही गाडीतून उतरलो त्याने गाडी वेगात घेऊन गेला पावसाचा जोर कमी होता ,बेडकाच्या आवाज खूपच येत होता त्या आवाजात तो मित्र त्या बाईला घेऊन गेला आणि एका मोठ्या वळणावर गाडी वेगाने वळवत त्याने त्या बाईला धक्का दिला आणि गाडी आहे त्या वेगात परत आणली .गाडी आली मी माझा मित्र गाडीत बसलो आणि गाडी अती वेगाने धावू लागली तिघेही त्या बदलत्या रूप आठवत होतो आणि परत परत घामाने पावसातही चिंब भिजलो होतो. गाडी गावात आली तरी ही आम्ही एकमेका बरोबर एक शब्द ही बोललो न्हवतो.घर आले तरी ही आम्ही एकमेकाशी बोललो नाही ,घरातले वाढतो म्हणत होते पण आम्हाला भूकच न्हवती ,आत्ता पर्यंत रात्रीचे साडे बारा वाजले होते.भिजेल्या कपड्याबरोबर आम्ही अंथरूण धरले.झालेला प्रकार ,ती सुंदर स्त्री आणि त्या सुंदर स्त्री चे बदलते रूप आठवून आजुन घाम येत होता.धिराचा आणि धाडशी ड्रायव्हर मित्र होता म्हणून आमच्या सर्वांचे प्राण वाचले होते हे मात्र निश्चित.