अक्षता
अक्षता
"अक्षता"
लग्न म्हटलं की लगबग, घाईगडबड,रुसवेफुगवे आणि संस्कृती या गोष्टी आल्याच,मग त्यात हळदीचा कार्यक्रम असो किंवा अनेक रितिभाती यांचा समावेश असतोच.मुळात ही लग्न पद्धती समाज्याच्या मान्यतेचे प्रतीक किंबहुना एकत्र पुरुष आणि स्त्री एकत्र राहण्यासाठी समझ्याकडून घेतलेली मान्यताच म्हणावी लागेल,तसे केले नाही तर लोक काहीही अर्थ काढायला मागे पुढे पाहत नाहीत.असो,
आगोदर लग्न पाच दिवस चालायचे पाहुणे मंडळी पाच दिवस घरी येत असत परंतू काळानुरून पद्धती बदलत राहिले,वेगवेगळ्या पद्धती मागे पडत गेले आणि नवीन पद्धती अंमलात येत गेल्या, नवीन पद्धतीचा स्वीकार करताना काय म्हणून स्वीकारायचा हा ही खूप मोठा प्रश्न समोर येतो, मग जुन्या पद्धती बाद होत्या का हा ही प्रश्न च आहे,
थोडक्यात म्हणजे जी ओठी म्हणून जुन्यापद्धतीने भरायचे त्यात ओंझळ भरून धान्य घालत होते त्यामुळे ओठी भरून जायची पण कालांतराने ही ओंझळ कमी कमी होत जाऊन ती एका प्लास्टिक
पिशवीत पंचवीस ग्रॅम सर्व मिळून बंद झाले,बरं ही ओठीच कमी झाली का ? तर तसे ही नाही पदारच्या जागेला ओठनि आली हे ही तितकेच सत्य आहे.
बर झाले ते झाले पण अलीकडे एक पद्धत म्हणा किंवा पैश्याच्या अपव्यय म्हणा किंवा दिखावा म्हणा , अक्षता देतात ते नवरा नवरीला आशीर्वाद मिळावा अक्षताच्या रूपाने उभयतांच्या डोक्यावर वरती आशिर्वादांचा वर्षाव व्हावा हा त्याच्या मागील उद्देश ,पाच ते सात मंगलास्टक असतात तेवढे होई पर्यंत मूठ भरून अक्षता मिळायला हव्यात पण आत्ता तसे दिसत नाही नवीन काही करायचं म्हणून रंगीबेरंगी कपडा मध्ये चार तांदूळ (अक्षता) बांधून देण्याची पद्धत आली आहे पण ते अक्षता एका मंगलास्टक ला ही पुरत नाहीत तर ,पाच सात मंगलास्टक ला अक्षता कश्या पूरतील आणि उचित आशीर्वाद नावदाम्पत्याना कसेकाय मिळणार याचा विचार व्हायला हवा,निव्वळ नाविण काही करायचे म्हणून काहीही करण्यात काय अर्थ आहे जे काही विधी करतोय त्या कश्यासाठी करतोय याचे भान नवीन बदलत चाललेल्या आणि नियोजन करणाऱ्या संस्था निकारायला हवे.
विवेकानंद बेनाडे
टाकळी (सैनिक)