STORYMIRROR

Vivekanand Benade

Tragedy Inspirational Thriller

1  

Vivekanand Benade

Tragedy Inspirational Thriller

"प्रसंग..."!

"प्रसंग..."!

7 mins
35

 *' प्रसंग '*

________

""""""""""


••• सकाळपासूनच मनाची अवस्था काही बरी वाटत नव्हती ...

••• मागं घडून गेलेल्या एका गोष्टीचा मनानं अचानक मागोवा घेतला होता ... 

••• त्यावेळी घडलेली प्रत्येक घटना आपोआप डोळ्यांसमोरून पुढं पुढं सरकत होती ...

••• घटनांचा मागोवा घेत मन जसं जसं पुढं जात होतं तसं तसं डोळे पाण्यानं भरत होते ...

••• नकळत कंठ दाटून येत होता ...

••• समोरच्या माणसाशी बोलणं अवघड होतं होतं ... 

••• डोळे पाण्यानं भरलेले आणि आपल्याला पुढं काही बोलता येणार नाही, असं लक्षात आल्यावर मी हातानंच इशारा करून तिथून बाहेर आलो ...

••• मनाचा तोल आवरता येत नव्हता ... शेवटी हुंदका आवरता आला नाही ... गाडी उभी करून मोठयानं रडावं का ? कोणाजवळ रडावं ? डबडबलेले डोळे याच विचारांनी कोरडे पडले पण मनाची बेचैनी काही कमी होत नव्हती ...

••• घडलेल्या घटना पुन्हा पुन्हा बुद्धीला काबीज करत होत्या आणि मनाला रडवत होत्या ...

••• घटनेशी संबंधित सगळ्या व्यक्ती डोळ्यांसमोर येत होत्या ... कोणाचा राग तर कोणाची दया येत होती ... एकंदरीत कोणावर राग धरावा आणि कोणाला दया दाखवावी, हेच मुळात कळत नव्हतं ...

••• अस्थिर होऊन घरापासून ते या सगळ्या घटना पुढं कशा कशा घडत गेल्या त्या मार्गानं मन सुसाट धावू लागलं ...

••• काय असेल त्या माऊलीच्या मनाची अवस्था ... काय असेल त्या बापाच्या मनाची अवस्था ... काय असेल अवचित घडून आलेला तो प्रसंग ... 

आणि 

... जिवावर बेतलेल्या त्या प्रसंगाची कर्मकहाणी, मनाला तुडवून तुडवून मारणारी ...

*•••---•••*

••• सकाळची सव्वा बाराची वेळ ...

मोबाईलची रिंग वाजते ... 

समोरून आईचा भेदरलेला आवाज ... 

भेदरलेल्या आवाजात ती बोलत होती ...

घाबरलेल्या मनानं कच खाल्ली होती ...

••• *" बाळा, बाळा, पोलीस आलेत रे ...*

*अण्णांना, भाऊला घेऊन चाललेत ...*

*तू ये रे लवकर ..."*

••• पूर्णपणे घाबरलेल्या आवाजानं आता जमीन सोडली होती ... 

••• मी धीर देत म्हणालो, *" तू भिऊ नकोस. मी आलो लगेच ..."* 

••• कंपनीत कुणालाही न सांगता मी घर गाठलं ... 

दुपारचं ऊन रखरखत होतं ...

समोर वडील, आई, भाऊ यांना गाडीत घेऊन पोलीस निघाले होते ...

••• मी त्यांना थांबवून विचारलं, *" का, काय कारण ? "* 

••• त्यांनी संपूर्ण तपशील सांगितला ... "

म्हणाले. .." तुमच्या भावाच्या पत्नीने तुमच्या भावावर् आणी आई वडीलान् वर तक्रार् केलेली आहे की तुम्ही त्याचा अपमान करता..!खायला देत नाही..! फसवून लग्न केले आहे..!

त्याचा आरोप आहे की...

" तुम्ही त्यांच्या घरी जाऊन मारहाण केली..! 

मी म्हणालो.... "सर यात काही तथ्य नाही".....लग्न होऊन सात वर्ष झाली साहेब..! मुलगी आहे ..पहिलिला..! आणी आत्ता तक्रार ..?

आईवडिलांनी कधी कोणाला बाजूला हो ...असे कोणाला म्हणाले नाही साहेब...

"माझे वडील भारतीय नेव्ही मधे होते..." तीन लढाई मध्ये उत्तम कामगिरि साठी त्यांना गोल्ड मिडल आहेत्....! साहेब आम्ही तसे काही कलेले नाही. 

अधिकारी म्हणाले.." तुमच्या राहणीमानावरून ते कळते.. स्वभाव् ओळखतो आम्ही.." पण काय करणार तुम्हला पोलीस स्टेशन ला यावे लागेल..!" चला..."त्याना बोलावून घेऊ आणी समोरासमोर. घेऊन मिठवता येते का पाहू..."

"तुम्ही या आमच्या मागे... " असे बोलून ते निघाले..

पोलिस गाडी पाठोपाठ मी माझी गाडी घेतली ...

••• पहिलाच प्रसंग असेल हा, ज्या आई वडिलांनी कुणाला *" बाजूला हो "* म्हटलं नाही, की *" का रे "* असं कधी म्हटलं नाही त्यांच्यावर असा प्रसंग ...

••• पण मला कच खाऊन चालणार नव्हतं ...

••• मी जरा धीरानं घेतलं ... 

कोणी तरी माहितीतलं पाहिजे म्हणून मी ओळखीच्या लोकांना फोन केला ... 

दोघंजण पोलिस स्टेशनला आले ...

एव्हाना मनातली भीती वाढू लागली होती ... 

काय होणार कुणालाच कल्पना नव्हती ... 

असणारच कशी ..? 

या असल्या गोष्टी कधी आयुष्यात घडल्याचं नव्हत्या ... 

आईच्या डोळ्याला बांध घालणं खूपच अवघड होतं ...

*" का म्हणून असं झालं आणि कोणाचं काय बिघडवलं आम्ही म्हणून अशी वेळ बघायला मिळाली,"* असं, केविलवाणं होऊन आई मला विचारत होती ... 

••• मी आता माझं दुःख दाखवून चालणार नाही हे मला उमगलं होतं ...

••• आईच्या डोक्यावर हात ठेवत, *" काही होणार नाही, मी आहे ना ? नको काळजी करु,"* असा विश्वास दिला ...

*•••---•••*

••• 'पोलीस स्टेशन म्हणजे काय' याची तिथल्या आरोपींना पाहून कल्पना आली होती ...

••• साडे आठ वाजले ... 

सकाळ पासून काहीही खाल्लेलं नव्हतं; पण भूकही लागत नव्हती ... 

••• पी.एस.आय. आले ... 

त्यांच्याशी बोलणं झालं ... 

बोलणं बरं झालं ... 

••• सर्वांकडं बघत पी.एस.आय. म्हणाले,

*" माणसं आम्हाला ओळखतात, त्यामुळं तुम्ही काही काळजी करु नका, "* 

त्यांनी दिलासादायक धीर दिला ... 

त्यामुळं मनाला थोडी उभारी मिळाली ... 

पी एस आई म्हणाले.... एकदारीत तुम्ही सर्व सुशिक्षित आहात आणी आम्हि चेहऱ्या वरून लोक ओळखतो ! 

तुम्ही आई वडिलांना घरी घेऊन जावा, फक्त भाऊ इथे राहूदे, ...तुम्ही काही काळजी करू नाका! असा दिलासा देणारा शब्ध त्यांनी दिला..,

मी म्हणालो सर,! भाऊ इथे कसा राहणार... त्याला ही सोडा..!

होईल तेवडी मदत मी करतो.. काळजी करू नाका..

••• त्यांनी सांगितलं, की कोर्टात हजर करायचं आहे ... 

वकील बघा ... संबंधित चांगल्या वकिलांची नावे त्यांनी सांगितलि आणी वकिलाना फोन ही करून मदत करायला सांगियाले...

वकीलांना भेटलो ...

वकील तसे चांगलेच भेटले ...

पूर्ण केस होईपर्यंत काही पैसे ठरवले ...

••• पण पैसे आणणार कुठून ...

कोर्ट आलं ... 

संध्याकाळ झाली तरीही काही सुनावणी होत नव्हती ... 

शेवटी संध्याकाळी सात वाजता सांगितलं, की 

*" एक दिवस तरी जेलमध्ये राहिलंच पाहिजे ...*

*उद्या सकाळी सोडू, मात्र दोन लाखाचा जामीन पाहिजे ... "* 

••• डोळे गरागरा फिरू लागले ... 

दोन लाखाचा जामीन कुठून आणणार ..?कुणाकडं आहे एवढी रक्कम ..?

बरं जमीन पण नाही सात बारा काढावं म्हटलं तर ...

पैसे आणायचे कुठून ..?

••• खूपच मोठा प्रश्न समोर उभा होता ...

••• पाहुणे ... छे ..! असे कोणतेच पाहुणे समोर नव्हते जे एवढी मदत करू शकतील ...

काय करावं ... ???

मती-बुद्धी विचारानं थकली होती ...

••• लांबचा एक पाहुणा आठवला ... वीस गुंठे जमीन ... लगबगीनं त्याच्या गावी गेलो ... सर्व हकीकत सांगितली ... तो मामा तयार झाला ... 

तो म्हणाला, *" जमीन आहे तिथंच राहणार आहे ...‌ त्यात काय विचार करायचा ... त्यांनी सात बारा घेऊन ठेवतो म्हणून सांगितलं ... वेळ नव्हताच ... " लगेच घेऊन जायचा, "* मी म्हणालो, *" मामा, वेळ नाही, चला सात बारा आणूया ... "* 

••• रात्रीचे आठ वाजले होते ...

*'ग्रामपंचायत बंद'* 

करायचं काय ... 

*" कोतवालाच्या घरी जाऊया "* असं मामा म्हणाला ...

तडक कोतवालच्या गावी गेलो ... 

त्याला सगळं सांगितलं ... 

तो येतो म्हणाला ... 

कोतवालनं सात बारा काढला खरा पण तलाठ्याची सही ? 

रात्री दहा वाजले असतील ... 

आत्ता कोण सही करणार ? 

पण काहीही करून तो सातबारा पाहिजेच होता ... 

••• तलाठ्याच्या घरी गेलो ... त्यांना उठवलं ... रात्रीचे साडे अकरा वाजले असतील ... तलाठी उठले ... 

ते म्हणाले, *" आत्ता या वेळी ? "* 

त्यांनाही सगळं सांगितलं ... 

ते म्हणाले, *" ठीक आहे, पण माझी बदली झाली आहे ... गेले चार दिवस झालेत; पण मी मागची तारीख टाकून सही करतो ..."* 

खरंच, असे ही चांगले लोक आहेत जगात ... 

••• त्यांचे आभार मानले ... त्यांनी सही केली आणि जीवात जीव आला ... आत्तापर्यंत दाबून राहिलेला श्वास मोकळा झाला ...

सुटकेचा श्वास होता तो ...

••• हा आनंद खूप मोठा होता ... 

सकाळी त्या मामांना घेऊन सरळ कोर्ट गाठलं ... 

सर्व कामकाज होईपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते ... 

आई वडील खूप लांब होते ... 

त्यांना त्या ठिकाणापासून जेवढं लवकर बाहेर काढता येईल तेवढं चांगलं होतं; पण रात्र झाली होती ...  

जवळ जवळ सव्वाशे किलोमीटर अंतर रात्री दोन चाकी गाडीनं पार करत जेलजवळ पोचलो ... 

जेलरला भेटलो ... त्यांना सगळं सांगितलं ... कोर्टाची ऑर्डर दाखवली ... 

जेलर म्हणाले, *" रात्र झाली आहे, आत्ता काहीच करू शकत नाही ... सकाळी या ..."* 

••• तिथूनच माझ्यासोबत आलेला दूरच्या मामाचा मुलगा म्हणाला, *" एक फोन करतो, ते करतील काही तरी ..."* 

रात्री दोन वाजले असतील ... 

त्यांना फोन केला ... ते तिथले प्रतिष्ठित व्यक्ती होते; पण त्यांना पण जेलर म्हणाले, *" आत्ता रात्र आहे. आणखी चार तास थांबा. मी सकाळी सातला सोडतो ..."* 

••• त्या व्यक्तीनं सांगितलं, की *" घरी या, रात्री रहा ... सकाळी जा ... खूप थंडी आहे, तर तुम्ही घरीच या ..."* 

••• आम्ही त्यांच्या घरी पोचलो आणि थोडा आराम केला ... पण आराम कसला ... झोप नाही लागली ... सकाळ कधी होते इकडंच लक्ष लागून राहिलं होतं ...

••• सकाळ झाली ... चहा घेतला आणि थेट जेल गाठलं ... सर्व अधिकाऱ्यांची भेट घेतली ... 

त्यांनी सकाळी सात वाजता आई-वडिलांना सोडलं ... सोडताना आई-वडिलांकडून काढून घेतलेलं सर्व साहित्य त्यांनी परत दिलं ...

••• आई-वडिलांना समोर बघून कंठ दाटून आला ... 

तीन दिवसांनी आई-वडिलांना पाहत होतो ... 

कसा गेला असेल पूर्ण एक दिवस आणि रात्र जेलमध्ये ... काय दिलं असेल खायला ... कुठं राहिले असतील ... असे अनेक प्रश्न त्यांना पाहून आपसूकच येत होते ...

••• सर्व बाजूला ठेवलं आणि त्यांना पहिलं चहा आणि नाष्टा करायला घेऊन गेलो ... 

खूप मोठा सुटकेचा श्वास सोडला ... 

मन खंबीर पण किती खंबीर, याला पण काही मर्यादा असतातच ना ... 

••• आई-वडिलांना घराकडं जाण्यासाठी गाडीत बसवलं आणि पुढील कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कोर्ट गाठलं ... 

••• संध्याकाळ झाली ... 

भाऊला पण सोडवून त्यालाही घराकडं पाठवलं ... 

••• मी मामाचे धन्यवाद मानण्यासाठी त्यांच्या गावी गेलो आणि त्यांना पाहताच मन गहिवरून आलं ... हुंदका आवरता आला नाही ... 

मोठमोठ्यांनी रडून काळीज हलकं झालं ... 

मामाची बायको मला डॉक्टर मामा म्हणत होती ... 

त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण दुःख काही कमी होत नव्हतं ... आणि ते इतरांना सांगूनही जमणार नव्हतं ...

त्यांचे आभार मानले आणि घरी आलो ...

••• मग चालू झाल्या ... कोर्टाच्या तारखांवर तारखा ... 

तरी निकाल लवकर लागत होता ... 

*तक्रारीत काहीच तथ्य नसल्यामुळं कोर्टानं ती केस बरखास्त केली ...*

••• पण झालेला त्रास सहन होण्यापलीकडला होता ...

तो विसरणं अशक्यच आहे ... 

किंबहुना मी असं म्हणेन, की कशाला एवढा त्रास ... कशाला ते जगणं .. कशाचं आलं नातं ... कुणाची आणि कशासाठी सांभाळावी नाती, जी कष्ट देतात ... गरजेला उपयोगी न पडणारी नाती का सांभाळावी ?

••• हाच तो एक *'प्रसंग,'* जो काही दिवसांनी पुन्हापुन्हा माझी भेट घेण्यासाठी येत असतो आणि मला रडवत असतो ... 

••• निव्वळ याच एका रात्रीनं मला गप्प राहायला शिकवलं ...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy