STORYMIRROR

Vivekanand Benade

Comedy Drama Thriller

3  

Vivekanand Benade

Comedy Drama Thriller

मयत

मयत

4 mins
157

सकाळ सकाळी फोन वाजला,येवढ्या सकाळी सकाळी कोणाचा फोन?म्हणत म्हणत फोन घेतला , नात्यातलाच एकाचा होता,तो म्हणाला तो म्हणाला आमुक आमुक याचा मुलगा गेला ! आजुन वेळ आहे प्रेत आणायला ,तू लवकर निघ!

थंडी "मी" म्हणत होती ,पण जाणे गरजेचेच होते,किती ही काही केले तरी नात आहे जायलाच पाहिजे.गाडी काढली थंडी खुप असल्यामुळे डोक्याला कानाला सगळे बंद केले,गावाचा मार्ग काढत आम्ही पोचलो.

घराचा पत्ता विचारायची गरज लागली नाही जवळूनच ओरडण्याचा म्हणजेच रडण्याचा आवाज येत होता,मेलेल्या माणसाच्या घरातील रडणे म्हणजे काय ते तुम्हाला माहीतच आहे, एक विष्टिस्त पद्धतीने आवाज काढत बायका रडत होत्या."ह... आत्ता काय करू ग........ कुठं शोधू तुला.... ये माझ्या लाडक्या..... असं कोणी तरी म्हणत म्हणत रडत होते. मधूनच कोणी तरी म्हणत होते ..तोंडानं सांग तोंडानं सांग... त्यो हायका इथ ऐकायला ...?गप्प गप्प हा.... असं म्हणत तिला शांत करत होती ,ती बाई शांत होतेन होते तोच दुसरी पाहुनी बाई प्रवेश करते ती पाहुनी बाई घराच्या दरवाजा जवळ येऊ पर्यंत हसत होती आणि आलो लगेच, म्हणून नवऱ्याला खुणवत होती.जशी ती दरवाजा जवळ आली तशी एकदम ओरडायला च चालू केली .कुठे रे ....गेलास ....,कसा रे सोडून गेलास ...ये माझ्या राज्या...ये आका बोलतूया का बघ म्हणावं ...तुझी मावशी आली की रे तुला भेटायला....ये माझ्या राजा. ..... असे गान गातोय तशी ती रडत होती,मी निरखून पाहत होतो,आत्ता पर्यंत हसत असलेली ती स्त्री अचानक येवढ्या मोठ्याने कशी काय ओरडू शकते म्हणजेच(रडू शकते) हा प्रश्न अजून तरी अनुत्तरीत आहे.मी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे कडे निरखून पाहत होतो.प्रत्येक पाहुणा वेगळा होता ,पण प्रत्येक स्त्री एक सारखीच होती .तिचे मयताच्या उंभाऱ्या पर्यंत येई पर्यंत हसणे आणि आत पाऊल ठेवताच दुःखाचा डोंगर एकटीच्या अंगावर पाडवा तसा त्यांनी फोडलेला टाहो आवर्जून पाहण्यासारखा होता.

          त्यांच्या रडण्यामागे खुप काही गोष्टी बायका सांगत होत्या,आत्ता पर्यंत त्यानं काय केलं.... कुठल्या वेळेला त्याने काय म्हटले .. ते ही रडण्याचा स्वरातच सांगत होते.मला खूपच हसू येत होत.पण हसणार कसं?हा मोठा प्रश्नच होता.थोड्या थोड्या अंतराने पाहुणे येत होते,आपापली गाडी सोडून पुरुष मंडळी कोण ओळखीचे पाहुणे आहेत का पाहून तिथे जाऊन हात मिळवून आपसात चर्चा करत होते.पण स्त्रिया घरात जाई पर्यंत हसत होत्या पण दाराजवळ जाताच एका असा हंबरडा फोडत होते की अक्का गाव जागा होईल.किती प्रेम असेल त्या बाईला त्या व्यक्ती विषयी याचा अंदाज मी बांधत होतो,एकाच ठिकाणी बसलेले ते प्रेत गपगुमान सगळे ऐकत होते,या सगळ्याचा जणू त्याला वीट यावा तसेच ते डोळे मिटून बसलेले वाटत होते.

          आख्या आयुष्यात यातले कोणी साधे भेटायला सुधा आले नाहीत ते रडताना बघून ते प्रेत मनातल्या मनात हसत नसेल का असा प्रश्न मला पडला होता. एव्हाना पाहुणे मंडळी सगळी जमा झाली होती,जवळचे कोण तरी येणार म्हणून आजुन ते प्रेत प्रतीक्षेत बसून होते,आत्ता ते ही आले म्हटल्यावर प्रेत उचलायला लगबग सुरू झाली,कोण काय काय तरी एकमेकाला आणायला सांगायच्या नादात ते प्रेत पडलेलं आहे त्याच्या कडे कोणाचे लक्षच नाही असे वाटत होते,त्याला डावलून त्याच्या वरून जाऊन कार्यक्रम करायचे चालू होते,ते प्रेत मात्र होत असलेला प्रकार कदाचित पाहत असेल त्याला ही हसू आल्याशिवाय राहिले नसते.का बरे मी मेलो? असा ही प्रश्न पडला तर आश्चर्य वाटायला नको.

          लगबग सुरू झाली ,जो काही विधी करायचा होता तो करून झाला होता, प्रेत उचालयच्य्या वेळी अशी काही लोक त्या प्रेतावर तुटून पडले की ते प्रेत आणखी एकदा मरते की काय असे वाटले.एका पेक्षा एक बायका मोठमोठ्याने रडत होते पण कोणाच्याच डोळ्यात एक थेंब पाणी न्हवते हेआश्चर्य.

          स्त्रियांच्या पेक्षा पुरुष मंडळी खुप होती पण एकाच्या पण डोळ्यात पाणी न्हवते आणि ते रडत ही न्हवते पण चेहरा पाडून होते ,निदान तेवढे तरी करायला पाहिजे असे त्यांचे मत असू शकते. नातेवाईक मंडळीनी प्रेत उचलले ,कोणी खांदा द्यायला पुढे येत होते, कोणी काय करायला पुढे येत होते.बऱ्यापैकी प्रेताच्या मागून चालणारी माणसे एक मेकाशी बोलत होते हसत होते ,ओळख करून घेत होते ,कोण कोणाचे लग्न जुळते का पाहत होते.आमुक आमुक याची मुलगी ,आमुक आमुक त्यांचा मुलगा यावरच बऱ्यापैकी चर्चा अंत्यात्रेमध्ये होताना दिसत होते.

          कोणाच्या हि चेहऱ्यावर दुःखाचा लवलेश ही दिसत न्हवता हेच खरे,स्मशान भूमी आली प्रेताला खाली ठेवले सरणाची जमवा जमाव झाली होती ,चीता रचली होती प्रेताला चितेवर ठेवणार इतक्यात कोणाचा तरी फोन आला आणि पाच मिनिटे थांबा म्हणले ,पाच मिनिटे वाट बघितल्यानंतर एक गाडी आली त्या गाडीवरून एकदम हसत हसत येत असलेल्या नवरा बायको कडे लोक पाहू लागले ,जोडी अगदी आनंदात होती ,हसत होती .गाडी थांबली, सर्वांनी वाट दिली उतरल्या उतरल्या बाई जोरात प्रेताकडे येत होती ती आजुन ही हसतच होती ,ती प्रेता जवळ पोहाचल्या पोहचल्या ती एकदम त्या प्रेतावर अशी काही जोरात पडली आणि जोरड रडायला लागली ,त्या प्रेताला मारायला लागली ,सगळे तिच्या कडे पाहत होते की सेकंदाच्या आगोदर एकदम हसणारी बाई येवढ्या जोरात रडू कशी काय शकते, सगळे एकमेकाकडे पाहत होते.एक मिनिटात तिला तिथून हटवण्यात आले आणि आश्चर्य म्हणजे बाई उठल्या उठल्या आणि आहे त्या चेहऱ्यावर हसू आणून बिनधास्त चालू लागली.

          मला राहवले नाही मी चौकशी केली त्यात असे समजले की जो कोणी मला त्याला ती एकदाही भेटली न्हवती. आणि ती बाई त्यांच्या घरी ही कधी आलेली न्हवती मी सलाम केला तिच्या अभिनयाला आणि शांत बसलो.

          चितेला अग्नी दिला आणि लगेचच लोक निघू लागले.प्रेताला एकट्याला सोडून .कोणी अंघोळ केली कोणी केली नाही ,घरी येतो तोच हातात चहा ,मंडळी आता शांत झाली होती आणि चहा घेत होती.आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता फक्त चहा प्यायला न्हवते ते प्रेत.   


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy