STORYMIRROR

Vivekanand Benade

Drama Tragedy Inspirational

3  

Vivekanand Benade

Drama Tragedy Inspirational

बाशिंग

बाशिंग

4 mins
168

     " बाशिंग"

 लग्नाचा विषय जिव्हाळ्याचा ,एखाद्यानं मुलीचं ,मुलाचं स्थळ सुचवाव आणि लगबगीनं दोघांच्या घरी निरोप द्यावा ,दोघांच्या बाजून एखादा दिवस ठरावा आणि दोन्ही घरातील माणसे त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात.

     दोन्ही कडील माणसांना उत्सुकता असते ,नवऱ्या मुलाकडचे लोक गाडी काडून कोण कोण जायचे याचा हिशोब लावत असतात नवरा मुलगा मी कसा छान दिसणार यांच्या तयारीत कपडे आणि छानसे केस दाडी  करून तयार असतो.मुलींकडील मंडळींना पण तेवडीच उत्सुकता कधी येणार कधी येणार म्हणत मध्यस्थी ला चारपाच फोन करणार म्हणजे करणारच, आणि हो नेमके किती लोक हे मात्र सांगणे खुप गरजेचे ,नाही म्हटले तर काही कमी पडायला नको म्हणून ही चिंता,

       पाहुणे मंडळी चार बायका,पाच पुरुष आणि एका दुसरं बारीक पोरगं ,गाडी घरा समोर येताच स्वागतासाठी कर्ता माणूस पाणी आना म्हणून ओरडून हाक मारत पाय धुऊन घ्या ,हे घ्या टॉवेल असा पाहुणचार करून मंडळी घरात प्रवेश करतात,नवरा मुलगा मुलीला समोर आणि तोच मुलगा हे दाखवण्यासाठी तिच्या बसण्याच्या जागे समोरच त्याची व्यवस्था केलेली असते,चहा येतो कोणी घेतो कोणी घेत नाही कोण म्हणतं येवडा नको कमी करा,बरं येऊ दे का मुलीला !अस कोणी तरी म्हणत आणि सगळ्यांच्या माना होकारार्थी हलतात.ये गं बाळ अस कोणी तरी आवाज देत,वीस एकवीस वर्ष्याची मुलगी साडी सांभाळत बाहेर येत असते,स्वतः सुंदर दिसण्या करीता छानशी मुलगी सजलेली असते ,तीच्या अवघडल्या चेहऱ्याकडे बघीतळे की कळते मुलीला साडी ओझी झालेली आहे,तरीही मुलगी बाहेर येते ती कुठे बसणार याचा उत्तर शोधत शोधत मुलीचे तोंड पूर्वेला असू दे म्हणत तिची बसण्याची जागा पक्की केली जाते.

     "ती" आली ,एक समोर पाठ ठेवलेला त्याच्या वर ती येऊन बसली थोडीशी बावरलेली पण स्थिर मनाने मुलगी बसलेली बसते ,एव्हाना सुंदर दिसणारा चेहरा पाच जणींनी कुंकू लावा म्हणत मुलीचे कपाळ कुंकू ने भरून टाकतात ,हा!!विचारा काय विचारणार ते,असा एक आवाज येतो ,सगळेच बघतात आणि आण्णा नाना तुम्ही विचारा म्हणत नाना विचारतात ,मुली "नाव काय?,भाऊ किती ,शाळा ?असे मोजकेच शब्द ,मधेच कोणतरी म्हणत ,हा मुलगा हा!विचारा त्याला, पण त्याला ही तीच प्रश्न ?झाले बघून एक मेकांना ?

     मंडळी उठतात ,'निरोप देतो"म्हणून उठून येतात ,आवरा आवर करतात ,मंडळी बाहेर येतात मधेच कोणी तरी म्हणत मुलीला परत बघणार का ?हो हो ! बोलवा बोलवा असे अनेकजण म्हणतात, मुलगी बाहेर येते मुळग्याला बघितलस का ? आताच काही विचारणार तर विचारून घे !असा सल्ला देण्यात आला,

मूलिला काही म्हणायचे नाही असे समजून पाहुने जायला निघतात ,दोन तीन दिवस दोन्हीकडे विचार विनमय होते ,मुलीला मुलगा पसंत आणी मुलीला मुलगी पसंत आहे का याची चाचपनी दोन्ही बाजूंनी केला जाते,लग्नाची मुहुर्तमेढ रवली जाते,पण खरंच मुलगीला मुलगा पसंद आहे का ?याचा क्वचितच विचार होताना दिसतो.

      कोण किती दागिने घालणार ,कोणाला किती कपडे कोणता हॉल आणि भरपूर काही याचा मेळ घालत मंडळी भरपूर खर्चाच्या ओझ्याखाली दाबली जातात,कसा मेळ घालवायचा याचा कश्याचा अंत मंडळींना लागलेला दिसत नाही.

       मुहूर्त मेड मुहूर्तावर रोवून खरच मुहूर्त चांगला निघेल का?हो !मला पसंद आहे ,म्हणून दोन मिनिटे बघून निवडलेल्या जोडीदाराला बरोबर घेऊन खरच संसार होणार आहे का याचा विचार मनात असून ही दोन जीव एकत्र येतात,एकमेकांची नावे घेण्याची उत्सुकता दोघांमध्ये खूप असते,एकमेकांविषयी खूप काही माहीत नसले तरी दोन जीव एकत्र येण्यास धडपडत असतात हे नक्की. मुहूर्त निघतो ,लग्नाची घाई उडते खरेदी ची झुंबड दोघांच्या घरी अगदी उत्स्फुर्तपणे पेललेली दिसून येतात.

   कोण रुसणार,कोण फुगणार हे गृहीत धरून बाजार केलेला असतो,मुहूर्ताचा दिवस उघडतो मंडळी ठरलेल्या ठिकाणी जमा होतात नवरी मुलगी ,नवरा मुलगा छान सजलेले असतात,अक्षता वाटल्या जातात ,मंगलाष्टक समवेत डोक्यावर अक्षता पडतात ,शुंभ मंगल सावधान असा इशारा देऊन ही अगदी आनंदाने एकमेकांशी नाते निभवायचे वचन देऊन लग्नगाठ बांधली जाते आणि संसाररूपी गाडीमध्ये स्वार होतात.

          कोणाचा स्वभाव कसा,आत्ता पर्यंत चा त्यांचा प्रवास आणि त्या प्रवासात एक मेकांना असेच सहकारी करून घेताना कोण कसा वागेल हे सांगता येईलच असे नाही.एकमेकांना नीट समजून घेण्याआधीच दोघेही आई वडील होताना बरेच जण दिसतात आणि मग सुरू होते संसाराची खरी सुरवात.

   सुरू होते धावपळ ,सुरू होते वडाताण,सुरू होते विचारच थैमान सुरू होते जबाबदारी ,आणि मग सुरू हिते वाद विवाद ,सुरू होते पैशाची कमी, सुरू होते खऱ्या अर्थाने संसार चा गाडा सुरू,ज्या दोन व्यक्तींनी काही क्षण एकमेकांना पाहून जोडीदार निवडलेले असते ते जोडी समणजेस प्रमाणे एकबरोबर राहतात की प्रत्येक क्षणाला विरोध करतात!आयुष्यचा असा जोडीदार निवडून संसार म्हणजे दोरी वरची कसरत असते,पटले तर पटले नाहीतर हे मी काय केले अश्या विचारापर्यंत दोघे येऊन थांबतात पण उत्तराची शोधाशोध मिळतेच असे होत नाही

आई वडील भाऊ बहीण याचा बोटाला धरून मुलगी मुलगा मोठे झालेले असतात वयाची वीस बावीस वर्ष एक विचार डोक्यात आलेला नसतो संसार ,बायको कशाची चिंता नसते आणि असे आयुष्य एक बंधन बांधून घ्यायचे म्हणून सर्व जण बांधून घेताना दिसतात.कित्येक कुठूम्ब एकमेकांना जोडले जातात नवीन संबंध निर्माण होताना दिसतात,पण खरंच ती जोडली जातात का मनाने हे ही तितकेच महत्वाचे आहे,की लोक काय म्हणतील म्हणून उभा राहिलेले हे नात्याचे बुजगावणे तर नाही ना याचा ही विचार करणे तितकेच महत्वांचे आहे.

विवेकानंद बेनाडे 
टाकळी (सैनिक)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama