STORYMIRROR

Amruta Shukla-Dohole

Classics

3  

Amruta Shukla-Dohole

Classics

प्रवास आयुष्याचा

प्रवास आयुष्याचा

2 mins
222

सर्वात जास्त एकटेपणा तेव्हा वाटतो, जेव्हा एकांतात बसल्यावर एकटाच का बसला आहेस, हे विचारणारे ही कोणी नसते. स्वभाव असा असावा की, भेटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला आयुष्यभर विसरू शकणार नाही.

आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत, समाधान मानून हसायला शिका. कारण कुणास ठाऊक, मोठ्या गोष्टी मिळे पर्यंत, समाधान आणि हसु टिकवता येईल का?

आजच्या आनदांच्या क्षणावर, उद्याचे स्वप्न, आणि समाधान टिकेल; पण उद्याच्या काळजीत, आजचे सुख हरवू नका. चांगल्या दिवसांसाठी, वाईट दिवसांशी लढावंच लागतं.

रात्री नंतर पहाट ही होतेच. फक्त थोडा धीर धरावा लागतो. धीर सुटला की, निर्णय चुकतात. आणी निर्णय चुकले की, आयुष्य भरकटत जातं. सामर्थ्य हे सांगण्याची अथवा, पाहण्याची वस्तू नसुन, वेळ आल्यावर, कृती करायची गोष्ट आहे.

मना सारखे घडायला भाग्य लागते, आणि जे काही आहे ते आपल्या मना सारखेच मिळाले आहे, हे समजायला ज्ञान लागते.

आयुष्यात व्यवहार तर खुप होतात,

पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही...

 कधीच कोणावर अवलंबून राहु नका,जे करायचं आहे ते स्वतःच करून दाखवा.,दुसर्‍यावर अवलंबून राहिल्यास आपण स्वतःची क्षमता विसरतो...

नाती टिकवण्यासाठी आवश्यकता असते झूळझूळ वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या झर्‍यासारख्या स्वच्छ मनाची आणि त्याच बरोबर अतूट विश्वासाची..  

दगडावरून पाणी वाहत असेल तर त्यावर शेवाळ जमा होत नाही, वापरात असणाऱ्या लोखंडावर गंज चढत नाही, त्याचप्रमाणे सतत प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना, कधीच अपयश येत नाही.   

 आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते. त्यामध्ये मे महिन्याची सुट्टीही नसते. स्वतः चा शोध घ्यायला, नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.

आयुष्यात कुणाची पारख त्याच्या रंगावरून न करता, उलट त्याच्या मनावरून करा, कारण पांढ-या रंगावर जर जगाचा विश्वास असता तर मीठानी सुद्धा जखमा भरल्या असत्या.

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते.

 


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics