STORYMIRROR

Vishal Puntambekar

Abstract

2  

Vishal Puntambekar

Abstract

परंपरागत वडापाव

परंपरागत वडापाव

1 min
101

 हो आम्ही परंपरावादी आहोत.एखादी मानसिक समाधान देणारी गोष्ट विशिष्ट पध्दतीने, विशिष्ट वेळी व अविरतपणे विशिष्ट कालांतराने करणे म्हणजे परंपरा.

 साधारणपणे ८-१० वर्षांपूर्वी जुनी ही परंपरा. मी अणि माझे मित्र रोहित वाघदरे, वडापाव हा आमचा जीव कि प्राण. अणि हो त्या काळात सिग्ध्न घटकांबद्दल (fats) आम्ही एवढे सावध नव्हतो. नवरात्रीचे उपवास म्हणजे अत्यंत कडक सोपस्कार.

 उद्यापासून नऊ दिवस वडापाव खायचे नाही म्हणजे आमच्यावर आभाळच कोसळले. त्याकाळी आम्ही एकाच कार्यालयात काम करत असत. सायंकाळी कार्यालयीन काम संपल्यावर आम्ही डोंबिवली स्थानक ते घर चालत प्रवास करत असताना नवरात्रीचा उपवास व वडापाव याचा विचार करत होतो. तेव्हाच आम्हाला नैवेद्यचा वडापाव दिसला अणि एका परंपरेचा जन्म झाला. तो वडापाव खाल्ला अणि त्या आत्मसमाधानातून आम्हाला नऊ दिवस वडापाव न खाण्याचे बळ दिले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract