STORYMIRROR

Vishal Puntambekar

Others

3  

Vishal Puntambekar

Others

सेवेचे सार्थक

सेवेचे सार्थक

2 mins
185

५ वर्षाच्या सेवेचे सार्थक झाले


अनेक उतारचढ पाहिले पाचव्या वर्षाच्या सेवेसाठी, अनेक विघ्नांनंतर नेहमीच्या सोबतीबरोबर (अमोल तब्बेत बरोबर नसल्याने येऊ नाही शकला) अष्टविनायक यात्रा सू्रू झाली. सुमन हाईट्स समोर यात्रेचा नारळ फुटला. पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन सुखद, लोभस होते. जसे काय बल्लाळेश्वराने आमच्यासाठी इतर भक्तांना थांबायला सांगितले. अत्यंत शांत, कुठलीही गर्दी नाही. अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती म्हणजे वरदविनायक, एकच गणपती जिथे तुम्ही गणपतीला तुम्ही स्पर्श करू शकता. आम्हाला स्वत:च्या हाताने पुष्पमाला अर्पण करायला मिळाले. परत एकदा आशिर्वादाची प्रचिती. मोरगाव मयुरेश्वर, नेहमी रांगेत उभे राहावे लागणारे ठिकाण, मी, सुनील अणि वाघदरे दर्शनासाठी पुढे आलो. गावात पुलवामा हत्याकांडामुळे कडकडीत बंद. नेहमीचा गर्दिचा शिरस्ता मोडून दहा मिनिटात गाभाऱ्यात प्रवेश. मयुरेश्वराचे डोळा भरून दर्शन. सिध्दटेकच्या सिद्धिविनायक आमचा पुढचे दैवत. अष्टविनायकांपैकी एकमेव उजव्या सोंडेचा गणपती. देवाचे डोळा भरून दर्शन. कमी गर्दीत देवासमोर आपलं मागणं मांडले. नावापासून गणपती बनवण्यासाठी कोणी गेले नाही अणि थेऊरचा प्रवास सुरु झाला. गर्दीच्या बाबतीत मात्र इथे बाप्पाने आमची परिक्षा बघितली पण डोळा भरून दर्शन हा पाचव्या वर्षाचा अधोरेखित लाभ ईथेही कायम राहिला. बाप्पाच्या आमच्यावरील प्रेमाचा प्रत्यय तेथील मुख्य स्रीला पण आला अणि तिने सुरक्षारक्षकांना 'घाई करू नका, भक्त लांबून येतात' म्हणून सुचनावजा आदेश दिला. रांजणगाव पुण्यापासून जवळ असल्याने नेहमी भक्तांची गजबज असते. ५० रुपये मध्ये व्हिआयपी दर्शऩाचा फलक कोणालाच दिसला नाही. जणूकाही बाप्पाने आम्हा भक्तांना त्याच्याकडे रांगेने यावे म्हणून तो आमच्यासाठी लपवून ठेवला.मग परत एकदा रांगेतून आलेल्या आपल्या आवडत्या भक्तांचे बाप्पाने डोळा भरून दर्शन देऊन पारणे फेडले. पुढील प्रवास मात्र खडतर व परिक्षा पाहणारा ठरला. अष्टविनायक पाचव्या वर्षाचा प्रवास, सहा गणपतीने पुर्ण होतो कि काय ही शंका येण्याइतपत खडतर. पण बाप्पाच्या मनात काहीतरी वेगळे होते. आमच्या पाच वर्षाच्या यात्रेचा परमोच्च बिंदू. विघ्नेश्वराच्या गाभाऱ्यात फक्त आम्ही सहा भक्त. भरभरून दर्शन, अशीच सेवा घडू दे मागणे व्यवस्थित देवापर्यत पोहचेल एवढी शांतता व तल्लीनता, गाभार्यात आम्हाला 'निराकार ओमकार' व मोरयाची नावे घेण्याची दिलेली परवानगी, सारेच अलौकिक. अनुभूतीने डोळ्यात पाणी आले. तसाच कापणारा आवाज सांभाळत मोरयाची नावे पुर्ण केली. गिरिजात्मजाच्या दर्शनासाठी मी, सुनील अन वाघदरे पहाटे सहा वाजता निघालो. मजल, दरमजल करत डोंगर चढलो. गाभारा प्रचंड भक्तांनी भरलेला, आम्ही तिघे दर्शनासाठी गिरिजात्मजाच्या समोर उभे राहीलो अणि पुजाऱ्याने आज तुमच्या हातून आरती होणार सांगितले. जणूकाही एवढ्या जनसमुदायामध्ये आमच्या येण्याची ते वाट पाहत होते. रोज ७ वाजता होणारी आरती १५ मिनिटे अगोदर आमच्या हाताने झाली. आलेली विघ्ने ही बाप्पाने पाचव्या वर्षाची अनूभुती देणारी व्यवस्था होती. म्हणून सार्थ शिर्षक ५ वर्षाच्या सेवेची प्रचीती झाली.

मोरया मोरया अष्टविनायक मोरया


Rate this content
Log in