Ujwala Rahane

Tragedy

3.7  

Ujwala Rahane

Tragedy

# "प्रिय आई"

# "प्रिय आई"

2 mins
528


  बापाची बळजबरी तुझी कमजोरी यात जन्म घेतला तुझ्या उदरी. नको नको म्हणत असताना देवाने दान तुझ्या पदरात टाकले. तुझी इच्छा नसतानाही मग तुला ते जपावे लागले. उदरी तुझ्या तु माझ्याशी संवाद साधायची. मीही हुंकाराचा प्रतिसाद द्यायची. नियोजित वेळी तुझी प्रसुती झाली. मुलगी झाली म्हणून सगळ्यांनीच नाके मुरडले. बाबांनी पण नाही बघीतलं. शेवटी तुला पोटचा गोळा म्हणून सगळे करणे भाग पडले. 


  नित्य नवे अनुभव तुला अनुभव येत होतं. मला पदराआड घेऊन तु मनाशीच बोलवायचीस. त्या तु मला बरेच काही शिकवायचीस. माझ्यासाठी बरेचदा बरेच काही सहन करायचीस.   मी मोठी होत गेले तशी तशी रोज तुझ्यावर चाललेले अत्याचार मला बघायला मिळाले. अनुभवाने शाहणी झाले. वय वाढत गेले. नकळत अनुभवाने मी वयापेक्षा जास्तच शिकले. शाळेचे दिवस भुर्रकन संपले. माझ्या हुशारीचे तुला कौतुक भारी. हौसेने तु मला शिकवलेस. शिकून मी मोठी झाले.


 मी शिकताना आणि माझ्या शिक्षणाचा व्याप सांभाळताना तुझ्या कडे माझे पण आणि तुझे पण दुर्लक्षच झाले. 

रोजच्या बापाच्या बळजबरीने तुला असाध्य रोगाने ग्रासलं.आतल्याआत तु कुढत होतीस होतीस. दिवसेंदिवस संपत होतीस.माझी प्रगती पाहून चेहऱ्यावर समाधानी दिसत होती. 


 मी स्थिरस्थावर झाले. मग तुला मग माझ्या लग्नाचे वेध लागले. पटकन सगळे जुळूनही आले. मला मनाजोगता जिवनसाथी मिळाला मात्र त्याला माझ्या आधिच तुच बऱ्याच वचनात बांधील केलेस. स्वप्नपूर्ती होताच माझा हात त्याच्या हाती देऊन तु आनंदाने डोळे मिटलेस. 


 आज आई सगळे आहे. तु नाहिस माझ्यासाठी तू जगलीस मलाही जगवलेस. मी मात्र हरले तुझ्या साठी मी काहीच नाही केले. ठरवलय आता माझ्या शिक्षणाचा उपयोग करायचा तुझ्या सारख्या मातांना न्याय मिळवून द्यायचा. माझ्या जोडीदाराची साथ मला आहे. नक्कीच स्वप्न साकार होईल. तु नक्कीच तुही बघत असणार. मुलगा मुलगी भेदभाव मिटून टाकण्याचा प्रयत्न मी करेल हा प्रयोग जेव्हा यशस्वी होईल तीच तुझ्या साठी श्रद्धांजली असेल.


  फक्त एकच मागणे तुझ्यापाशी तुझी सहनशीलता मला देशील. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे ही प्रेरणा घेऊन तु माझ्या पोटी जन्माला येशील? स्वागताला आम्ही दोघंही तयार आहोत. कारण नव्याने तुला जगायला शिकवायचे आहे. अबला नव्हे तर सबला तुला करायचे आहे. आता एकच इच्छा घे जन्म तु फिरूनी माझ्या पोटी खोटी ठरो न देवा ही एक आस मोठी!.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy