Jyoti gosavi

Inspirational

3.3  

Jyoti gosavi

Inspirational

परित्राणाय साधुनाम

परित्राणाय साधुनाम

2 mins
203


मंडळी टीव्ही वरती महाभारत सीरियल आली आणि, हा श्लोक घराघरात प्रसिद्ध झाला. 

अगदी खणखणीत शंखाचा आवाज, सगळ्या वाद्यांची चढती लय, आणि महेंद्र कपूर यांचा खणखणीत आवाज .या सगळ्यांची अगदी भुरळ पडायची. आणि त्यानंतर आज कितीतरी वर्षांनी परित्राणाय साधुनाम यावर लिहिण्याचा योग आला. 


यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥4-7॥

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥4-8॥


ऋषीमुनींच्या रक्षणासाठी, वाईट कर्म करणाऱ्यांचा नाश आणि धर्मसंस्थापनेसाठी मी प्रत्येक युगात प्रकट होतो.

भगवंतांनी अगदी सत्य सांगितले आहे .श्रीकृष्णाने सांगितले म्हणजे त्यावर विश्वास ठेवायलाच हवा. 


परंतु मंडळी जेव्हा खरोखरी महायुद्ध झाले, महाभारत घडले, तेव्हा श्रीकृष्णाने पांडवांना सांगितले होते

" न धरी शस्त्र करी मी, सांगेन गोष्टी युक्तीच्याच चार"

 आणि खरोखरी हातात शस्त्र घेऊन पांडवांच्या बाजूने श्रीकृष्ण लढले नाहीत. त्यांना सारं काही शक्य होतं एवढा मोठा महाभारत ते टाळू शकत होते किंवा एका क्षणात ते कौरवांच्या 11 औक्षहिणी सैन्याचा फडशा पाडू शकत होते. तरीही प्रत्येकाला आपले कर्म करण्यास भाग पाडले. आणि युद्ध समयी भगवद्गीता सांगून अर्जुनाला मोहापासून मुक्त केले. किंवा प्रत्येकाला आलेले, दिलेले मरण ज्याच्या त्याच्या कर्मानुसार होते .

पांडवांचा जय झाला कारण यतो धर्म : ततो जया:

********************

 आपल्या सगळ्यांचा असा एक गैरसमज आहे की, आमच्यावर ती कोणतीही परिस्थिती आल्यानंतर, परमेश्वर अवतार घेणार, आणि आमचे रक्षण करणार. 

आणि ह्याच आपल्या वृत्तीमुळे आपण वर्षानुवर्षे निद्रीस्त राहिलो, आणि आपल्यावरती इतर धर्मियांनी आक्रमणे केली. 


सावरकर म्हणतात "आम्ही इतर ठिकाणी धर्म वाढविण्यासाठी जाऊन आक्रमण केले नाही, म्हणून लोकांनी आमच्यावरती आक्रमण केले"

 परमेश्वराने फक्त दहाच अवतार घेतलेले नसून, अनेक अवतार घेतले. 

त्या त्या वेळी तुमचे धर्मरक्षण देखील केले. 

देव असा प्रत्यक्ष खाली शस्त्र घेऊन येत नाही. 

तो कोणत्या ना कोणत्या रूपाने येतो. 

धर्मरक्षणासाठी अनेक संत, महंत ,अगदी फक्त महाराष्ट्र पुरती परंपरा पहायची झाली, तर संत रामदास, संत एकनाथ, हे वृत्तीने लढवय्ये होते. 

एकनाथांनी तर, एकदा परकीय आक्रमण आले असता, गुरु ध्यानस्थ बसले होते म्हणून स्वतः हातामध्ये तलवार घेऊन घोड्यावर बसून ते आक्रमण परतवून लावले आहे. 

श्री दत्तात्रेय, श्री नवनाथ, श्री परशुराम ,आणि भारत भूमी मध्ये संत रूपाने झालेले अनेक संत पुरुष ,हे सारे अवतारी पुरुष होत


अगदी शिवाजी महाराज, राणाप्रताप ,किंवा त्यांच्यासारखे असंख्य पुरुष हे सुद्धा दैवी अंश आहेत. 


शेवटी "प्रयत्नांती परमेश्वर"


 किंवा "हिंमत ए मर्दा/ तो मदत ए खुदा "


म्हणजे आपण फक्त हातावर हात धरून ,देव अवतार घेणार आहे आणि आम्हाला वाचवणार आहे ही धारणा सोडून दिली पाहिजे. तर स्वतः शस्त्रसज्ज राहून, स्वतःवर येणाऱ्या प्रसंगासाठी ,किंवा समाजावर येणाऱ्या प्रसंगासाठी, लढण्याची तयारी ठेवली पाहिजे. तरच परमेश्वर यश देतो. कुणाच्यातरी रूपाने तो मार्गदर्शन करतो ,त्याच्या अवताराची वाट न बघता आता स्वतः शस्त्रसज्ज होण्याची वेळ आलेली आहे. एवढे मला नमूद करावेसे वाटते. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational