परिस्तिथी (अलक)
परिस्तिथी (अलक)
आज गम्मत म्हणून बाईंनी "आई आपल्याला का आवडत नाही,?" ह्या विषयावर निबंध लिहायला सांगितला होता. तसे सर्वजण कामाला लागले, आठवायला लागले की आई का आवडत नाही? बाईंनी सगळ्यांना 7 मिनिटे वेळ दिला होता ,आणि ह्या सात मिनिटात कोणाचाही निबंध पूर्ण झाला नाही.. बाईंनी सगळ्यांच्या वह्या तपासल्या.. प्रत्येकाने हेच लिहिलं होतं की आई मला खेळू देत नाही, आई मला सारखी अभ्यास कर म्हणते आणि मला भरपूर चॉकलेट्स खाऊ देत नाही म्हणून मला नाही आवडत..पण ज्यावेळेस बाईंनी रजनीची वही बघितली त्यावेळेस त्या वहीत दोनच ओळी लिहिल्या होत्या त्या अशा " मी सुखरूप जन्म घ्यावा म्हणून आईने स्वतःच्या प्राणांची आहुती दिली,आणि स्वतः मात्र मला एकटीला टाकून देवा कडे निघून गेली म्हणून ती मला आवडत नाही" 5वीत ल्या मुलीचे हे शब्द व विचार बघून बाईंच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले,त्यांनी रजनीला कडकडून मिठी मारली..खरंच परिस्तिथी माणसाला असलेल्या वयाहून मोठं करते नाही का!
