STORYMIRROR

Shila Ambhure

Tragedy

5  

Shila Ambhure

Tragedy

परिस्थिती

परिस्थिती

1 min
470

        कपाट साडयांनी खचाखच भरलेले असतानाही रीमाला प्रश्न पडला की मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला कोणती साडी नेसावी. पाच-सहा साड्या हातात घेऊन ती बाहेर दिवाणखान्यात सासूबाईंचा सल्ला घेण्यासाठी आली. सासूबाई मात्र फाटकात उभे राहून काहीतरी बघत होत्या. हाक मारुनही त्या आल्या नाहीत म्हणून रीमादेखील बाहेर आली. समोरचे दृश्य पाहून तिची तिलाच लाज वाटली. एक वृद्ध आई तिच्या 20-22 वर्षाच्या मतिमंद मुलीसह अन्न-वस्त्रासाठी दारोदार हिंडत होती. तर दुसऱ्या बाजूला काही मोकाट 'कुत्री' जिभल्या चाटत संधीची वाट बघत होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy