AnjalI Butley

Drama Others

4.3  

AnjalI Butley

Drama Others

परिसंवाद -मोठी सामाजिक समस्या

परिसंवाद -मोठी सामाजिक समस्या

4 mins
359


कधी कुठून सुरू झाली ही प्रथा? मुलगी म्हणजे एक वस्तू आहे का दान करायला? हुंडा द्यायचा तोपण वर, मुलगा मागेल तेवढा! हुंडा देण जमणार नाही म्हणून गर्भातच मारल्या जातात मुली, शिकून काय करणार लग्न झाल्यावर चुल व मुलच सांभाळणार, एक जबाबदारी मिटली करून बोहल्यावर चढवणार, बालविवाह, वरमायचा मानपान आणि किती किती समस्या ह्या लग्नामुळे समाजात होत्या...

लग्न नाही केलेतर वेगळ्या सामाजिक समस्या... समस्या समस्या...

काही ठिकाणी लग्नसंस्था होती, खूप लोक एका लग्नापाठी कार्य करायची, मुलगी झाली किंवा होण्याच्या आधीच तीचा करार व्हायचा ती अमक्या परीवाराची सून होणार वैगरे, तशीच प्रथा अजूनही आमच्या गावात चालु आहे असे राजेश्वरी सांगत होती, पारंपारीक पद्धती जतन करत अभिमान ही गावकर्यांना आहे!

राजेश्वरीने विरोध केला स्वतःच्या लग्नाचा म्हणून मी समाजा बाहेर काढल्या गेली.. आई बाबा नातेवाईकांनी ही मला घरा बाहेर टाकले... काय वय होते माझे तेंव्हा फक्त आठ वर्षे... तस बघितले तर मला मारून जंगलात फेकून दिले होते मी मेले आहे असे समजुन... 

पण दैव बलवत्तर म्हणून मला ऐका शिकार्याने जंगलातुन उचलले, मुलगी म्हणून त्याचा हेतू चांगला नव्हता सुरवातीला, मी रडत होते, मला खूप लागले असल्यामुळे मी बेशुद्ध होते, त्याने मला त्याच्या गावातील दवाखान्यात नेले व उपचार सुरू केला. हि कोणाची पोर ह्या सख्या सखारामने उचलुन आणली जंगलातून करत गावकरी जमा झालीत!

गावात चर्चा कोण कोणाची आहे, पोलिसांचा विचार घ्यावा म्हणून पोलिसांच्या ताब्यात दिले, मी बरी झाल्यावर मला पोलिसांनी खूप विचारले, पण मी सगळे माहित असूनही माझ्या गावाचे, आईबाबांचे नाव सांगितले नाही, मला ही ती लोक नकोच, मरणाच्या दारातुन परत आले आहेच तर माझा हा जिवंतपणीचा दुसरा जन्म आहे, असा विचार करून मला काहीच आठवत नाही हे उत्तर दिले.

मग माझी रवानगी आधारश्रमात झाली, खाण पिण, व राहायला जागा मिळाली, १००-१५० मुलेमुली होती आश्रमात, बरेच चांगली काळजी आमची इथे घेतली जात होती.. मी शाळेत ही जायला लागली मला परत पहिलीला टाकले, पण मी आधी शिकली असल्या मुळे मी पटपट अभ्यास करून पहिला नंबर मिळवला. पुढच्या सर्व इयत्ता पहिल्या नंबरनेच पास झाली. मुळात वाईट चांगले, आपले स्वतंत्र विचार करण्याचा स्वभाव इथे आधाराश्रमात चांगलाच तयार झाला, त्याला चांगली दिशा मिळाली. 

गावाची, आई-बाबा, बहिणींची आठवण येत असे, मग एकटीच बसुन विचार करायची एकदा आपल्या आईबाबांना, बहिणींना गावाला जाऊन भेटूया, तीथील गावकर्यांना सामाजिक गरज काय आहे, बाकीच्या गावात झालेली प्रगती वैगरे सांगुन आपल्याही गावाची प्रगती करावी ही इच्छा बाळगुनच मोठी होत होती. आश्रमात येणार्या सामाजिक कार्यकर्त्यां बरोबर राहुन आपण ही समाज कार्यच करायचा निर्धार करूनच १८ वर्षे पुर्ण झाल्यावर त्यांच्या संस्थेत काम करू लागले व एक दिवस गावात राजेश्वरी मॅडम एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून काम करू लागली व जवळपास १०० मुलींचा बालविवाह थांबवण्यात यश्वस्वी झाली.. मी गावात गेली तेंव्हा कळले मीला जंगलात फेकल्यावर काही दिवसांनी माझ्या आईबाबांनीही जिव सोडला, माझे म्हणून रक्ताचे गावात कोणी नाही, बहिणीचे लग्न झाले होते तीपण पहिल्या बाळंतपणात मुलगी झाली म्हणून लहान मुलीचा जन्म होताच मुलगी व बहिणीला मारयात आले पण ती नैसर्गिकरीत्या मृत्यू झाला हीच नोंद आहे... अशी बरीच उदाहरणे आहेत..

राजेश्वरीला परीसंवादात एक प्रश्न विचारला तुम्ही तुमच्या लग्नाचे काही स्वप्ने बघितली असेलच त्या बद्दल काही सांगु शकणार का?

मी लग्नाचा विचार केला नाही, आधी माझ्या गावातील मुलींना मानाने जगायला शिकवणे हेच माझे प्राधान्य राहिल. याच माझ्या समजामपूर गावाला मी माझी कर्मभूमी बनविल.. इथल्या मुलींची मला सोबत असेलच, मग लग्न करणे हा प्रश्न आडकाठी म्हणून माझ्या समोर राहणार नाही!

परीसंवाद झाल्यावर गावातील शाळेतला एक शिक्षक तीला भेटायला आला, तो म्हणाला मॅडम मी गावातील शाळेत शिकवतो, शाळेत मुल व मुलींना समान दर्जा देऊन शिकवण्यावर भर असतो. ह्याच गावाचा रहिवासी आहे व माझे शिक्षण शहरात झाले. 

माझे नाव भैरवीलालसिंह खुशवहा!

मग गावाच्या बर्याच कामात दोघे भेटायला लागले, विचार जुळायला लागल्या, दोघ एकमेकांकडे एका अनामिक ओढीने भेटत असायचे दुसर्या गावातले लोक त्यांच्या गावातील मुलींना प्रबोधन करण्यासाठी बोलवत, तेंव्हा दोघे सोबतच जात. भैरवलाल पण एकटाच होता. एक दिवस त्यानेच लग्नाचा विषय काढला, विचार करून सांगते असे राजेश्वरीने सांगितले.

विचार जुळताय, सोबतच बर्यापैकी चांगले काम करतोय, लग्न करून एकत्रित काम करायला काहीच हरकत नाही असा कौल तीच्या मनाने दिला. 

तीने भैरवलालला हो सांगितले! एकदा बोलतांना भैरवलालने त्याच लग्न लहानपणी ठरले होते असे त्याच्या आईबाबांनी सांगितले पण मुलगी लग्नाला तयार नव्हती म्हणून लग्न तेंव्हा झाले नाही, मला मुलीचे नाव, तीच्या परिवारा बद्दल माहिती नाही. लग्न मोडल्यावर एक दोन वर्षाच्या अंतराने आईबाबांचे निधन झाले. काकाकाकू आहे पण त्यांनी माझी जबाबदारी घेतो म्हणत सर्व घर-पैसा आपल्या नावावर केले, मी परत एकटा पडलो, शाळेतल्या माझ्या मिराच्या वडिलांनी आधार दिला व मी माझे शिक्षण पुर्ण केले. तो मित्र व त्याचे आई वडिल एका अपघातात मागच्या वर्षी गेले मी परत पोरका, आता तु मला भेटलीस आपण आपला संसार करू या गावातील मुल मुलींचे चांगले भविष्य घडवण्यासाठी.

राजेश्वरीला आता थोडा अंदाज आला, ज्याच्याशी माझे लहानपणी लग्न ठरले होते व मी लग्नाला विरोध केला होता तो हाच!

लग्न गाठ स्वर्गातच ठरवलेल्या असतात त्याच आता प्रत्यक्षात उतरत आहे! 

एका परिसंवादात मांडलेल्या विचाराने एकत्र आलेले राजेश्वरी व भैरवलाल, लग्न ही सामाजिक समस्या सोडवण्यासाठी एकत्रित आले व बालपणी मोडलेले लग्न आता मोठेपणी पूर्ण सामाजिक भान ठेऊन, एकमेकांच्या विचारांना मान देत लग्नाला तयार झाले.

गावकरीपण आनंदले ते लग्न करणार म्हटल्यावर, गावाचे लग्न म्हणत सर्वांनी त्यांच लग्न लाऊन भरभरून आशीर्वाद दिला! गावाला सामाजिक जाण करून देऊन त्यांच्यात परिवर्तन घडवून देण्याचा विडा राजेश्वरी व भैरवलालने गावकर्रांसमोर घेऊन, नविन नात्याची सुरवात केली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama