STORYMIRROR

swapna joshi

Abstract

3  

swapna joshi

Abstract

प्रेम

प्रेम

4 mins
441

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं.

प्रेमाचे खूप प्रकार आहेत. सगळ्या नात्यांमध्ये प्रेम असतं. स्वरूप वेगळी असतात एवढंच.

आई च प्रेम आणि बाबा च प्रेम कमी जास्त नसतं.असतो तो फक्त फरक व्यक्त करण्यात ला.

कुणी म्हणतं प्रेम एकदाच होतं..पण खरंच असं असतं. .का नाही एखाद्याला दोनदा प्रेम होऊ शकत?

एक व्यक्ती आयुष्यातून गेल्यावर दुसऱ्या व्यक्ती वर प्रेम बसणं हा अपराध का?आई नाही का एका वेळेस दोन मुलांवर प्रेम करत .अशीच आहे ही कहाणी.. वेळे नुरुप प्रेमाची परिभाषा बदलत गेले ल्या मुलीची.


आट पाट नगर होते.तिथे एक गोड मस्त कलंदर मुलगी राहत होती परी.. लाहन मोठे सगळया शी जमायचं तीच. लाघवी होती खूप. घरी दारी लाडकी. शाळेत आणि कॉलेज मध्ये sinscere स्टूडेंट मध्ये मोडणारी तर घरी दंगेखोर हट्टी म्हणून प्रसिद्ध. म्हणता म्हणता शाळा झाली कॉलेज झालं.

कॉलेज मध्ला एक मित्र होता जॉन.खूप जवळचा मित्र तिचा. त्याचे सगळे गुपित तो तिच्या शी शेअर करायचा. त्याचे क्रश त्याचे दुखणे त्याचे प्रॉब्लेम सगळं काही तो फक्त तिच्याशी बोलायचं. तिला तो खूप आवडायचं पण घराच्या सीमा तिला माहित होत्या. त्या तिने कधीच नाही ओलांडल्या. कॉलेज संपलं सगळी पाखरं वेगवेगळ्या दिशांना उडाली. परी ला ही छान नोकरी मिळाली.नोकरी बरोबर नवीन नवीन लोक संपर्कात येत गेले.

तशातच एक दिवस तिच्या आयुष्यात कृष्णा आला..एक दिवस ऑफिस same time वर अचानक एक अनोळखी मेसेज पिंग झाला. हा य हॅलो करता करता ते दोघे खूप चांगले मित्र झाले. एक खूप चांगला मित्र म्हणून तिला मिळाला.जॉन नंतर तोच एक तिला समजून घेणारा सांभाळणारा मित्र होता..मिश्किल ,समजुदर, माचुरेड.ते दोघे वेग वेगळ्या शहरात राहत होते.आणि त्यांनी कधीच एकमेकांना बघितला नव्हता.जवळ पास ६ महिने त्यांचा हे नात फक्त फोन आणि मेसेज वार चालू होत.त्यांनी अट घातली होती की आपण फोटो कधीच टाकायचे नाही..जेव्हा भेटू तेव्हाच काय ते.

 शेवटी तोच क्षण आला त्या दोघांनी भेटायचं ठरवलं. दोघेही मुंबईला भेटायचा दिवस ठरला. दोघांकडे मोबाईल होता फक्त बघितला नव्हता एकमेकांना. दादर स्टेशन आलं ती सुंदर पांढरा रंगाचा सलवार सूट घालून आली होती. तेवढ्यात त्याचा फोन खणाणला, अरे कुठेस तू मी पोहोचले . त्याची नजर स्वैरभैर फिरू लागली तो तिला शोधत होता. प्लॅटफॉर्मच्या जवळ ये मी तिथेच उभा आहे . आकाशातून परी उतरावे तशी ती जिने उतरत होती. कसं कुणास ठाऊक पण त्याने तिला बघताक्षणी ओळखले. त्या दोघांमध्ये औपचारिकता अजिबात नव्हती. असं वाटत होतं जणू ते वर्षानुवर्षे एकमेकांना ओळखतात. मन जुळलेली होतीच. हिची उंची बेताचीच पण दिसायला गोड. तो सहा फूट उंच पण मिश्कील भाव होते . दोघांनी दिवस कसा घालवायचा याचा प्रोग्राम बनवला. फक्त एक दिवस होता त्यांच्याकडे. आधी सिनेमा मग राणीची बाग आणि मग छानच जेवण करून दोघांनी एकमेकांना गुड बाय केले. पूर्ण दिवसात त्या दोघांनी एकमेकांना प्रेमाबद्दल काहीही विचारले नाही. दोन मित्र राहतात तसेच ते दोघं होते. संध्याकाळी त्याने तिला सोडलं आणि तो त्याच्या मित्राकडे गेला. तसा दिवशी पहाटेची त्याची बस होती ती त्याला गुडबाय करायला जाणार होती.

त्या रात्री दोघांनाही झोप आली नाही तर दोघांना कळून चुकलं होतं की हाच तो हीच ती. सकाळी ही बस स्टैंड वर त्याला सोडायला गेले तिच्या डोळ्यात पाणी होते. इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्या त्याची जायची वेळ झाली. तिला अगदी गहिवरून आलं. तिने त्याच्याकडे बघितले आणि म्हणाले आय लव यू परी. ती पण डोळ्यांनी लव यू म्हणाली.

तिला तिच्या घरच्यांना सांगायची तयारी केली होती. तो एक खूप चांगला मित्र सिद्ध झाला होता तो तिला पूर्णपणे ओळखत होता. असं निदान तिला तरी वाटत होता.सकाळ संध्याकाळ रात्र एकमेकांच्या हाय-हॅलो मेसेजेस एकमेकांना दिनक्रम सांगणे अशा दिवस चालले होते. आणि अचानक एक दिवशी त्याने फोन उचल ना बंद केला. मी खूप मेसेजेस टाकले खूप कॉल केले पण त्याने रिप्लाय केला नाही. वेडीपिशी झाली त्याचे गयावया करू लागले की काय झालं काय चुकलं माझं का असं करतोयस का असं वागतोय. तो म्हणाला माझ्यात गुंतू नकोस. आपली वाट वेगळी आहे

ती पार कोलमडून पडली तिला कळलेच नाही तिचं काय चुकलं ते. बोलता बोलता तो म्हणाला. तुला प्रेम म्हणजे कळतच नाही. आज मी आवडलओय उद्या अजून कोणी.

तिची इतकी चूक होती कि तिने त्याच्या पासून कधीच काही लपवले नव्हते. तिने त्याच्या आजपर्यंतच्या सगळ्या मित्रांची सगळ्या तिच्या आयुष्यात आलेल्या लोकांची सगळ सगळ्या गोष्टी त्याला सांगितलं होतं. आनी त्याने त्याचा असा निष्कर्ष काढला होता.

तिचं आयुष्यच उद्ध्वस्त झाला.याशिवाय दुसरा कोणाबद्दल विचारच करू शकत नाही आणि हा समजून घ्यायला तयार नव्हता. ती भयंकर आजारी पडली. तर कोणाचीच काही सांगायची सोय नव्हती. अशात जॉन कधीतरी तिच्याशी फोनवर बोलायचं. त्यालाही तिची अवस्था बघून खूप वाईट वाटत होते. पण तो काहीच करू शकत नव्हता. मधल्या काळात त्याला कळून चुकलं होतं की त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे. पण त्याच्यात व्यक्त करण्याची हिंमत कधीच नव्हती. मला माहिती होतं की त्यांचा धर्म प्रेमाच्या आड येईल. तो दोन्ही घरच्या लोकांना दुखवू इच्छित नव्हता. आता तिला एवढेच म्हणाला की सावर स्वतःला. you deserve something better than this.

कुठेतरी असल्याबद्दल स्वतःला दोषी समजायचा.

हळू हळू परी या सगळ्यातून बाहेर आली तिने फक्त आपल्या आईवडिलांसाठी जगायचे ठरवले.

ते ठरवतील त्याच्याशी लग्न करायचं ठरवलंय. त्याने मनाचा प्रेमाचा कोपरा स्वतःहून कधीही न उघडण्याचे ठरवले. प्रेम हे नेहमी पूर्णत्वाकडे जात जायलाच हवे असे नाही. काही जणांच्या नशीबात ते नसतंच मुळी.


Rate this content
Log in

More marathi story from swapna joshi

Similar marathi story from Abstract