अनामिक
अनामिक
काही नाती अशीच असतात. मैत्री पेक्षा जरा जास्त पण इतर कुठल्याही श्रेणीत न मिळणारी. प्रिया आणि राम अशीच जोडी. दोघं एकाच कंपनीत पण वेगवेगळ्या शहरात राहणारे. कधी ही एकमेकांना ना भेटलेले तरीही एक मेकांना अंतर्बाह्य ओळखणारे. कुठल्याश्या कामा निमित्त फोन वर दोघे बॉले काय अनिंपुढे बोलत राहिले.
प्रिया एका सामान्य कुटुंबातील नुक्ती कॉलेज मधून बाहेर पडलेली मुलगी. लहानपणापासून आपल्या पेक्षा मोठ्याला दादा किवा ताई म्हणायचं हे घोगलेली.
अर्थात त्याच अनुषंगाने तिने राम ल पहिल्या भेटीत, अर्थात फोन वरच्या दादा अस संबोधला.
नंतर मैत्री वाढत गेली इतकी की हिच्या अवजच्या चढ उतारा वरून त्याला तिची मानसिक स्तीठी समजायची.आणि तिला त्याची.न बोलता ही एकमेकांना समजून घ्यायचे .
त्या दोघांनी एकमेकांना कधीच बघितलं नव्हत.मुळात त्यांच्या नात्याची ती अट होती.ते नातं रूपा वर नव्हतच मुळी ,तर मनाने जुळल होत.
प्रिया आणि राम ने हे कायम जपल होत की जो पर्यंत आपण प्रत्यक्ष भेटत नाही एकमेकांना बघायचा नाही..जवळपास वर्ष भराच नात त्यांचं.पण निखळ मैत्रीचं.मनाने जुळलेलं.न सांगता ही तो तिला आणि ती त्याला समजून घेत होती.
एकमेकांचे सगळे सगळे शेअर करत होते .
तो दिवस उजाडला जेव्हा त्या दोघांना एकाच शहरात कामानिमित्त जनयचा योग आला.खूप फिल्मी होत सगळ .दोघांनी स्टेशन वर भेटायचं ठरवल..फोटो नव्हते होते फक्त नंबर..प्रिया सध्या ड्रेस मध्ये ही सुंदर दिसत होती आणि राम पण त्याच्या ६ फ्ट उंचीत आणि formals मध्ये स्मार्ट दिसत होता.दोघे समोरा समोर आले तो क्षण अभतपूर्व होता.दोघांचा आनंद गगनात मावत नव्हता.जी व्यक्ती आपल्याला आपल्या पेक्षा ही जास्त ओळखते अश्या व्यक्तीशी ते दोघे भेटत होते.हे स्वप्न नव्हत.नुसती मैत्री नव्हती, आकर्षण ही नव्हता कारण त्यांनी एक मेकांना कधी पाहिला नव्हता.
तो दिवस दोघांनी सोबत घालवला आयुष्यभराच्या गप्पा आणि आठवणी जमा केल्या.दोघे ही एकमेकांना पूरक होते पण तरीही नदीची दोन काठ होते.त्यांनी साश्रू डोळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला..कुठला ही आणा भका नाही, वचन नाही की अपेक्षा नाही.त्या नंतर ते आयश्याट कधी एकमेकांना भेटणार नव्हते .
त्यांचं त्यांना काळात नव्हता की हे काय आहे..मैत्री नुसती नक्कीच नव्हती..मैत्री पेक्षा जास्त काहीतरी होत पण या नात्याला नाव नव्हत.नाव देणं ही शक्य नव्हत.आणि पुढे जाणं ही शक्य नव्हत.त्यांनी आयुष्याचा एका सुंदर वळणावर ते नात हळूच सोडून दिलं.अर्थात कायम हृदयाच्या एका कप्प्यात कायम जपून ठेवण्यासाठी.
ना जाणो आयुष्यात पुढे काय लिहून ठेवलंय पण आज तरी ते वेगळे झाले होते कधीच ना भेटण्यासाठी,एक असा नात घेऊन जे मैत्री पेक्षा काहीतरी पलीकडे होतं.
