Manisha Awekar

Tragedy

2.1  

Manisha Awekar

Tragedy

पराधीन आहे जगती........

पराधीन आहे जगती........

6 mins
1.0K


 ट्रिंग... ट्रिंग.....ट्रिंग....

अगं !! किती गं स्वप्नाली तुझी घाई.....आले.....आले.मीनल त्वरेने दार उघडायला आली. अगं आई माझी आणि स्वप्नीलची निवड आयत्या वेळच्या वक्तृत्व स्पर्धेसाठी झालीयं !!अगं प्रतिष्ठेची रानडे वक्तृत्व स्पर्धा आहे. आहेस कुठे!!!!


   मीनल स्वप्नाली आणि घरचे सगळेच सुखावले 

."आता गरमागरम चहा-पोहे घ्या. आणि छान तयारीला लागा !!"

"अगं आई ही नियोजित विषयावरची स्पर्धा नाहीये , तयारी करायला"

" मला माहिती आहे मी आणि तुझे बाबा रानडे वक्तृत्व स्पर्धेचेच विजेते आहोत म्हटलं" मीनलने शायनिंग मारत सांगितले .मधुकर गालातल्या गालात हसला. 

"अगं निवड झाल्यानंतर 'लेखकांचे सुविचार , म्हणी वाकप्रचार चांगल्या लेखांचे वेचे , चांगल्या कथांचे तात्पर्य कथा-लेखांचे सार ह्यांचा बाईसाहेबांनी भडिमार केला होता अस्मादिकांवर !! "वाचनसंस्कृती लोप पावली आहे काय ?" हा विषयही तिनेच चिठ्ठी काढून निवडला आणि all the best म्हणून मला तोफेच्या तोंडी ढकलले. नंतर माझ्या सर्व मुद्यांना खोडून काढत वाचनसंस्कृती कशी लोप पावली आहे ते सांगत त्यावरील उपाय सांगत प्रचंड टाळ्या घेतल्या. एकतर negative -positive बाजू कोणी बोलायची हेही हिनेच ठरवले आणि अभ्यासूपणे माझे मुद्दे लिहून घेऊन त्यांचा खरपूस समाचार घेतला. परीक्षकांनी विजेतेपद मिळाल्यावर मीनलचे प्रचंड कौतुक केले. "  "पुढच्यास ठेच मागचा शहाणा"असे म्हणत हसतहसत स्वप्नील हॉलमधे आला

 " ह्यावेळी चिठ्ठी मी उचलणार , negative-positiveबाजू कोण बोलणार ते मी ठरवणार आणि प्रथम स्वप्नाली बोलणार आणि मी तिचे मुद्दे खोडून काढत नंतर बोलणार"

 "अरे मी कधीही बोलले तरी माझे भाषण एक नंबरच होणार!!लेडीज फर्स्ट तर फर्स्ट होऊन जाऊ दे"

  खेळकर वातावणात चहा पोहे झाले. दोघांचेही वाचन खूप ,निरनिराळ्या स्पधांचा अनुभव, शब्दांची अर्थपूर्ण फेक नाट्यवाचन आणि नाट्यसादरीकरणामुळे आंगात मुरलेली आणि वक्तृत्वस्पर्धात भाग घेतल्याने आलेला धीटपणा आणि बक्षिसे मिळवल्याने आलेला आत्मविश्वास ह्यामुळे आयत्यावेळची वक्तृत्वस्पर्धा दोघांनी अगदी जिंगायचेच असे ठरवून स्पर्धेत भाग घ्यायचे ठरवले.


  चिठ्ठी स्वप्नालीने उचलली. 

"लग्न कोंदण की कुंपण"असा सुंदर वैचारिक विषय आला पण तिने all the best देऊन त्याला कुंपण विषयावर बोलायला सांगितले . स्वप्नीलने सुंदर भाषण करत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी , स्वर्गीय आवाजाने जगाला सुखावणा-या गानकोकिळा लतादीदीजी आणि तत्सम लग्न न करता अलौकिक कार्य करणा-या अनेक व्यक्तिमत्वांचा आढावा घेतला. भाषण सुंदरच झाले. टाळ्यांचा कडकडाट झाला. थोडीशी बावरलेली स्वप्नाली टाळ्या चालू असतानाच स्टेजवर आली. स्त्रीस्वभाव जात्याच नात्यांचे रेशमी गोफ गुंफणारा. तिने नाट्यपूर्ण रितीने विवाहसंस्थेचे महत्त्व पटवून दिले "माझे विद्यमान सहकारी स्वप्नील........असे म्हणतात असे म्हणताच टाळ्या व शिट्यांचा कडकडाट होऊन प्रेक्षकांनी

प्रचंड दाद दिली, तिला बोलायचा विषय मुलींसाठी अनुकूल असल्याने अनेक नीतीपाठांची उदाहरणे देऊन स्वप्नालीने अनेक अनेक लेखकांची लग्नविषयकवचने सांगितली. आई-वडील दोघेही उच्चविद्याविभूषित आणि तिला नेहमीच Supportiveअसल्याने तिचे भाषण अतिशय छान झाले. त्यांच्या जोडीला प्रशस्तीपत्रक आणि सरस्वतीची मूर्ती बक्षिस मिळाली.परिक्षकांनी दोघांचे जरी भरभरुन कौतुक केले तरी त्यांचा कल स्वप्नालीकडेच होता. तिचे भाषण विषय चांगला खुलवल्याने , शाब्दिक अभिनयाने सर्वांनाच आवडले.

स्वप्नालीचे वडील उत्कृष्ट बँडमिंटनपटू. त्यांनी मुलीला लहानपणापासूनच बँडमिंटन शिकवून तयार केले. स्वप्नालीला दोघे एकाच वर्गात असल्याने ,वक्तृत्व मंडळातही दोघांचा हिरीरीने सहभाग असे. परिसंवादातही दोघे एकमेकांना तोडीस तोड खोडून काढत असल्याने त्यांची "समानशीलेषु व्सनेषु मित्रम"अशी घट्ट मैत्री जमली. यशाच्या पाय-या चढल्याने ह्या गाढ मैत्रीचे सहवासाने प्रेमात रुपांतर व्हायला लागले. हा बदल यौवनसुलभ आणि दोघांनाही रोमांचित करणारा. 

   आता स्वप्नालीला प्रत्येक extra activityमधे स्वप्नीलची साथ सुखावह वाटू लागली. आजकाल ती बँडमिंटन हॉलमध्ये रमेनाशी झाली. जिंकलेच पाहिजे ह्या इराद्याने सराव गेम्स खेळणारी स्वप्नाली कसेतरी खेळून बँडमिंटन हॉलच्या बाहेर जाऊ लागली पूर्वी तिचे बाबा खेळातले फटके, प्लेसिंग, सर्व्हिस ह्यातल्या चुका सांगितल्यावर ते गंभीरपणे घेऊन लगेच सुधारणा दाखवत असे,पण आताशा ती सटकता कसे येईल हेच बघत असे. एक दिवस बाबांनी ती जायला लागली तरी काहीही reaction न देता मागोवा घ्यायचे ठरवतात. स्वप्नील लांब झाडाखाली तिची वाट बघत असायचा तासनतास ते दोघे गप्पा मार बसायचे. 

"म्हणजे असे आहे तर......"

ते मनाशी म्हणतात. ते स्वप्नीललाही बँडमिंटन शिकायला बोलावतात. स्वप्नीलला वडिलांच्या माघारी ओढाताण करुन इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करणा-या आईचा चेहरा दिसत असतो ,त्यामुळे तो सौम्यपणे नकार देतो पण दुसरे दिवशी दोन योनेक्सच्या रँकेटस नाचवत आलेल्या स्वप्नालीला नाराज करायचे नाही म्हणून तिच्या वडिलांकडून स्पेशल कोर्ट बुकिंग करुन बँडमिंटन शिकतो. अंगापिंडाने मजबूत ,डबलहाडाचा स्वप्नील ह्यातही कौशल्य प्राप्त करत रनर/विनरपर्यंत पोचतो. व्यायामामुळे अंगकांतीला एक वेगळीच झळाळी प्राप्त होते.तिच्या आईवडिलांचाही तो भावी ला.जा. असतो. बँडमिंटन शिकवताना ते कधी त्यांना बरोबर खेळायला लावीत आणि Coordination,Calls देणे,वेळप्रसंगी leave it असे जरी पार्टनरने म्हटले व त्याला घेता आले नाही तर मधेच घुसणे ह्या गोष्टी अत्यंत कळकळीने शिकवल्या. तसेच त्यांनी दोघांना प्रतिस्पर्धी म्हणून सिंगल गेम्सही खेळायला लावल्या

"तुम्हांला एकमेकांचे Strong/weak pointsही ओळखता आले पाहिजेत"असेही कसोशीने बजावले.

   बँडमिंटनगेम्समधे फायनल गेमचा दिवस खेळाडूंना टेन्शन देणारा असतो. मिक्स्डडबल्सची गेमतर चुरशीची. आख्खे कॉलेजच काय स्वप्नालीचे आईवडील , त्यांचे मित्रही आलेले. स्वप्नीलच्या आईलाही यायचे होते पण तिच्यायोग्य कंपनी मिळत नव्हती पण स्वप्नील शेवटी तिला कोप-यातली जागा मिळवून देतो व" कोणाशी आई बोलू नको"असे बजावून सांगतो. 

  स्वप्नील-स्वप्नाली सर्व प्रेक्षकांची लाडकी जोडगोळी येताच सर्वांनी कडकडाट केला. पहिले पाच पॉइंट समोरच्याला चाचपण्याचे असतात. त्यात स्वप्नीलचे फटके जोरकस असले तरी तंत्रशुद्ध नव्हते. स्वप्नाली लहानपणापासून शिकत असल्याने मुरलेली आहे हे समोरच्यांच्या 2/3 पॉइंटसमधेच लक्षात आले. त्यांनी स्वप्नीलवर अँटँक केला. त्याच्या अंगावर फटके मारले जे खरे खिलाडूवृत्तीला आणि खेळाच्या नियमांचे उल्लंघन करणारे असते. पण असाही नियम आहे की शटल जरी अंगावर आले तरी बाजूला सरकून खेळाडूने परतवायचे असते. स्वप्नालीच्या हातात शटल फक्त सर्व्हिसपुरतेच येत होते त्यामुळे स्वप्नीलकडून शटल पडले तर "टिप फुले टिप"

हा स्वप्नीलssआपल्याला पटलेला न्हाय....न्हाय....न्हाय 

"ए भाय जरा देखके चलो...."अशा भारी कॉमेंटस येऊ लागल्या. जसे 10 पॉइंटस झाले तशी स्वप्नालीही रडकुंडीला आली व अधेमधे धडपडत येऊन शटल घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करु लागली. 

तेवढ्यात "ही स्वप्नाली आपल्याला पटलेली न्हाय ....न्हाय....न्हाय अशी जबरदस्त कॉमेंट आल्यावर रागाने रँकेट फेकून जळजळीतपणे तिरका कटाक्ष टाकून कोर्टाच्या बाहेर जाऊ लागली. स्वप्नील गयावया करुन म्हणाला"अगं मी शिकस्त करतोय मैदान का सोडतेस? तिचे वडील तिला समजावून सांगूनही ती पंचांना I am injured, so unable to playअसे सांगून रडत रडत निघून जाते.

   ह्याचा खूप खोलवर, गंभीर परिणाम स्वप्नीलवर होतो. आपल्या आईला इथे आपण घेऊन आलोत हेही विसरतो. ताडताड रागाने निघून जातो. त्याची आई तिथे केविलवाणी बसलेली बघून स्वप्नालीचे आई-बाबा तिला घरी सोडतात. पण दरम्यान आईशी बोलताना आईचे असंबद्ध बोलणे ,गरीबवस्तीतले त्याचे साधेसुधे घर त्यांना नाही म्हटले तरी खटकतेच!! ते आतही जात नाहीत,स्वप्नीलचीही वाट पहात नाहीत. आईला घरी सोडून तसेच उलटपावली कारकडे येतात. 

  कारमधे सुन्नपणे बसून राहिलेली स्वप्नाली लांबवरच्या स्वप्नीलच्या नजरेतून सुटत नाही आणि इथेच ठिणगी पडून स्वप्नीलचा तिळपापड होतो. स्वप्नालीचे न कळलेले पैलू उलगडायला सुरवात होते. गेमला सुरवात होऊन पाच काय पहिल्याच पॉइंटला गेम फसणारची चिन्हे दिसू लागतात.

   I I T मधे प्रवेश मिळवून M, Tech आणि PHD करणे हे सर्वच हुशार मुलांचे ध्येय असते. स्वप्नाली व स्वप्नील

स्वप्नालीचे केवळ IITION होणेच नव्हे तर डॉक्टरेट Post Doctमिळवणे अशी स्वप्ने असतात. तिचे वडील दोघांना बसवून गेमबद्दल विसरुन जाऊन अभ्यासाबद्दल गंभीरपणे विचार करायला सांगतात. स्वप्नील जातिवंत हुशार. तो तिला कशा पद्धतीने अभ्यास करायचा, काय सोडायचे,काय करायचे सर्व व्यवस्थित समजावून सांगतो. दोघेही मन लावून अभ्यास करतात.

निकालाचा दिवस विविध छटांनी येतो. स्वप्नीलची rank 150 येते तर स्वप्नालीची 450. दोघेही खुषीतच तिच्या आईवडिलांचा आशिर्वाद घेतात .स्वप्नीलकडे निघतात


   "अगं मीनल स्वप्नील हुषार आहे ,स्मार्ट आहे. गरीबी हा काही माणसाचा दोष नाही मी त्याला शिक्षणासाठी मदत करीन मला हाच स्वप्नालीसाठी योग्य वाटतो. 

"बघू, गहू तेव्हा पोळ्या!!आता थोडेच तिचे लग्न करायचे आहे"गाल फुगवून मीनल म्हणाली. 

  स्वप्नीलसाठी घरी गेल्यावर वेगळेच ताट वाढून ठेवलेले असते. आयुष्यभर सोशिकपणे सर्व काही सहन करत आलेली ती माऊली स्वतःचे मानसिक संतुलन गमावून बसते. त्या जोरजोरात असंबद्ध बोलायला लागल्यावर स्वप्नाली काढता पाय घेते. सुन्न मनाने स्वप्नील भिंतीवर डोके ठेवून घळाघळा रडायला लागतो. नंतर तर हमसून हमसून रडतो. विधीलिखीत किती विचित्र रितीने सामोरे ठाकलेले. आईला शांत करायला शेजारपाजारच्या बायकाही येतात. मग थोड्यावेळाने त्या शांत होतात. "अरे तुझ्या खेळाचे काय झाले रे?असा निरागस प्रश्न विचारतात


   स्वप्नीलला गेट परीक्षेत इतके घवघवीत यश मिळूनही नशिबाची साथ नसल्याने

I I T चा विचार सोडून द्यावा लागतो. "अरे असे काय मैदान सोडतोस स्वप्नील?तुझ्या आईला परीक्षेपर्यंत मावशी सांभाळतील नंतर त्यांना वृद्धाश्रमात ठेवू"

स्वप्नालीचे शब्द स्वप्नीलचे काळीज कापीत गेले. 

परीक्षेचे महत्त्व ओळखून हा कडू घोट त्याने गिळला. मावशी काही दिवस मावसबहीण राहिल्याने त्याची परीक्षा व्यवस्थित पार पडली. स्वप्नालीचीही नंतरची मनोराज्ये सुरु झाली. "स्वप्नाली आता खरंच गंभीरपणे बोलायची वेळ आलीय .तुझे वडील जे बँडमिंटनमधे म्हणायचे ना की प्रतिस्पर्ध्याचे Strong/weakपॉइंटस ओळखता आले पाहिजेत.तू तुझ्या जागी बरोबर असशीलही. पण माझ्या आईने मला लोकांची कामे करुन वाढवले आहे. बरे झाले तिचा अल्झायमर आधीच कळला. मी माझ्या आईला वृद्धाश्रमात नाही ठेवणार. आणि माझ्या M Techपर्यंत ठेवले तरी शेवटच्या स्टेजला नाही ठेवून घेणार. तेव्हा....तेव्हा काय करणार??

  तुझे आकाश ,आवाका मोठा आहे. सुदैवाने परिस्थितीही चागली लाभलीय तुला. तू खूप मोठी हो. माझ्या शुभेच्छा सदैव तुझ्या पाठीशी असतील आठवण ठेव ह्या गरीब मित्राची जमलं तर......

एक जोरदार हुंदका त्या विदीर्ण हृदयातून बाहेर पडला

  खरंच गदिमांनी गीतरामायणातून का जीवनविषयक सत्य किती आर्तेतेने सांगितले आहे

" दोन ओंडक्यांची होते

सागरात भेट

एक लाट फोडी त्यांना

नाही पुन्हा भेट

वियोगात मीलन होते नियम ह्या जगाचा"

खरोखरच पराधीन आहे जगती पुत्र पुत्र मानवाचा......


Rate this content
Log in