प्र-प्रेरणेचा माझ्या शिवाजी रा
प्र-प्रेरणेचा माझ्या शिवाजी रा


एकदा सह्याद्री तपश्चर्येला बसला त्याने शिवाची घनघोर आराधना केली. शिवशंकर प्रसन्न झाले व त्यांनी सह्याद्रीला वर मागण्यास सांगितले, त्यावर सह्याद्रीने खालील शब्दात वर मागितला
" हे शंकरा, हे रुद्रा, हे शंभू महादेवा
माझ्या सह्याद्रीच्या कुशीत तू जन्म घे, माझ्या दऱ्याखोऱ्यातून तू तांडव कर, माझ्या रोमारोमात, रंध्रारंध्रात, तुझे वास्तव्य स्फुर्ती रूपाने राहू दे व तुझ्या प्रेरणेची गंगा पिढ्यानपिढ्या अखंड वाहू दे. "
शंकराने तथास्तु म्हटले आणि एका शुभ दिनी फाल्गुन शुद्ध तृतीयेला सन 1630 साली, शिवनेरी गडावरती शिवाई देवीच्या आशीर्वादाने माय जिजाऊ ला पुत्र झाला
पुत्र सह्याद्रीला झाला.
पुत्र महाराष्ट्राला झाला.
जन्माला आल्यापासून आजतागायत मला एकच माहित आहे की कोणीही छत्रपती शिवाजी महाराज कीssss म्हटल्यावर जय म्हणायचे असते ज्याच्या तोंडून जय हा शब्द येत नाही तो मराठी नाही.
त्यांच्या पराक्रमाच्या गाथा उभ्या महाराष्ट्राला, उभ्या देशाला, इतकेच काय पण उभ्या जगाला माहित आहे. अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची कापलेली बोटे, आग्र्याहून सुटका पन्हाळगडचा वेढा सुरतेची लूट इत्यादी एकाहून एक विलक्षण अद्भुत गोष्टी ज्याच्या प्रत्येक प्रसंगात नाट्य भरलेले आहे ,थरार भरलेला आहे, त्यातला प्रत्येक क्षण आणि क्षण श्वास रोखायला लावणारा आहे ते प्रसंग साऱ्यांना माहितीच आहेत. त्यावर किती कादंबऱ्या, नाटके, चित्रपट अशा अनेक कलाकृती आल्या. तरीही आज 390 वर्षानंतर देखील शिवाजी हा विषय मनाला भुरळ घालतो
आता या माहिती असणाऱ्या गोष्टींबद्दल मी पुन्हा बोलणार नाही परंतु शिवाजी महाराज हे वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या आणि आज देखील कसा प्र- प्रेरणेचा बनलेले आहेत यावर मी भाष्य करणार आहे.
शिवाजी महाराज गेले आणि औरंगजेब पूर्ण ताकतीने दख्खनमध्ये उतरला त्याला मराठ्यांचे साम्राज्य बुडवायचेच होते. पण त्याला शिवाचा छावा भारी पडला पुढील नऊ वर्षे संभाजी राजे लढले जी झुंज औरंगजेबाला अगदी सहज साध्य वाटत होती ती झुंज त्याला या मातीतच गाडून गेली.
संभाजी राजा नंतर राजाराम ,ताराराणी, धनाजी ,संताजी अगदी महाराष्ट्राचा मावळा आणि मावळा स्वराज्यासाठी लढला कारण या सर्वांचा बाप तसेच स्फुल्लींग चेतवून/पेटवून गेला होता
पुढे राज्याला/गादीला वारस आला. शाहूमहाराज परतून आले आणि त्यांच्या वतीने पंतप्रधान या नात्याने पेशव्यांच्या पिढ्यानपिढ्या लढल्या कारण प्रत्येकाने थोरल्या महाराजांचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्या स्वप्नांचा पाठपुरावा करीत करीत थोरले बाजीराव पेशवे दिल्लीपर्यंत धडकले तर राघोबादादांनी अटकेपार झेंडे फडकावले नंतर तर दिल्लीचा व मुगलांचा कारभार मराठेच चालवत होते.
पानिपतावर च्या दोन लढाया आपण हरलो ही गोष्ट वेगळी पण त्या लढाया लढण्यासाठी जी प्रेरणा होती ती महाराजांपासून झालेली होती वास्तविक अहमद शह अब्दली काही दख्खनवर स्वारी करण्यासाठी येत नव्हता त्यामुळे मराठ्यांना तिथे लढाई करण्याची गरजच नव्हती पण यवनांचे आपला हिंदू बांधवांवर होणारे आक्रमण थोपविले पाहिजे आपला हिंदू बांधवांना मदत केली पाहिजे या भावनेतूनच मराठे पानिपतवर चालून गेले कारण त्यापूर्वी अनेक यवनांनी बाहेरून आपल्या देशावर आक्रमणे करून तेथील हिंदू बांधवांची ससेहोलपट केली होती
पुढे इंग्रजांचे आक्रमण झाल्यावर महाराष्ट्र काही सहजासहजी इतर संस्थानां प्रमाणे त्यांचे हाती पडला नाही त्यासाठी पेशवे लढले त्यांचे सारे सरदार लढले त्रिंबकजी डेंगळे यांच्यासारखा पेशव्यांचा प्रधान ज्याला पुढे इंग्रजांनी पकडून फाशीची सजा दिली तोदेखील प्राणपणाने लढला किती म्हणून नावे घ्यावीत त्यामागची प्रेरणा म्हणजे या मातीचा गुण शिवाजी महाराज
अठराशे सत्तावन च्या स्वातंत्र्यलढ्यात तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई लढले त्यामागे कोणाची प्रेरणा होती?
जो मर कर भी नही हटा व मराठ्ठा
पुढे स्वातंत्र्य समोर चालूच राहिले त्यात अनेक आहुती पडत गेल्या मध्येमध्ये त्या अग्नीवर राख जमा होत होती पण शिवाजीराजांचे नाव घेऊन कोणीतरी फुंकर मारली की समर्थ रामदासांच्या उक्तीप्रमाणे
"वन्ही तो चेतवावा रे"त्याप्रमाणे ते स्वातंत्र्यसमर ते अग्निकुंड पुन्हा धडधडून पेटून उठायचे
पुढे शिवाजीराजांची प्रेरणा घेऊनच सावरकरांनी त्यांचा वसा खांद्यावर घेतला वयाच्या सोळाव्या वर्षी
"ही घेतले न मी हे व्रत अंधतेने
किंवा बुद्ध्याची घेतले करी वाण हे सतीचे" असे म्हणत स्वतःला या स्वातंत्र्यसमरात झोकून दिले. कोणाच्या प्रेरणेने त्यांनी अंदमानातील हाल-अपेष्टा सहन केल्या असतील? जो माणूस वयाच्या सोळाव्या वर्षी शिवाजीराजांवरती इतकी मंत्रमुग्ध करणारी व जहाल आरती ज्यातून तुमच्या काळजात एक लाव्हा उसळतो.
जय देव जय देव जय जय शिवराया या या आनंद शरणा आर्या ताराया
किंवा
हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
यासारख्या गीतांची निर्मिती शिवाजी महाराजां पासून प्रेरणा घेतल्याशिवाय होत नाही, या दोन्ही गीतातून पूर्णपणे हेच जाणवते की तो प्र- प्रेरणेचा हा शिवाजी राजांकडून सावरकरांकडे व सावकारांकडून भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चाफेकर बंधू, अनंत कान्हेरे, मदनलाल धिंग्रा या लोकांकडे संक्रमित झाला.
सुभाष चंद्र बोस सावरकरांना भेटून अखंड प्रेरणेची ज्योत त्यांच्याकडून घेऊन गेले त्यांनी तर कमालच केली
परदेशात जाऊन तेथून मदत घेऊन शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नीतीने ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी आदिलशाहीला शह देण्यासाठी मुघलांना मैत्रीचे व मदतीचे खलिते पाठवले तीच नीती अवलंबून वेळप्रसंगी हिटलर सारख्या माणसाची मदत घेऊन पण इंग्रजांच्या सत्तेला बाहेरून हल्ला करून काढण्याचा प्रयत्न केला त्यामागील प्र -प्रेरणेचा शिवाजी महाराजां कडूनच संक्रमित झाला होता
या प्रयत्नातूनच पुढे इंग्रजांची सत्ता उलथली
हे काही वेगळे सांगायला नको
आझाद हिंद सेनेचा पराभव झाला खरा पण त्यातूनच प्रेरणा घेऊन ज्यांच्या जीवावर इंग्रज राज्य करीत होते ते नौ दल व पायदळ इंग्रजांच्या विरुद्ध उभे राहिले तेव्हा नाइलाजाने इंग्रजांना आपला देश सोडावा लागला यावरचा ज्या इंग्रजी सत्तेच्या साम्राज्य वरचा सूर्य मावळत नव्हता तिथे साडेतीनशे वर्षानंतर देखील निव्वळ शिवाजीराजांच्या प्र- प्रेरणेचा यातूनच सुभाषबाबूंनी इंग्रजी साम्राज्य उलथविले
दोन्ही महायुद्धात व आज देखील आपल्या देशातील सैनिक आजही हर हर महादेव किंवा छत्रपती शिवाजी महाराज की जय हीच घोषणा देतो
ऐकलेला एक प्रसंग दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांकडून लढणारे आपले मराठा सैनिक आणि जपानी सैनिक यांची आमने-सामने गाठ पडली त्यावेळी मराठा आणि इंग्रज असे एकत्र लढत होते यांच्याकडे अत्यंत तुटपुंजी साधनसामुग्री होती वास्तविक ती लढाई ते हरणार होते व सगळे जपानी सैनिकांकडून मारले जाणार होते अशावेळी जाधव नावाचा कोणीतरी एक मराठा सैनिक हर हर महादेव ची घोषणा देत जपानी सैनिकांवर त्वेषाने तुटून पडला त्याचेच अनुकरण इतरांनी केले आणि आश्चर्य म्हणजे 40 माणसांच्या तुकडीने दीडशे शत्रूच्या सैनिकांना कंठस्नान घातले व ती लढाई जिंकली असा असतो
प्र -प्रेरणेचा माझ्या शिवाजी राजांचा.