STORYMIRROR

Aruna Garje

Tragedy

4.2  

Aruna Garje

Tragedy

फक्त चहासाठी...

फक्त चहासाठी...

1 min
304

सकाळीच तिने स्वयंपाक करुन त्याचा डब्बा ओट्यावर भरुन ठेवला.

ऑफिसला निघतांना अजूनही अंथरुणावर लोळत पडलेल्या नवऱ्याला म्हणाली - "मी निघते रे. तेवढा तू तुझा चहा करुन घे." त्याने ऐकून न ऐकल्यासारखे केले.

     तेवढ्यात सासुबाई कडाडल्या - "नवऱ्याला चहा करायला सांगतेस. आमच्यावेळी नव्हती बाई असली थेरं." ती तिरीमिरीतच बाहेर पडली ते नेहमीसाठीच. कारण भरधाव येणारा ट्रक तिला दिसलाच नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy