फिर भी तुमको चाहूँगा (भाग 1)
फिर भी तुमको चाहूँगा (भाग 1)
मे आय कम इन सर. डॉ. आशूतोष ने विचारले तसे डॉ. राजमाने नी आशुतोष ला येस म्हणत केबिन मध्ये यायला सांगितले. हॅव अ सीट आशुतोष ते म्हणाले. आशुतोष डॉ राजमाने त्याचे मेन हॉस्पिटल चे डीन त्यांना म्हणाला,सर मला चार दिवसाची सुट्टी हवी आहे एक अर्जेन्ट कामासाठी मला पुण्याला जायचे आहे. डॉ राजमाने म्हणाले आशुतोष अरे पुण्याला सध्या कोरोनाची साथ सुरू आहे तिथे जाण रिस्की आहे. पण सर माझे खरच महत्त्वाचे काम आहे आणि करोना अजून म्हणावा तसा वाढला नाही मी लगेचच परत येईन. आशुतोष म्हणाला. ओके आशुतोष तुझं काम खरच इतकं महत्वाचे असेल तर जा पण स्वहताची काळजी घे. हो सर नक्की. असे बोलून आशुतोष हॉस्पिटल मधून बाहेर पडला जाता जाता त्याची असिस्टंट डॉ.मीरा ला काही सूचना दिल्या आणि काही इमर्जन्सी असेल तर कॉल कर म्हणाला. मीरा आशुतोष ची असिस्टंट होती त्याचे सगळं काम ती अगदी व्यवस्थित पार पाडायची .आशुतोष तिला खूप आवडायचा तिचे प्रेम होते त्याच्या वर आशुतोष दिसायला सावळा पण नाकेडोळी छान मस्त पर्सनॅलिटी होती त्याची डॉ पेशाला शोभणारी म्हणूनच मीरा वेडी होती त्याच्या साठी पण आशुतोष त्याचाच जगात मग्न काम आणि काम इतकंच त्याला माहीत असे. मीरा ही दिसायला सुंदर होती पण आशुतोष चे लक्ष कधी तिच्या कडे नसायचे. कायम डॉक्टर च्या भूमिकेत जगणारा जणू इतर जगाशी त्याच काही देणं घेणं नाहीच तो असा का होता याच उत्तर मीरा ला अजून सापडले न्हवते. मीरा ही आशुतोष ला म्हणाली,सर पुण्याला कोरोनाचा संसर्ग तिला मध्येच तोडत आशुतोष बोलला आय नो मीरा पण माझे पर्सनल काम आहे सो आय हँड टू गो. ओके सर इतकच मीरा बोलली.
कार सुरू करतच आशुतोष ने तुषार ला फोन लावला हॅलो तुषार मी थोड्या वेळात पुण्याला यायला निघतो आहे तुषार -- आशु का येतोस तू इथे कोरोनाचा धोका आहे माहित आहे ना तुला. आशु -- तुषार म्हणूनच येतोय मी मला एकदा भेटायचे आहे रे अपूर्वा ला तिची काळजी वाटते. तू फक्त ती कुठे आहे जॉब ला तेवढे तिच्या मैत्रिणीला विचारून घे प्लिज. तुषार-- आशु प्लिज काय म्हणतोस तुझ्या साठी इतकं तर करू शकतो मी खास मित्र आहेस ना
माझा . ओके बाय आल्यावर बोलू असे म्हणत आशु ने कॉल बंद केला. तुषार विचार करू लागला कसा आहे हा आशु अपूर्वा ने त्याला सोडून 2 वर्ष झाली पण हा आहे की तिच्या आठवणीतुन अजून बाहेर पडलाच नाही तिच्या काळजी पोटी पुण्याला येतो आहे खरच यालाच प्रेम म्हणतात का? आशु स्वहताचे आवरून पुण्याला जायला निघाला. अपूर्वा कशी असेल ती भेटेल का मला असे विचार त्याच्या मनात आले नाही भेटली तरी अँटलिस्ट नुसते पाहता तरी येईल तिला अप्पू आय लव यु सो मच . कार ड्राईव करत तो मनाने भूतकाळात रमून गेला. 12 वी सायन्स झाल्या नन्तर आशुतोष ने एम बी बी एस ला पुण्यात ऍडमिशन घेतली होती तेव्हाच तुषार त्याचा चांगला मित्र बनला होता दोघ एकत्र असायचे . सेकंड इयर ला अपूर्वा त्यांच्या कॉलेज मध्ये न्यू ऍडमिशन म्हणून आली दिसायला सुंदर हुशार घारे टपोरे डोळे हसरा चेहरा अशी. पाहताक्षणी आशुतोष ला आवडली हळू हळू मैत्री होत दोघ एकमेकात कधी गुंतले हे त्यांनाही समजले नाही . अख्या कॉलेज मध्ये यांचे अफेयर प्रसिद्ध झाले होते आशु पण दिसायला हॅण्डसम सो दोघ मेड फॉर इच आदर असेच! दोघांनीही सर्जन बनायचे ठरवले होते ते हुशार सुद्धा होते. पुढे टोल नाका आला तसा आशु आपल्या विचारातून बाहेर आला. संध्याकाळी तो पुण्याला पोहचला. तुषार कडेच उतरला. तुषार ने आशु ला सांगितले की अपूर्वा रुबी हॉस्पिटलमध्ये जॉईन झाली आहे उद्या आपण तिला भेटू.
सकाळी ते दोघे रुबी हॉस्पिटलला निघाले आशुतोषला कधी एकदा अपूर्वा ला पाहतो असे झाले होते. तुषार ने विचारले आशु आता का भेटायचे आहे तुला अपूर्वाला आणि असा अजून एकटाच किती दिवस राहणार आहेस ती तिच्या आयुष्यात पुढे निघून गेली. तुषार नाही माहीत मला पण खूप आठवण येत होती अपूर्वाची अगदी मनातून आतून काहीतरी वाटत होते तिला भेटायची ओढ लागली आहे का ते नाही माहीत आशु म्हणाला.तुषार म्हणाला,कारण तू अजून ही तिला विसरला नाहीस तिचाच विचार सतत करतोस आशु जा विसरून सगळं नव्याने आयुष्याला सुरवात कर. तुषार आय कान्ट मी जिवापाड प्रेम केले रे कसा विसरू तिला आजही पहिल्या इतकंच तिच्यावर प्रेम करतो मी... आशु बोलला.