STORYMIRROR

Megha Arbuj

Abstract Romance

3  

Megha Arbuj

Abstract Romance

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

1 min
236

पहिलं प्रेम ही एक शाळेत जाणारी दहावीच्या विद्यार्थ्यांनीची कथा आहे.

असं ही ते वय हे अल्लड तारुण्याची सुंदर सुरवात भिन्न लिंगी व्यक्ती बद्दलच आकर्षण अस हे वय ती मुलींच्या शाळेत जात असते. ती ज्या ठिकाणी राहते.

तेथेच घराच्या कोपरावर एक बाई घरगुती खानावळ चालवत असते.

तीची शाळेची वेळ व त्याच वेळेत एक हडसम तरूण तेथे रोज जेवणासाठी त्या खानावळीत येत असतो.

त्याचा येण्याचा रस्ता हा तिच्या घरा वरुन असतो अशीच एकदा त्याची नजरानजर होते व रोजच हे सकाळी शाळेत जाताना व रात्री त्याच्या जेवण्याच्या वेळेत चालू होते.

एक शब्द ही न बोलता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात.

त्याला ही तिला पाहिल्या शिवाय चैन पडत नसते व तिला ही त्याला पाहिल्या शिवाय चैन पडत नसते.

असे हे तिच्या आयुष्यातील पहिले प्रेम कधी ही न विसरणार त्यात तिच्या घरचे तिचं लग्न ठरवतात.

तिची प्रेमा बद्दल घरी सांगायची हिम्मत नसते.

त्यामुळे ती घरच्यांनी ठरवलेल्या मुलांशी लग्न करून मोकळी होते.

तिच पहिलं प्रेम मनाच्या एका कोपऱ्यात ठेवून तो कोपरा बंदिस्त करते व त्याच्या सोबत सुखाने संसार करते पहिलं प्रेम माणुस विसरू शकत नाही हे खरं आहे .


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract