प्रिय गुलमोहर (लघुकथा)
प्रिय गुलमोहर (लघुकथा)
अरे वेडू आपण कॉलेज मध्ये असताना दोघांनी मिळून लावलेलं ते गुलमोहरच झाडं किती छान डेरेदार झाले आहे. ते झाड उन्हाळ्यात गुलमोहराच्या फुलांनी छान फुलून येतं. एखाद्या नवचैतन्य प्रेमीयुगुलांन सारखं प्रसन्न हसत असतं. प्रेमीयुगुलांना कधी सावली तर कधी फुला पाकळ्यांचा वर्षाव करत. प्रत्येक प्रेमीयुगुलांना ते झाड आपली साक्ष देतं आणि सांगतं प्रेम करावं तर असं या प्रेमीयुगुलांन सारखं ना अपेक्षा,ना स्वार्थ, फक्त आणि फक्त निस्वार्थी निर्मळ प्रेम केलं होतं. ना प्रेमाचा गर्व होता ना एकमेकांना सोडून गेल्याचं मनामध्ये सूड होता. सूर्यास्ताच्या कातरवेळी शेवटची मिठी माझ्याच तर सावलीत त्यांनी घेतली होती.घतल्या आणाभाका भेटलोच कधीतरीआयुष्याचा उर्वरित चित्रपटात आलोच परत कधी कुठे चुकून समोरासमोरतर फक्त हसून छोटीशी स्माईल देऊन पुढे निघून जायचं.एकमेकाच्या आयुष्यात डोकावयचे नाही. असे वचन देऊन दोघंही दुःखी मनाने हसऱ्या चेहऱ्याने आपल्या मार्गाला निघून गेले.येतात रे कधीतरी अडचणीत कातरवेळी.
माझा आधार घेऊन मनमोकळ करून थोडी हितगुज करून जगण्यास नविन बळ घेऊन जातात.अशी माझी सावली आयुष्यभर त्यांच्या साठी असेल. आणि ते दोघे असतील तोवर मला उन,वारा, वादळ, पाऊस झेलत त्यांच्या साठी त्यांना नवचैतन्य देण्यासाठी उभं राहायचं आहे..