Rajesh Sabale

Tragedy

1.7  

Rajesh Sabale

Tragedy

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

14 mins
8K


जगात सर्व प्राणी, पक्षी, माणसं एकमेकांवर प्रेम करतात हे जरी खरं असलं तरी, प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत किंवा कला वेगवेगळी असते नाही आहे.

प्रेम या शब्दात जरी अडीच अक्षर असली तरी, या अडीच अक्षरात सारं जग सामावून घेण्याची ताकद असते. जे प्रेमात पडले नाहीत त्यांना ते कळणार नाही. पण प्रेम न करणारा माणूस किंवा प्राणी या भूतलावर शोधून सापडणार नाही. प्रत्येक जन्माला आलेला जीव हा थोड्या फार प्रमाणात कोणा ना... कोणावर प्रेम करीत असतोच. हे नाकारता येणार नाही. प्रेमामुळे तर, जगण्याची उर्मी वाढते. प्रेम कधी तारते तर कधी मारते ही.. ज्यांचे जीवन अडकलेले आहे. असे अनेक आणा-भाका घेऊन प्रेम करतात. खऱ्या खोट्या शपथा घेतात. अगदी आकाशातून चंद्र-तारे तोडून आणण्याचे सांगून, मनाला भुरळ घालतात. हे फक्त प्रेम मिळे पर्यंतच असतं हो. एकदा का तुम्ही प्रेमाच्या गळाला लागला की, सर्व कसं जागच्या जागी स्थिरावत आणि उरतात फक्त कटकटी आणि मग प्रेमाचं गणित आणि त्याची उत्तर तर्कांवर उगाळून त्याचा पार चोथा होतो पण उत्तर मिळत नाही. कधी कधी तर, आपण प्रेम का केलं याचं उत्तर शोधता शोधता माणसं म्हातारी होतात. कधी कोर्ट-कचेऱ्या तर, कधी नातेवाईक मंडळींच्या तडजोडीत कोणी एक सुखावतो तर कोणी दिखावतो पण, सुखी जीवनाचा मार्ग मिळत नाही.आणि हे सर्व झालं की, प्रेम कसं करावं आणि कसं करू नये याचे दाखले माणसं देऊ लागतात. मग काय ज्याला काडीची अक्कल नसते तोही सल्ले देऊ लागतो कोणाचा आधार घ्यावा आणि कोणाचा घेऊ नये याची भान कोणालाच राहत नाही आणि प्रेम ही काही ठरवून करण्याची गोष्ट नाही. तसं ही परवूननप्रेम करता येत नाही.

आता हेच बघा ना सूरज ज्या शाळेत काम करीत होता त्याच शाळेत राधा ही नोकरी करीत होती. हे सूरजच्या घरी कोणालाच माहीत नव्हतं. आता शाळा म्हटलं की, शिक्षक महिला आणि पुरुष असणारच त्यात नवीन ते काय? बरोबर ना. सर्व कसं दोन तीन वर्षे खूप छान मजेत चाललं होतं....

मधल्या काळात सुरजच लग्न झालं. त्याला आता सहा महिने झाले होते. सहा महिन्यांपूर्वी मे महिन्याच्या सुटीत तो गावी आला आणि घरच्या लोकांच्या आग्रहाखातर तो लग्नाच्या बेडीत अडकला होता. आता लग्नाचं वय झालं म्हटल्यावर लग्न होणारचं होतं. पण सुरजच घर म्हणजे सर्व कुटुंब जुन्या वळणाचे घरात सूरज शिवाय कोणीच शिक्षण घेतलं नाही. त्यामुळे सूरज शिकून मोठा झाला याच कौतुक कुटुंबात सर्वानाच होतं. तोही सर्वांना प्रेमानं अहो काहो करीत असे अगदी भावाच्या बायकोला हाक मारताना सुरज म्हणायचा अहो.. वहिनी ऐकलत का!! जरा मिस्त्री असेल तर, देता का? दात घासून घेतो.

मग वहिनी म्हणायची काय हो नाना... मी तुमची वहिनी ना? मग असं या हो जा हो म्हणू नका. मलाबाई एकदम मोठं झाल्यासारखं वाटतं..

अहो पण तुम्हीं मोठ्याच आहेत ना...सूरज

पण नको बाई...तुम्ही एवढं शिकला सवरलासा आम्ही बाई आडणी माणसं कसं वाटतं ऐकायला... एखाद्या मडमवाणी...अशी हशी मजक चालत असे.

एकदा तर, गणपती उत्सवात गावात सूरज अकरावीत असताना त्याने नाटकात हिरोच काम केलं होतं. त्यावेळी मुली किंवा इतर बायका नाटकात काम करण्यासाठी तयार होत नसत ते कमीपणासच वाटायचं.. आता काय आता सर्वच सरमिसळ झाली आहे. असो..पण या नाटकात काम करण्यासाठी म्हण कोण पुण्या-मुंबईहून बाई आणली होती.

नाटकात सुरजच काम अप्रतिम झालं. पण सुरजच्या बाबांना हे आवडलं नाही. नाटकाच्या स्टेजवर आपला मुलगा एका परक्या बाईच्या गळ्यात हात टाकून एवढ्या गावातल्या लोकांत वावरतो म्हणजे काय..दुसऱ्या दिवशी सुरजच्या बाबांनी सुरजला असा दम भरला की, पुन्हा नाटकाचं नाव जरी घेतलं तरी दहा वेळा विचार करावा लागे.

सुरज सिगारेट ओढतो हे त्या दिवशी बाबांना कळलं होतं. बिडी कडील न शिवणाऱ्या घरात हा पोरगा चार-चौघात सिगारेटचा धूर त्या बाईच्या तोंडावर सोडतो म्हणजे जणू आपल्या मुलाने मोठा गुन्हाच केला असे वाटल्याने बाबांनी सुरजला जाम धुतला होता. त्यामुळे सूरज आता गावात नाटकात काम करायचं सोडून दिल्यासारखच होत, पण तो जिथं तो नोकरी करीत होता त्या गावात तो सण-उत्सवात नाटकातून काम करीत असे. लहानपणापासून नाटकाची आवड असल्याने तो दमदार अभिनय करायचा त्याचं वागणं, बोलणं, चालणं ही आणि राहायचा सुध्दा एखाद्या होरो सारखा मग काय त्याच्याशी बोलायला मिळावं म्हणून काही तरी कारण काढून तरुण मुली भेटायच्या. त्याच्या कामाबद्दल लोक कौतुक करतात ते सांगायच्या खूप गप्पा रंगायच्या. पण त्याच लग्न झालं अन.....

हे लग्न तसं सुखा-सुखी झालं नाही. सुरजला अभिनयाची आवड होती. शाळेत विध्यार्थी दशेत असताना त्याने अनेक शालेयस्तरावरील नाटकातून काम केलं होतं. आणि आता ज्या शाळेत तो करीत होता तिथेही तो अधून-मधून आपली नाटकांची हौस भागवत असे. असेच एका कार्यक्रमात राधाची आणि सूरज याची भेट झाली. नाटकाच्या सरावासाठी दोघे एकत्र येऊ लागले. मैत्री वाढत गेली आणि संस्कृतीक कार्यक्रमातून त्याची वाहवा झाली. आणि ते दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात कधी पडले हे कळलं तेंव्हा खूप उशीर झाला होता. सूरज हा खेडेगावात वाढलेला एका गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा अतिशय नम्र आणि घरात एकटाच शिकलेला असल्याने घरात त्याला खूप आदराची वागणूक होती आणि तोही घरातील आबालवृद्ध मंडळींचा मान ठेवत असे. याचाच आधार घेऊन गावाकडील मंडळींनी त्याचं लग्न परस्पर ठरवलं. आणि आता सुटीत आलाच आहेस तर, मुलगी बघून घे असं सुरजच्या बाबांनी सांगितलं...आणि सुरजच्या डोळ्यासमोर काजवे चमकू लागले. त्याला तो गावातील नाटकातला प्रसंग आठवला आणि सर्व अंगाला दरदरून घाम फुटला. परक्या बाईच्या अंगावर जात ठेवला होता तर, बाबांनी सोलून काढलं होतं बानी आता तर, आखीच्या अख्खी बाई घरी आणायची म्हणजे......नको त्यापेक्षा मुलगी पाहून घेऊ आणि पसंद नाही म्हणून सांगू हे बरं..

पूर्वीच्या काळी म्हजे पन्नास-साठ वर्षांपूर्वी अशीच लग्न ठरवली जात होती. मोठ्या माणसांनी मुलगी-मुलगा बघून झाल्यावर मुला-मुलींना समोरासमोर भेटू देत म्हणजे फक्त बघायचं ते ही चार-चौघात कसं बघणार. सर्वांच्या नजर आपल्यावर असतात. म्हणजे तोंड दाबून बुक्यांचा मार दुसरं काय..

एकदा वडील माणसांनी शब्द दिला की खेळ खल्लास. बाकी घरातल्या मंडळींनी फक्त माना डोलविणे याशिवाय दुसरा पर्याय नसे. त्यातून सुरज ही सुटला नाही.

मे महिन्यातील उन्हाळगाची सुट्टीत सूरज घरी आला आणि बापाने एक दिवस मुलगी बघून ये म्हटल्यावर त्याने पडत्या फळांच्या आज्ञेनुसार चुलत भावाला सोबत घेऊन, स्वारी वधू परीक्षेसाठी सायकलवरून मुलीच्या घरी निघाली. वाटेत गप्पा झाल्यापण माझं एक मुलीवर प्रेम आहे. किंवा तुला कोणी दुसरी मुलगी आवडते का? ही चर्चा झाली नाही आणि सुरजनेही सांगितले नाही.

एकदाची वधू परीक्षा झाली सुरजने मुलगी पसंत केली. काय करणार...मुलीमध्ये नकार देण्यासारखे काही नव्हतेच तर, नकार कसा देणार. आणि नकार दिला असता तर, बाप आणि नातेवाईक मंडळींनी त्याचा पार खिमा केला असता ना...चांगली नाकीडोळी नीट, देखणी सुंदर मुलीला नाही कसं म्हणायचं म्हणून तो गप्प होता. मुलीच्या होकार नकाराचा कोणी त्यावेळी विचार करीत नसत आणि मुलीही मुलगा हो म्हणतो ना मग विषय संपला. सर्व काही मुलांच्या होकार नकारावर आणि आई-बापाच्या मर्जीवर चालत असे.

मुलाच्या होकार येणं तेवढं बाकी होत तेही झालं आणि घरातील मंडळी सुरजच्या लग्न घाईत अडकून पडली. दाग-दागिने, कपडेलत्ते, लग्नाचा बाजार, लग्नपत्रिका छपाई, लग्न मंडप, वाजंत्री, ब्राह्मण, लग्न मुहुर्त, पत्रिका वाटप हे एका महिनात करायचं होतं. म्हणून घरचे आपापल्या कामात मग्न होते.

मुलीकडील मंडळींची आता ये जा वाढली होती आणि सूरज हे लग्न कसं थांबवायचं या आचारात होता. पण सांगणार कसं त्या काळी फोनची व्यवस्था नव्हती. प्रत्येक्ष भेटूनच काही गोष्टी सांगितल्या जात होत्या स्नि ही बाब परस्पर सांगण्यासारखी नव्हती. त्यासाठी सुरजने तिथं जाणही महत्वाचं होतं.

लग्नासाठी मध्ये अजून अवधी होता, म्हणून त्याने नोकरीचे ठिकाण गाठले. घरी कोणालाच सांगितले नाही आणि सांगितलं असत तर, काय संगणार होता तो. घरात नवरा मुलगा दिसत नाही म्हटल्यावर सर्वांची तारांबळ उडाली. आता हे घरात बाबांना कळलं तर?...अ रे बाप रे...नको बाबांना यातलं काही कळायला नको असं मोठ्या भावाने विचार केला आणि घरातल्या सर्वांना तोंड बंद ठेंवण्यासाठी बजावलं.

एक दिवस असाच गेला आणि दुसऱ्या दिवशी घरात चर्चा सुरू झाली. प्रत्येक संशयाने एकमेकाकडे पाहू लागले. तरी घरी सूरज नव्हता. ह बाबांच्या लक्षात आले पण , शेजारी गेला असेल मित्रांकडे असे घरातल्या मंडळीही सारवा-सारव केली आणि रात्र सरली.

कोणी तरी आपल्याशी खोटं बोलत आहे हे बाबांना जाणवत होत. म्हणून बाबा म्हणाले.

'सूरज बरोबर मुलगी बघायला कोण गेलं होतं'

सुरजचा चुलत भाऊ म्हणाला मी, गेलो होतो. पण त्याने काही सांगितलं नाही.

'म्हणून मी, सांगत असतो की, पोरं-पोरी वयात आली की, त्यांचं उरकवून टाकायचं तर, म्हणतात मला अजून शिकायचं आहे. शिकून काय दिवे लावणार.'

सुरजच्या चुलत भावाच्या त्याच्या मागे ससेमिरा लागला त्याला हे सर्व माहिती असणार अशी सर्वांची धारणा झाली. म्हणून सोबत जाणाऱ्या सुरजच्या चुलत भावाची कसून चौकशी सुरू झाली पण सुरजने काहीच सांगितले नाही हे सुरजच्या चुलत भावाने सांगूनही त्याच्यावर ठपका आलाच.

सुरजचा बाप आता चांगलाच खवळला होता. लग्नाचा दिवस हळूहळू जवळ येऊ लागले होते. आणि इकडं नवरा मुलगा घरातून न सांगता निघून गेला. हे मुलीकडे जाऊन सांगणार कोण आणि कसं. काय संगणार मुलगा पळून गेला म्हणून?...

आता सूरज जिथं नोकरी करीत होता त्या गावी जाण्याचे ठरलं. सुरजचा मोठा भाऊ आणि सूरज बरोबर मुलगी बघायला गेलेला सुरजचा चुलत बंधू. दोघेही गुप्त हेरासारखे नवख्या गावात आलेले. इथं ओळखीचं कोणीच नाही. आता कोणाला काय आणि कसं विचारायचं. आमचा मुलगा इकडं आला काय म्हणून.. कोण मुलगा ... तुमच कोण..कुठून आला...असे नाना प्रश्न येतील म्हणून शाळा कुठं आहे असं वाचावं म्हणजे मार्ग मिळेल म्हणून गावातल्या पारावर सावलीत बसलेल्या मंडळींना इथं शाळा कुठं आहे? असा प्रश्न केला. आणि उत्तर आलं कोण्या गावच पाहुण म्हणायचं नवीन दिसताय गावात म्हणून म्हणलं.

हो हो नवीन हा ओ पण शाळा कुठं है म्हणलं. सुरजचा बंधूंचा प्रश्न.

आव पण कनची शाळा, मराठी का इंग्रजी पुन्हा प्रति प्रश्न आला. आता मर्सठी म्हणजेजिल्हा परिषद आणि इंग्रजी म्हणजे माध्यमिक शाळा असं गावाकडे म्हणत्यात.

इंग्रजी शाळा कुठं आहे.

आव पाहुणे आता शाळा बंद है ना? उन्हाळ्याच्या सुट्टीत सारी आपापल्या गावी गेल्या ती...काय काम व्हत काय?

झालं हे काय आम्हला माहित नाही, पण पाव्हन माणूस सारखाच असत असं म्हणतात.

बरीच विचारपूस केल्यावर कालच्याला काही मंडळींना गुरूजी आणि शाळेतल्या मास्तरीण बाई दिसल्या होत्या. .असे काही लोक म्हणाले. बरोबर कोण होत तर, म्हणले कोण असणार शाळेला सुट्टी आहे. पण शाळेतल्या मास्तरीन बाई होत्या असलं काहीतरी शाळेचा काम म्हणून आले असतील.

सुरजच्या मोठ्या बंधूंच्या शोध मोहिमेला काहीच यश येईना असं वाटत असतानाच शाळेचा बाजूला एक केश कर्तनालय दिसलं. सुरजच्या बंधू सोबत आलेला चुलत बंधू सुरजच्या मोठ्या बंधुला म्हणाला..

आता खूप शोधा-शोध झाली. दोन-चार दिवसात लग्नाच्या घाई गडबडीत दाढी कर्ली नाही. आता हे दुकान समोरच आहे तर, दाढी करून घेतो मग घरी जाऊ या...

सुरजच्या शोधासाठी आलेले दोघे बंधू दाढी करून घेण्यासाठी केश कर्तनालयात गेले. दुपारची वेळ म्हणून गर्दी नव्हती. आम्ही आल्याबरोबर दाढी करण्यासाठी कारागीर सामुग्री घेऊन आपलं काम करू लागला.

सुरजच्या भावाने नुसतं बसून राहण्यापेक्षा काही तरी, विचारावं म्हणून तोंड उघडणार तेवढ्यात कारागिराने पहिला प्रश्न केला.

'काय हो दादा आपण या एरियात नवीन दिसता. या अगोदर कधी दुकानात आला नाही म्हणून, ईचारल राग मनू नका....

हो हो नवीनच आहोत. भावाच्या नोकरीसाठी आलो होतो. म्हटलं उन्हाळ्याची सुट्टी आहे. मोकळा वेळ आहे तर, एखाद्या शाळेत नोकरी मिळते का पहावं म्हणून भावाला घेऊन आलो होतो. सध्या नोकऱ्यांची लई पंचायत झाली हाय हो.. म्हणून म्हटलं प्रत्येक्ष एखादया संस्था चालकाला भेटून चर्चा करावी. जमलं तर ठीक..

बस्स सुरजच्या मोठ्या भावाने केलेला प्रश्न कारागिरांच्या मनाचा वेध घेऊन गेला. आणि कारागीर बोलू लागला.

'काय दादा बोलून राहिले. आता शाळेत नोकरी कमी आणि भानगडीत जास्त झाल्यात. पोरांना शिकून काय उपेग नाय बघा...'

'का ओ एकदम टोकाचं बोलून गेला की राव'..सुरजचा भाऊ म्हणाला.

'आ हो तसच झालय आता, काहीं काही गुरुजी लोक, लेकाचे स्वतःला राजेश खन्ना असल्यासारखे वागतात..'

'म्हणजे.'. सुरजचा भाऊ...

'जाऊ द्या ओ दादा...ते सांगण्यासारखं नाही.' कारागीर..

असं हे तो म्हणाला पण, सर्वच सांगून मोकळा झाला.

सुरजचा भाऊ.. काय समजायचे ते समजून गेला. आणि संध्याकाळी ते दोघे घरी आले आणि दिवसभर घडलेली कहाणी घरी सांगून टाकली.

सुरजच्या वडिलांना वाटले आतापर्यंत आपण कमविलेली सर्व अब्रू धुळीला मिळाली. आता नवऱ्या मुलीच्या बापाला सांगून टाकलेलं बरं पण, रात्र झालं होती. नवऱ्या मुलीचे घर दूर होते. सकाळी पहिलं मुलीच्या बापाकडे जाऊन एकदाचं सर्व त्यांच्या कानी घालून मोकळं व्हावं असं ठरलं.

सकाळ झाली सूर्य उगवायच्याआत निघायला पाहिजे म्हणून सुरजच्या बापाने सुरजच्या मोठ्या भावाला सोबत येण्यासाठी निरोप दिला. पण काय आश्चर्य सूरज आणि त्याचे वडील बाहेर पडायला आणि तोच सूरज घराच्या दारात दत्त म्हणून हजर...

सुरजला पाहून सुरजच्या वडिलांनी पायातली चप्पल काढून हातात घेतली आणि सुरजच्या डोक्यात मारणार तेवढ्यात सुरजच्या मोठ्या बंधूनी वडिलांचा हात पकडला. म्हणून सूरज वाचला, पण तोंडाचा पट्टा जो सुरू झाला, तो काही बंद होण्याचे नाव घेईना..

सुरजच्या म्हणण्यानुसार आता त्याची प्रेमिका परत येणार नाही. सर्व मिटले आता लग्न करायला काहीच हरकत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मी हे सर्व अगोदरच सांगायला पाहिजे होत पण, मला बाबांची भीती वाटली. म्हणून न सांगताच निघून गेलो...त्यावेळी फोनच आता सारखी व्यवस्था नसल्याने गुंता झाला होता...

आता सुरजच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला. तसं लग्नही दणक्यात झालं काहीच अडचण आली नाही. पण सुरजच्या वडिलांनी सुरजला शाळेला हजर होण्यासाठी जाताना तुझी बायको सोबत घेऊन जा म्हणून सांगितलं आणि सुरजची बोलतीच बंद झाली. आता तुझं लग्न झालं आहे खानावळीत जेवण्यापेक्षा आता बायको सोबत घेऊन जा.. तू तिथं आणि ती इथं हे बरं दिसत नाही..

उन्हाळ्याची सुटी संपली आणि वडिलांनी सांगितल्यावरून सूरज बायकोला घेऊन नोकरीच्या गावी हजर झाला. सुरजने दोन दिवस अगोदर पुढे जाऊन खोलीची व्यवस्था केली होती. सुखांन संसार सुरू झाला. सुरजच्या बायकोला मधल्या घडलेल्या घटनांची काहीच माहिती नव्हती. दोघेही अगदी मजेत होते. ज्या शाळेत सूरज होता तिथून त्याची बदली झाली होती. हे फक्त सुरजला माहीत होतं. सुरजच वागणं एकदम लाघवी होतं, गोड बोलणं, आणि जीवापाड प्रेम करणारा नवरा मिळाला, म्हणून ती देवाचे रोज असभासर मानीत असे. तिला म्हणजे सुरजच्या बायकोला आपला नवरा म्हणजे एक नाटक सिनेमात पाहिलेल्या हिरोसारखा वाटत होता. त्याचं राहणीमानही तसच होतं. तिलाही तो जपत होता. खूप छान आणि चांगलं चाललं होतं. सुरजची आता मगच सर निसटून बायकोच्या प्रेमात सुखावला होता. मध्ये घडून गेलेली घटना एक स्वप्न होते. असे तो समजू लागला होता. आणि त्याच्या बायकोलाच काय कोणालाही पाहता क्षणी तो नाटक सिनेमातला हिरोच आहे असं वाटे. त्याच वागणं बोलणंही तसच होत.

दिवाळी आली. चार-सहा महिने कसे गेले, ते कळले देखील नाही. काय झालं दिवाळीच्या निमित्ताने सुरजच्या सासऱ्याने मुलीच्या लग्ना नंतरची पहिली दिवाळी असल्याने जावाई आणि मुलीला दिवाळीची सुट्टीत सणासाठी सासरी बोलविले होते...

दिवाळी सणाला आपल्या गावी जाता येणार नाही पाहून सुरजने दिवाळीच्या सणासाठी गावीच्या घरी भावाच्या लहान मुलांसाठी फटाके आणि फराळ देण्यासाठी एस टी स्टँडवर गेला होता. सुटीत गावी जाणारे कोणी तरी, भेटेल आणि त्यांच्याकडे सर्व सामान देऊन घरी येत होता. बराच वेळ झाला स्टँडवर ओळखीचं माणूस शोधण्यात वेळ गेला...

सूरज एस टी स्टँडवरून घरी येता येता अंधार पडला होता. घराच्या अंगणात आल्यावर आपली घरात बायको सोबत कोणी तरी, मोठं-मोठ्याने बोलत आहे हे जाणवलं.

सूरजने घरात हळूच डोकावून पाहिलं तर, काय साक्षात त्याचं पहिलं प्रेम....त्याच्या घरी आणि प्रत्येक्ष त्याचा बायको बरोबर गप्पा मारत होती.... सुरजच्या पाया खालची जमीन कोणी ओढुन घेत आहे, असं क्षणभर वाटलं. काय बोलावं की, नको या मनस्थितीत सूरज होता.

आता बायकोला कसं समजावून सांगावं हे विचार त्याच्या डोक्यात फेर धरून नाचू लागले. चक्कर येवुन पडेल की काय? असं वाटू लागले.

तोच सुरजची बायको म्हणाली ...

'आ हो आय गप्प का बोला ना!!!'

'काय बोलून?..' सूरज रडवेल्या स्वरात म्हणाला..

'मला सगळं कळलं आहे. आता लपवून उपयोग काय? तुमचं दोघांचं एवढं प्रेम होतं तर, मला बघायला का आलात? आणि नुसतं बघून तरी थांबायचं होत. पोरगी पसंत नाही म्हणून सांगायचं होत ना.. आता हा काय तमाशा हा'

बरं आलात तर आलात लग्न झालं आता सहा महिने झाले उद्या दिवाळीसाठी माझ्या बाबांकडे जायचं आहे. आता काय करायचं.. काही तरी बोला...ना.....सुरजची बायको.

सूरज रागाने लाल झाला होता. रागाच्या भरात तो बोलू लागला..

'आ गं आपलं ठरलं होतं ना...की,..मागचं सर्व विसरून पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करायच म्हणून...'

'असं तू म्हणाला होता मी नाही. मी फक्त तुझ्या लग्नात येणार नाही. असं म्हणाले होते'.

त्या दोघांचं बोलणं मध्येच तोडत सुरजची बायको म्हणाली..

'आता आमचं सर्व बोलणं झालं आहे. आपण तिघांनी एकत्र राहायला काही हरकत नाही. माझी तयारी आहे. आम्ही दोघी आणि तूम्ही आपण सर्व एकत्र एका छताखाली सुखानं राहू. तुम्ही आता यात फाटे फोडू नको. उगाच आई-बाबांची रागावण्याची कारण सांगू नका.'

'अ गं पण आई-बाबा काय म्हणतील. आई एकवेळ समजून घेईल पण...बाबा तर,... माझा जीवच घेतील. तुला माहीत नाही बाबांचा राग'....सूरज..

आ हो आता तुम्हाला बाप आणि त्यांचा राग आठवतो आहे पण, यात या बिचाऱ्या ताईचा दोष काय...हे सर्व तुम्ही यांच्यावर प्रेम करायच्या अगोदर करायला हवं होतं. आता त्या कुठं जातील काही कळतंय का? पुरुषांना बाईचं मन आणि प्रेम कधीच कळायचं नाही., आणि आता कळलं तरी, आता विचार करण्याची वेळ घेऊन गेली आहे. आता सांगतात बाबांचा राग कसा आहे ते'..सुरजची बायको...

'अन काय हो'... या इथं आपल्या सोबत राहायला आल्यात हे बाबांना कोण सांगणार आहे. यांना तुमच्या आई-बाबांनी आणि घरातल्या कोणीच पाहिलं नाही. या कोण हे त्यांना कसं कळणार जस जसे दिवस जातील तसं तसे सारं शांत होत जाईल. यावर काळ आणि वेळ हेच औषध आहे.

आपल्या घरी कोणी आलेच तर, मी सांगेन सर्वांना ही माझी खास मैत्रीण आहे म्हणून..मग कोण कशाला विचारले... या कोण म्हणून....आता विचार करून काहीच उत्तर मिळणासर नाही शांतपणे विचार करा आणि गप गुमान जेवून घ्या....आणि झोपा गप्प.

'नको नको आता आपलं लग्न झालं आहे. हे चूकीच आहे. तुझा आई-बाबांना काय सांगायचं'....

'आता हे काय नवीन आणखी'....

'माझ्या आई-बाबांचं काय... त्यांचं मी बघेन. आता आपण तिघेही एकत्रच राहू...पण चर्चा नको'...सुरजची बायको..

सुरजला बायकोच म्हणणं काही पटलं नाही. तो म्हणाला.

'मला हे मान्य नाही. आमचं दोघांचंही ठरलं होतं. आता मागील सगळं विसरायचं. तिला आताच्या आता घरातून जा म्हणावं'..

सुरजची प्रेमिका जायला तयार होईना. मग दोघांचे भांडण सुरू झाले ते कसं तरी, सुरजच्या बायकोने मध्यस्थी करून मिटविले. म्हणाली.

आता आपण सकाळी यावर सविस्तर बोलू....आता शांतपणे झोपा बरं....

सकाळ झाली तशी सुरजची बायको उठून नेहमीप्रमाणे झाडलोट करू लागली. आणि तिच्या हालचालीने आणि बाजूच्या आवाजाने रात्री विचार करीत, उशीरा झोपी गेलेल्या सुरजच्या प्रियशीला जाग आली. ती ही उठली. आणि अंघोळीसाठी गरम पाणी करावं म्हणून स्टो पेटवू लागली. पण काडेपेटी सापडेना म्हणून तिने शोधा शोध सुरू केली. पण काडेपेटी सापडली नाही. सुरजच्या बायकोला विचारावं असं मनात आलं तेवढ्यात बाथरूमचा बंद झाल्याचा आवाज आला, म्हणून ती सुरजला उठवू लागली. पण सूरज काही जागा होईना. तिला वाटलं माझं इथं येणं त्याला आवडलं नसावं. तो रंगात असल्यामुळे बोलत नसेल. म्हणून ती सुरजची बायको बाथरूम मधून बाहेर येण्याची वाट पाहू लागली.

काही वेळातच सुरजची बायको बाथरूम मधून बाहेर आली. मग दोघींच्या एकत्र गप्पा झाल्या. घरातली आवरा-आवर करत करत दोघींच्या आळी-पाळीने अंघोळ झाल्या आणि आता आई-बाबांकडे दिवाळीला जायचं म्हणून सुरजची बायको त्याला जागे करू लागली, पण हाकेत जागा होणारा सूरज जागा झाला नाही. तिलाही वाटलं स्वारी रागावली आहे. जरा त्याच्या कला कलाने घावे.

बायका किती सोशिक असतात बघा....म्हणजे चूक नवऱ्याची असूनही त्याचं प्रेम मिळविण्यासाठी... त्याच माघार घेतात. कितीही मोठं दुःख असलं तरी त्या आपल्या उदरात साठवून ठेवतात. त्यांच्या या अभूतपूर्व प्रेमाला माझं सलाम आहे. जी माता नऊ महिने आपल्या मुलाला वाढविते तीच माता कोणाची तरी, आई, बहीण, बायको किंवा प्रियशी असते. उदरात वाढत असलेले मुलं तिला जड होत नाही. मग नवरा हा तर, फक्त सोबती आहे. राग रुसवा सारं विसरून बायको आई-माऊली, नवऱ्याची आयुष्यभर दाशी होते. तो दारुडा असो की बाईलवेडा त्याने प्रियशील घरी घरी आणलं तरी, आपल्या संसारात तिला सममवून घेते.हे चूक आहे तिला माहीत नाही काय? सारं माहित असतं तिला. पण आपली पुरुषप्रधान संस्कृती आणि संस्कार तिला जखडबंध करून ठेवतात. आणि त्या पुरुषरूपी मायाजालात बिचारी सोसत राहते. आणि लपवत राहते पाप जे तिनं कधी केलेलं नाही. त्यांच्या प्रेमाला उपमा नाही. अशा या बाईला सूरजसारखा नवरा मिळाला जो दोघींनाही हवा होता. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.

सर्व आवरून झाल्यावर सुरजची बायको पुन्हा सुरजला उठवू लागली पण, रात्री पहिल्या प्रमिकेच्या आगमनाने धास्तावलेल्या सूरज, उद्याचे काय? या धक्याने कायमचाच झोपी गेलो. तो बाहेर आकाशाच्या अंगणात सूर्य उगवला तरी, पुन्हा जागा झालाच नाही. तो रात्री जो झोपला, तो कायमचंच....पुन्हा जागा न होण्यासाठी....



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy