पैंजण
पैंजण


भारतीय संस्कृतीत पैंजणाला स्रीच्या सुंदरतेचे प्रतीक मानले जाते. पैंजण हे स्त्रीयांचे पायात घालण्याचे एक आभूषण होय. ते जाड घुंगराचे,मुक्या घुंगराचे,मिना भरलेले, रंगीबेरंगी खड्यांचे ,छुमछुम करणारे तसेच जाड, पातळ ,मध्यम आकाराचे देखील असतात.स्त्रिया आपल्या आवडीप्रमाणे घालतात.
मराठी,हिंदी चित्रपट स्रुष्टीत ही पैंजणवर अनेक गाणे आपल्याला पहायला मिळतात.
उखाण्यातही पैंजण........
छन छन बागड्या, छुमछुम पैंजण,........रावांचे नाव घेते,ऐका सारे जण.
पैंजण हे अतिशय लोकप्रिय आभूषण आहे.
जोडवी,बांगडी तसेच पैंजण सौभाग्याच्या वस्तू नाहीत तर आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.चांदीचे पैंजण घातल्याने पायातुन निघणारी शारिरीक विद्युत ऊर्जा शरिरात संरक्षित ठेवते. वास्तुच्या मते पैंजणातून येणारा स्वराने नकारात्मक ऊर्जा दूर होते.
सोन्याचे पैंजण घातल्याने शारिरिक उष्णतेचे संतुलन बिघडून आजार होण्याची शक्यता असते. म्हणुनच चांदीच्या पैंजणाला जास्त प्रभाव दिला जातो कारण हे पैंजण घातल्याने पैंजणाचे पायाला घर्षण होऊन पायाचे हाड मजबूत राहते.
लग्नाच्यावेळी सासरकडून भेट म्हणून नवरीला चांदीचे पैंजण देतात,चालतांना घुंगराचा आवाज होतो तो अनेकांचे लक्ष वेधुन घेतो.या घुंगराच्या आवाजाने मन प्रफुल्लित होते.
छुम छुम छुम हा आवाज कानांना मनाला मोहनारा, भान हरपणारा घुंगरांचा आवाज.
घुंगरु हे एक पण भाव अनेक एक मन मोहनारा तर दुसरा भाव रडवणारा प्रियसी प्रियकराला घुंगराच्या आवाजावरुन आपले गुपीत सांगते ते प्रियकर चटकन ओळखत असतो.
मदिरात डुबलेले श्रुंगारमग्न झालेले रसीक यौवना नर्तकी, प्रेमी यांच्यासमोर चेहर्याने फुललेली पण मनाने कोमजलेली अबला नारी घुंगरु बांधुन मोहवते तेव्हा घुंगरू देखील तिच्यासाठी रडतच असतात.
घुंगरुत एक विलक्षण शक्ति देखील असते नारी ही घुंगराच्या जोरावर एका तपस्वीची तपस्या देखील भंग करु शकते.तर हेच घुंगरू परमेश्वरासमोर वाजले तर परमेश्वरमय करुन टाकते.
घुंगरु हे स्त्रीचा एक अलंकार आहे एक बंधन आहे,एक मर्यादा आहे,एक पावित्र्य आहे,एक सौभाग्य आहे तर एक दुर्भाग्य आहे.
"घुंगरु एक भाव अनेक छुम छुम छुम छुम.