साहस
साहस


माझ्या मुलीच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमास मी गेले होते. तेथे एका विद्यार्थीनीने अतिशय सुंदर नाटक सादर केले.अजुनही ते माझ्या मनात ठासुन भरलंय, किती साहस त्या मुलीत एका शौर्यविराची कहाणी तिने दर्शविली. कौतुक करावे तेवढे कमीच त्या विद्यार्थिनीचे.
नाटक :- सैनिकाची मुलगी कौतुकाने तिच्या आईला सांगते,आई यंदा माझ्या वाढदिवसाला बाबा येणार, माझ्यासाठी surprise gift पण आणणार आहे ,मला त्यांनी वचन दिलंय.
आज आला तो दिवस .
आई तु का अशी बसलीस गं ? बघ माझ्या मित्र मैत्रीणी येतील आत्ता, शेजारच्या काकुंना पण सांगितले मी "आज माझे बाबा येणार आहे " बरं का ! माझ्या वाढदिवसाला त्यांनी मला promise केलंय.
ए आई बोल ना ग
ं !
काहीतरी तु अशी गप्प का ? अगं रडु नकोस बाबा रागवतील गं तुला !
येतीलच बघ इतक्यात,
आणि काय दारावरची बेल वाजली चिमुकलीने दरवाज्याच्या दिशेने धाव घेतली
आई बघ बाबा आले!
बाबा!बाबा! चिमुकल्याने दार उघडले, बाबा! काका तुम्ही एकटेच का ? माझे बाबा कुठे आहेत ? आणि ह्या पेटीत काय आणलंय तुम्ही बाबांनी surprise gift दिलं वाटतं, बाबा कुठे लपुन बसलेत!
चिमुकल्याने पेटी उघडताच "बाबा!! बाबा!!
बाबा उठा!! बाबा उठाना !!
तुम्ही बोलत का नाही आई बघ ना बाबा नाही उठत बोलाना बाबा काहितरी बाबा बोलाना ....
पोरीने टाहो फोडला बाबा!!!
काय हो बाबा हे कुठलं surprise,देशासाठी तुम्ही शौर्यविर झालात आणि मला अनं आईला परके झालात .
बाबा!!( रडु लागते)