कल्याण ठुकरूल

Thriller


4.3  

कल्याण ठुकरूल

Thriller


पावसाळी काळी-पांढरी रात्र

पावसाळी काळी-पांढरी रात्र

3 mins 16.7K 3 mins 16.7K

"भय" काय असतं हे मला त्या रात्री अनुभवायला मिळाले. मी कोकणात राहतो. कोकण म्हटलं की घनदाट जंगल. इथे रात्री ७-८ वाजले की सगळीकडे सामसूम होते. मी बाजारात गेल्यामुळे मला फार उशीर झाला. पाऊस धो-धो चालू होता. मी आणि माझी सायकल घरचा मार्ग धरला होता. बाजारपेठ आणि माझे घर जवळजवळ १ तासाचे अंतर होते. या अंतरामध्ये कोणतेही गाव नाही. कोणी आल्यागेल्याचा वासवारा नाही. होते ते फक्त एक स्मशान. माझ्यासमोर फक्त माझे घर दिसत होते. अचानक पाठून एक हाक ऐकू आली, मागे वळून पाहिले पण कोणीच नव्हते. पुन्हा काही अंतरावर गेल्यावर हाक ऐकू आली मागे वळून पाहिले तर एक व्यक्ती पांढऱ्या वेषात उभी दिसली म्हणून मी माझी सायकल थांबवली आणि पाहायला गेलो तर तिथून ती व्यक्ती नाहीशी झाली होती. आजूबाजूला पाहिले तर कोणीच नव्हते. मी त्याकडे दुर्लक्ष करत सायकलपाशी आलो तर सायकलच्या टायरची हवा गेलेली. काहीच सुचत नव्हते. पाऊस थांबायचे काही नाव घेत नव्हता. खांद्यावर छत्री आणि एका हाताने सायकल धरून घेऊन चालू लागलो. काही अंतरावर आलो तोच माझ्या खिशातील बिस्किटचा पुडा कुणीतरी खेचला. मागे बघितले तर कोणीच नव्हते मग पुडा गेला कुठे? या विचारात मी तेथे थांबलो. बाजूला स्मशान होते. स्मशानात एक प्रेत जळत होते अगदी रस्त्याच्या कडेला होते. त्या चितेतून फटफुट असा आवाज येत होता. थोडी मनामध्ये भीती वाटू लागली होती. काहीतरी भयानक घडत होते. घरी कधी पोहचतो असं झालं होतं पण घर अजून खूप लांब होते. मी पुन्हा घराच्या दिशेने चालू लागलो तेवढ्यात अचानक माझी छत्री पाठून कोणीतरी ओढत होत मला वाटले वाऱ्याने होत असेल म्हणून मी दुर्लक्ष केले पण हे काही पाऊलावर पुन्हा घडले आता मात्र माझी भीती वाढू लागली, घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. काय करू सुचत नव्हते.देवाचे नाव घेवून, मागे न बघता चालू लागलो. काय व्हायचे ते होवू दे. पायाचा वेग वाढवून चालू लागलो. पुन्हा माझी छत्री पाठून कुणीतरी खेचू लागले, पुढे जायलाच देत नव्हते. म्हणून मागे पहिले तर ती पहिल्यांदा पांढऱ्या वेशात दिसलेली व्यक्ती छत्री धरून उभी होती.कोणताही विचार न करता तशीच छत्री आणि सायकल टाकून घराच्या दिशेने धावत सुटलो. पाऊस जोरदार लागत होता. नदीला पूर आला होता. रस्त्यावर पाणी भरले होते. घराजवळ एका पुलाजवळ येवून पोहोचलो होतो. आता माझे घर दिसू लागले होते तेव्हा जरा धडधड कमी झाली तोच बाजूला पूर आलेल्या नदीतून पांढऱ्या वेशातील एक प्रेत वाहत येताना दिसले ते आता जवळ येत होते पुन्हा धडधड सुरु झाली हे काहीतरी आपल्याबरोबर विचित्र घडत आहे, हे कळताच माझ्या जवळ असलेल्या घराकडे धाव घेतली. घरी पोहोचलो आणि प्रथम घराचे दार लावून कडी लावली. एका कोपऱ्यात जाऊन थरथरत पूर्ण शरीराचा चंबू करून बसलो. अंग तापले होते. घरचे सर्वजण येऊन विचारू लागले. मला हलवत होते.काय झाले? काय होतंय? असे प्रश्न कानावर पडत होते पण मी मात्र काहीच न बोलता निशब्द होऊन गेलो होतो......! अजूनही ती भयानक "पावसाळी काळी-पांढरी रात्र " आठवली की मनामध्ये धडधड व्हायला लागते. नक्की काय होते ते?  हाच विचार अजूनही करत बसतो.


Rate this content
Log in