पाऊसाचा खेळ?
पाऊसाचा खेळ?
पाऊसाने वेग वाढवला आणि मी गाडीचे ब्रेक मारले.पुढे जाणे अशक्य होते.रात्रीची वेळ,धुमधार पाऊस,शहराच्या बाहेर आणि मी एकटीच गाडीत!झाले असे की एका कार्यक्रमासाठी आजोबांना खास निमंत्रण होते आणि मी त्यांना सुखरूप त्यांच्या घरी पोचवून ,आपल्या घराच्या दिशेने गाडी चालवत होती.मध्येच हा पाऊस सुरू झाला आणि बघता बघता जणू आकाश खाली कोसळत आहे असे वाटू लागले.ही वाट थोडी रुक्ष होती पण घरी लौकर पोचले असते म्हणून मी हा रस्ता पकडला होता.
गाडी थांबली आणि मला पावसाचे वार गाडीवर पडताना ऐकू येऊ लागले.का जाणो पण भीती मात्र काही वाटत नव्हती.थोड्यावेळ थांबले की पाऊस कमी होईल व मी माझ्या मार्गाने पुढे जाऊ शकेन असे खात्री होती.मोबाईल बघितला तर चार्ज ची शेवटला दांडी राहिली होती.घरी मेसेज पाठवून दिला उशीर होईल म्हणून,उगाच काळजी करत बसले असते घरी.तोंडावरून हात फिरवला,जाम गरम होत होते बंद गाडीत.रेडिओ लावला तर सिग्नल नव्हते पोचत.त्यामुळे किरर अंधारात मी तशीच बसले पाऊस कधी बंद होतोय ह्याची वाट बघत.तेवढ्यात लांबून एका गाडीचा दिवा दिसायला लागला.बहुतेक माझ्या दिशेनी येत होती.मी पण गाडीचे हेड लाईट चालू ठेवले होते.दिवा जसा जसा जवळ आला तशी गाडी दिसू लागली.भ्यांकर आवाज करत येत होती .खूपच जुने engine असावे असला आवाज करत होती.असो,ती अशीच आवाज करत पुढे जाणार असे वाटले पण काय! तो गाडी चालक तिथेच थांबला.माझी थांबलेली गाडी बघून कदाचित मदतीसाठी थांबला असेल असे वाटले.
खिडकी खाली करून लांबून विचारायला लागला का गाडी थांबवली होती .आता मला सुद्धा खिडकी खाली करून खुणा करून सांगायचं होते की सर्व ठीक होते.ते त्याला समजले नाहीं बहुदा तो परत परत विचारात होता,मी अंगठ्याने इशारा केला सर्व ठीक आहे म्हणून. तो मग पुढे निघून गेला.मी गाडी स्टार्ट करायला गेले तर होतच नव्हती!
परत प्रयत्न केला तरी नाही!आता मात्र भीती वाटू लागली.काय करू कशी घरी पोचू? आता पाऊस थांबला तरी गाडी कशी चा
लेल?पेट्रोल संपले होते ह्याची खूण दिसली.अरे देवा,आता काय करू?डोक्याला हात लावून बसले होते.जरा आधी स्टार्ट केली असती गाडी तर तो गाडीवाला मदत करायला आला असता.अचानक माझ्या गाडीला कोणीतरी बाहेरून धक्का देत आहे असा भास झाला.मी सर्वकडे बघितले ,कुणीच दिसत नव्हते.घाबरून माझी गोगलगाय झाली होती.मी स्वतःच्या श्वासाशी पण घाबरत होते.गाडीला धक्के कुठून कोण मारत असेल?मी खिडक्या गच्च बंद करून सगळे लॉकस बंद करून गाडीत बसले होते.तेवढ्यात दुसरा धक्का!आता खात्री पटली की कुणीतरी असावं.कोण,कशाला,काय हे विचारायची हिम्मत होत नव्हती.घरी पोचणार तरी होते का इथेच संपणार जीव काही समजत नव्हते.
आणि एकदम गाडी सुरू झाली!
काय चमत्कार होता,कोण होते धक्के मारणारे काही कळले नाही.पेट्रोल चा इंडिकेटर वर गेला होता! पाऊस कमी झाला होता,रात्रीचे १२ वाजत आले होते.जवळच कुत्र्याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला.मला अंगभर घाम फुटला होता.गाडी सुरू झाली म्हणून लगेच पुढे केली,आरशात मागे एक पांढरी साडी नेसलेली बाई दिसली ,ती मला जा आता घरी पोच सुखरूप असे सांगत असल्याचे भास झाले.मी गाडी सुसाट वेगाने चालवत एकदाची घरी पोचले.सर्व चमत्कार आईला सांगितला.दुसऱ्या दिवशी गाडी सुरू करायला गेले आणि बघितले तर पेट्रोल ची टाकी रिकामी!बरोबर त्याच आकड्याव र जिथे मी शेवटी आधल्या रात्री बहितले होते!मग घरा पर्यंत कशी पोचले?
आदल्या रात्रीच झालेला प्रकार कुणाला सांगू कोणी विश्वास करेल का?घरी सगळ्यांना वाटले भास झाला असेल गाडी सर्व ठीकच असेल.मला माहित आहे की पेट्रोल संपायला आले होते ,मला धक्के जाणवले होते.कोण विश्वास ठेवेल माझ्या या भन्नाट अनुभव चा?
नंतर कळण्यात आले की त्या रस्त्यावर कुठली ही गाडी अडकली तर ती थोड्याच वेळात आपले आपण नीट होते!कुणामुळे,काय गुपीत आहे ह्याच्या मागे अजून कुणाला ही निष्कर्ष लागला नाही.
मी मात्र तो रस्ता कधीच पकडला नाही,भीती,आश्चर्य सर्वच अनपेक्षित होते.